Skip to main content

भविष्यात आपली गरज आहे का?

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 21/12/2011 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्‍याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील.

जीवन रत्नाचे!!

लेखक फिझा यांनी बुधवार, 21/12/2011 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
शून्यात सामावलेला समुद्र त्याची एक आठवण ..एक मोती हवेहवेसे वाटणारे ते रत्न पण नकोशा वाटणाऱ्या लाटा वाहून नेणाऱ्या रत्नांचे मोल किनाऱ्याला कधीच नसते वाहून आणलेले ते ओझे असते कुणाच्या आठवणी बनून राहतात ते कुणी व्यवहार करतात त्याचे रेतीवरचे नाव वाहून जाते पाण्यासवे दगड काही शिल्लक राहतात उन्हासवे रत्न पुसत राहते कथा त्याच्या वैभवाची चांदण्यानाही हेवा वाटे त्या स्फटिकाची नसणे असूनही आणि असणे नसूनही लाटांबरोबर वाहत जाणे रत्न बनूनही वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची जुगारी संपत नाही कधीच त्यांच्या जीवनाची उधारी नवीन किनाऱ्यावर नव्या लाटांना सलाम
काव्यरस

टिचकीत अभिजात इंग्रजी साहित्य - पुस्तक रुपात

लेखक यकु यांनी मंगळवार, 20/12/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकवेड्‍यांसाठी खुशखबर! इंग्रजीतील पुस्तकांसाठी अंतर्जालावर गुटेनबर्गसारखी अनेक ग्रंथालये आहेत. तसेच, पण इंग्रजीतील मूळ पुस्तके जशीच्या तशी (आणि फुकट, हे महत्त्वाचं ;-) ) ब्राऊझरमध्‍ये वाचण्‍यासाठी उपलब्ध असणारे ऑनलाईन ग्रंथालय सहज दिसले. हा त्याचा दुवा: http://openlibrary.org पुस्तके बर्‍याच ठिकाणी उपलब्ध असतात, पण ती पुस्तकांसारखी पुस्तके नसून नुसती अक्षरांची खिचडी असल्याने वाचायला मजा येत नाही. या संकेतस्‍थळावर मूळ पुस्तकेच स्कॅन करुन अपलोड केलेली आहेत. कोणती कोणती पुस्तके आहेत हे सांगणे अवघड आहे, कारण इ.स.

प्रिय मित्रा

लेखक शरद यांनी मंगळवार, 20/12/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रा, आज बरेच दिवसांनी "सुहृदगाथा" बाहेर काढले. बराच वेळ मुखपृष्टावरील अवचटांचे अजिंठाचे रेखाटन पहात बसलो. आतल्या कवितांना साजेसे गूढ. रंग सुद्धा आतील कवीतांसारखेच. पुस्तक उघडून पहिले पान पाहिले आणि एक मोठा धक्का बसला. त्यावर तू लिहले आहेस शब्द संपतात तिथून सुरू होणार्‍या दोस्तीला मला एवढेच कळवायच संध्याकाळची प्रत्येक कविता मी बकुळफुलात जपून ठेवलीय २६-१-१९७९ बस. एवढेच. सहीसुद्धा नाही. तुला त्याची गरज वाटली नाही. व त्यावेळी मलाही. पु.शि. रेग्यांचा कविता संग्रह व ग्रेसची आठवण करून देणारा, दोस्तीला बकुळफुलांचा सुगंध देणारा ...

लोकपाल आणि भ्रष्टाचार...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 20/12/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
ढिसक्लेमर : सगळ्यात पहीलं म्हणजे "चावून चोथा" अश्या विषयावर लिहून मिपाची जागा खातोय, ह्यासाठी "सॉरी शक्तिमान !".. लेखाचा उद्देश्य फक्त लोकपालबद्दल चर्चा करण्याचा आहे. ************************************************************** हां, तर आजकाल लोकपाल वर बरीच चर्चा सुरु आहे. टिव्ही, सरकार, माध्यमं सगळीकडे हेच.. "लोकपाल आणि लोकायुक्त" ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव सगळ्यात आधी १९६८ मध्ये देण्यात आला. १९६९ मध्ये इंदिरा सरकारने संसदेत पहिल्यांदा हे बिल मांडले, पण पारीत झाले नाही. त्यानंतर आतापर्यंत जवळपास आठ-दहा वेळा हे बिल संसदेत आले, पण त्याचा कायदा झालेला नाही..

