"टिम अण्णा"ने दिले दिग्वीजयसींगना सडेतोड उत्तर
दिग्वीजयसींगनी Twitterवर अण्णांबद्दल म्हणले होते की "अण्णा मा. नानाजी देशमुख यांचे सचीव होते". त्याचवेळी २७ डिसेंबरपासुन होणा-या उपोषणाची खिल्लीसुद्धा उडवली.
याला किरण बेदी यांनी Twitterवर दिग्विजय सिंह आणि नानाजी देशमुख यांचे एकत्रित छायाचित्र प्रकाशित करून कॉंग्रेसला चांगलेच प्रत्युत्तर दिले.
नानाजी देशमुख यांची भेट घेतल्याने जर का एखादी व्यक्ती संघाचा एजंट ठरत असेल तर मग माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सुद्धा नानाजींची भेट घेतली होती. कॉंग्रेस पक्ष कलामांनाही संघाचे एजंट ठरवणार का? असा सवाल बेदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
मिसळपाव