ऐका हो ऐका - 'टीम अण्णांच्या उपोषणाचा इव्हेन्ट उद्यापासून..!
ऐका हो ऐका...
"उद्या मंगळवार दि २७ डिसेंबर पासून मुंबईतल्या एमएमआरडीए मैदानावर टीम अण्णा कंपनीच्या उपोषणाचा इव्हेन्ट साजरा केला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी आपापले कामधंदे सोडून तिथे जमायचं आहे, 'लोकपाल लोकपाल जनलोकपाल..' इत्यादी देशभक्तिपर गीतं गायची आहेत, 'मी म्हणेन तीच पूर्व-आम्ही संसद मानत नाही' आदी मुक्ताफळे उधळणारे देशातील एकमेव हुशार-कायदेपटू-तज्ञ वगैरे वगैरे असलेल्या रा. रा. अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांची भाषणं ऐकायची आहेत..!
आमचं मत मात्र केजरीवालांपेक्षा अंमळ वेगळं आहे. आम्हाला आमच्या भारतीय राज्यघटनेचा आत्यंतिक आदर आहे.
मिसळपाव
भगवान विष्नू
दिनांक १