अखेरचा पाठ

लेखक प्रास यांनी मंगळवार, 20/12/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत जायला रोजच्यापेक्षा जरा उशीरच झालेला. तरी मी पाय ओढत चाललेलो. आज शाळेत मला मास्तरांची बोलणी खायला लागणार आणी कदाचित मारही, हे त्रिकालाबाधित सत्य होतं. कारण काल हॅमेल मास्तरांनी सांगितलेलंच होतं की आज ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत नि मला कृदन्तातलं ओ की ठो येत नव्हतं. आता चांगलंच उजाडलेलं. पक्षी बाजूच्या झाडींमधून चिवचिवत होते आणि पलिकडच्या मैदानात प्रशियाचं सैन्य संचलन करत होते.

पुण्याबाहेरचे पुणे- भाग १....रांजण-खळगी.....

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 20/12/2011 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रचलित नावे : टाकळी हाजी/कुंड माउली/निघोज/मळगंगा (टाकळी हाजी असाच उल्लेख करावा,कारण एक हाजी टाकळी नावाचे गाव नगर-पुणे वेशीवर आहे.) कसे जायचे : पुणे-नगर महामार्गावर,सुप्रसिध्द्,अष्टविनायकांपैंकी एक रांजणगावच्या गणपतीच्या चौफुल्यावर,डाव्या बाजुला वळण घेतले की सोने-सांगवी,पाबळ फाटा क्रॉस केला की टाकळी हाजी. वेळ : पुण्यापासुन ६० कि.मी..दुचाकीवर ,१ ते १.५ तास... रस्ता : रांजणगाव पर्यंत हाय-वे पुढे २५ एक कि.मी. ग्रामसडक.....तीन-एक कि.मी.

एगप्लांट + मोझ्झेरेला चीज (उर्फ वांग्याचे काप फ्राय)

लेखक गणपा यांनी मंगळवार, 20/12/2011 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज जवळ जवळ शाकाहारी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता नावातच एग असल्याने अंड्याचा वापर अपरिहार्य आहे. ;) पण तुम्ही अंड खात नसाल तर त्यावरही उपाय आहे. नेहमीसारखे वांग्याचे काप करण्या ऐवजी आज पाकृमें थोडा टिव्स्ट्.

पुन्हा एकदा लोहगड

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 20/12/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात लोहगडला मुसळधार पावसात चिंब चिंब झालो होतो. धुव्वाधार पावसामुळे किल्ल्याचे फारसे फोटो काढता आले नाहीत. या रविवारी अनपेक्षितपणे लोहगडवारी पदरात पडली व किल्ला टिपण्याची हौस पुरेपूर भागवून घेतली. १. पवना धरणाच्या बाजूने दिसणारा लोहगड २.

गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया ! चे अर्थशास्त्र काय?

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 20/12/2011 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या चुकार क्षणी टिव्ही लावला जातो आणि गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया यांचे सेलिब्रिटिचे फोटो एकमेकात मिसळून तुम्हाला ओळखण्या चा कार्यक्रम चालू असतो. उत्तरे अगदी सोपी असतात. (अगदी संध्यानंद मधल्या शब्दकोड्याच्या क्लू सारखी - उदाहरणार्थ- सोमवार नंतरचा वार-भारताची राजधानी- नवी ** वगैरे) फक्त झूम ए २४ वगैरेच नव्हे तर चक्क एन डिव्ही आणि इम्याजीन सारखे च्यानेल्स सुद्धा हे कार्यक्रम प्रदशीत करीत असतात. याच्या मागचे अर्थशास्त्र समजत नाही. फ्रॉड म्हणावा तर ग्राहकाना फसवले जाते म्हणजे नेमके कसे?