गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया ! चे अर्थशास्त्र काय?
लेखनप्रकार
एखाद्या चुकार क्षणी टिव्ही लावला जातो आणि गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया यांचे सेलिब्रिटिचे फोटो एकमेकात मिसळून तुम्हाला ओळखण्या चा कार्यक्रम चालू असतो.
उत्तरे अगदी सोपी असतात. (अगदी संध्यानंद मधल्या शब्दकोड्याच्या क्लू सारखी - उदाहरणार्थ- सोमवार नंतरचा वार-भारताची राजधानी- नवी ** वगैरे)
फक्त झूम ए २४ वगैरेच नव्हे तर चक्क एन डिव्ही आणि इम्याजीन सारखे च्यानेल्स सुद्धा हे कार्यक्रम प्रदशीत करीत असतात.
याच्या मागचे अर्थशास्त्र समजत नाही.
फ्रॉड म्हणावा तर ग्राहकाना फसवले जाते म्हणजे नेमके कसे? त्याचे नुकसान कसे होते?
कोणत्याही जाहीराती नसताना हे सर्व चालते कसे?
टेलिफोन एंगेज्ड ठेवुन कंपनीला फायदा कसा होतो?
माननीय मिपाकर यावर प्रकाश टाकतील का?
(याला असले टुकार कार्यक्रम बघायला आणि संध्यानंद ची कोडी सोडवायला वेळच कसा मिळतो असले मुलभुत प्रश्न आपण विचारालच)
http://www.youtube.com/watch?v=DTwAF9O6zTE&feature=player_embedded
वाचने
2523
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
एकदा करुन बघा .
आधी तुम्हाला कितीचा झब्बू बसलाय ते सांगा.
टेलिफोन एंगेज्ड ठेवुन कंपनीला फायदा कसा होतो?
-------------------------------------------------------------
तुमचे एका मिनिटाला ३ रु, ५रु असे जातील ....मग फायदा कोणाचा....
आणी तुमचे उत्तर बरोबर आले तरी त्याची रक्कम तुम्च्यापर्यत येईपर्यंत अर्धी तरी होत असेल(असा अंदाज)
In reply to तुम्ही फोन केला आहे का कधी ? by निवेदिता-ताई
३ किंवा ५ नाही, फक्त १२ !!!
In reply to ३ किंवा ५ नाही, फक्त १२ !!! by विश्वनाथ मेहेंदळे
माझ्या माहिती प्रमाणे सर्किट पुर्ण झाल्याशिवाय फोन चे मिटर चालू होत नाही.
म्हणजे समजा अ ने ब ला फोन केला ब चा फोन समजा एंगेज्ड आहे. अ ला बिल कसे येइल? जेव्हा ब फोन उचलेल तेव्हा सर्किट पुर्ण होइल आणि मग मिटर चालू होइल ना?
(कन्फ्युज्ड कापूसकोन्ड्या)
हे प्रीमियम नंबर्स असतात. त्यावर आलेल्या फोन्सवरुन टेलिफोन कंपनीचे चार्जेस वळते झाले की उरलेले कार्यक्रम करणार्या कंपनीला मिळतात. अशा प्रकारची सर्व्हिस टेली-कंपन्यांनी न देणे हाच मुळातला उपाय आहे.
बक्षीस कोणालाच लागत नाही हेवेसांनल. बराच काळ नुसते बघत बसलात तरी कळेल की सर्वच जण मूर्ख उत्तरे देत असतात आणि याचाच सरळसरळ अर्थ की प्रेक्षकांपैकी कोणाचाच फोन जेन्युईनली लागलेला नाही. नीट ऐकलं की उत्तर देणार्यांच्या टोनवरुनही खोटेपणा कळतो. गेलाबाजार त्या निवेदिकेचा अॅग्रेसिव्ह आग्रह आणि सेल्समनसारखी बडबड यांवरुनतरी क्लू मिळायला हवा..
भाबडे लोकच अशा लाईन्सवर फोन लावू शकतात.
माझ्या माहिती प्रमाणे सर्किट पुर्ण झाल्याशिवाय फोन चे मिटर चालू होत नाही.
म्हणजे समजा अ ने ब ला फोन केला ब चा फोन समजा एंगेज्ड आहे. अ ला बिल कसे येइल? जेव्हा ब फोन उचलेल तेव्हा सर्किट पुर्ण होइल आणि मग मिटर चालू होइल ना?
(कन्फ्युज्ड कापूसकोन्ड्या)
In reply to एंगेज्ड फोनला पैसे कसे पडतात? by कापूसकोन्ड्या
प्रिय मित्रा ...
एक साधे उदाहरण देतो..
तुमच्या कडे असलेल्या फोन वरुन तुमच्या सर्विस प्रोवायडर ( उदा: एअरटेल, आयडीया ...) च्या कॉल सेंटर ला फोन केल्यावर लगेच कोणताही executive तुमच्याशी बोलला नाही तरी तुमचा कॉल टाईम सुरु असतो.. (बर्याचदा फ्री सर्विस असल्याने आपण याकडे लक्ष देत नाही.)
त्याच प्रमाणे अश्या कार्यक्रमांना तुम्ही जर फोन केला तर कॉल रीसीव्ह होतो. पण अलर्ट येतो की फोन बिझी आहे तुम्ही वेटींग मध्ये आहात किंवा welcome in call center आता आम्ही तुमची लाईन मेन लाईन ला कनेक्ट करत आहोत कृपया प्रतिक्षा करा....(आणि मग तुम्हाला १०-२० मिनिटे तसेच थांबावे लागते.)
(प्रत्यक्ष कधीच अनुभव घेतला नसल्याने चु.भु.दे.घे)
तुम्ही फोन केला आहे क कधी ?