Skip to main content

आठवणीने दे !!

लेखक फिझा
Published on सोमवार, 26/12/2011
आठवणीने दे !! चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे , क्षितिजावर लुकलुकणारा एक तर मात्र आठवणीने दे !! ढगांनी भरलेले आभाळ नाही मागत तुझ्याकडे , थेंबा थेंबा ने बरसणारा एक ढग मात्र आठवणीने दे !! बेभान कोसळणारा मुक्त पाऊस नाही मागत तुझ्याकडे , श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे !! बेधुंद करणाऱ्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे , जाताना एक मोगऱ्याची कळी मात्र आठवणीने दे !! उसळणारा बेछूट समुद्र नाही मागत तुझ्याकडे , शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवणीने दे !! लखलखणाऱ्या दिव्यांची माळ नाही मागत तुझ्याकडे , सप्तरंग दाखवणारी एकच किरण शलाका मात्र आठवणीने दे !! पौर्णिमेचा पूर्ण चंद्र नाही मागत तुझ्याकडे , तुझ्या मनात ध्रुव ताऱ्याची जागा मात्र आठवणीने दे !! भिजवणारा डोळ्यातील घन ओला नाही मागत तुझ्याकडे , बंद डोळ्यातील एक थेंब मात्र आठवणीने दे !! तुझ्या भेटीचे आश्वासन नाही मागत तुझ्याकडे , तू भेटून गेल्याचे एक स्वप्नं मात्र आठवणीने दे ! ! जगाशी लढण्याचे धैर्य , नाही मागत तुझ्याकडे जगाचा विसर पडावा अशी जवळीक मात्र आठवणीने दे !! हे क्षणभंगुर आयुष्य नाही मागत तुझ्याकडे , मी नसताना आकाशाकडे एक नजर मात्र आठवणीने दे !! माझ्या आठवणीने गहिवरलेले श्वास नाही मागत तुझ्याकडे , नाव माझे पुसताना टाकलेला एक उसासा मात्र आठवणीने दे !! मुठीएवढे तुझे हृदय नाही मागत तुझ्याकडे , माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे !!
लेखनविषय:

याद्या 1419
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आवडली. मस्त आहे!!
चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे , क्षितिजावर लुकलुकणारा एक तर मात्र आठवणीने दे !!
इथे 'तारा' हवे ना?

जगाशी लढण्याचे धैर्य , नाही मागत तुझ्याकडे जगाचा विसर पडावा अशी जवळीक मात्र आठवणीने दे !! मुठीएवढे तुझे हृदय नाही मागत तुझ्याकडे , माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे !!
खुपच सुंदर !!