मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिऊताई चिऊताई

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चिऊताई चिऊताई नकोस फिरकू अंगणात ग - मम्मी-डॅडीचा गुडबॉय कधीच तुला विसरला ग ! बोकेभाऊ बोकेभाऊ टपून बसला ना तुम्ही - मोठ्ठा गोळा लोण्याचा कधीच मटकावला आम्ही ! बोकडदादा बोकडदादा किती अजागळ दिसता हो - तुमची दाढी पाहुन बायको भांडत नाही का हो ? हत्तीराव हत्तीराव ब्रश कसा हो वापरला - दोन दात दोन दिशांना नीट का नाही धरला ? कावळोबा कावळोबा उगाच करता काव काव - संतूर लक्स टाईड रिन वापरून तरी बघा राव !

वाचने 1985 वाचनखूण प्रतिक्रिया 4
विदेश भाऊ, तुमच्या बालगीतांचे आता आम्ही अधिकृत 'फ्यान' असं जाहिर करतो. कधीही तुम्ही तुमच्या बालकवितांचं पुस्तक प्रकाशित केल्यास आम्ही ते स्वखर्चाने विकत घेऊन संग्रही ठेऊ अशी इथेच नोंद करून ठेवतो. हे बालगीत आवडलंय हे वे. सां. न ल. :-)

पक पक पक 25/12/2011 - 17:43
तुमची दाढी पाहुन बायको भांडत नाही का हो ? हे बालगीतच आहे पण वेगळ्या बालांचे गीत आहे असे वाट्ते, असो पण प्रत्येक दाढीवाल्याची बायको भांडकुदळ असते असा काही समज आहे का तुम्चा...?

अत्रुप्त आत्मा 25/12/2011 - 23:13
विदेश भाऊ..विदेश भाऊ खुपच छुंदल देताय खाऊ। अचाच अजुन दिलात नाय ..तल तुम्च्यावल छोलिन चावली माऊ...! :innocent:

In reply to by अत्रुप्त आत्मा

पक पक पक 26/12/2011 - 08:22
विदेश भाऊ..विदेश भाऊ खुपच छुंदल देताय खाऊ। अचाच अजुन दिलात नाय ..तल तुम्च्यावल छोलिन चावली माऊ लय भारी ! लयच भारी!! आवडले आहे....