Skip to main content

गांधी टोपी

लेखक सू डोकू यांनी शुक्रवार, 20/01/2012 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
परमपूज्य लाल बहादूर शास्त्री व पंडित जवाहरलाल नेहरु हे पांढरी टोपी वापरत असत, पण ती टोपी त्यांच्या नांवाने कधीही प्रसिध्द झाली नाही. त्या टोपीला शास्त्री टोपी, नेहरु टोपी असे नांव न पडता गांधी टोपी हे नांव कसे पडले? व ते नामकरण कुणी केले? याचा जाणकारांनी खुलासा करावा. आमच्या माहितीनुसार महात्मा गांधीजींनी पांढरी टोपी (जी आज त्यांच्या नांवाने प्रसिध्द आहे ती स्वतःच्या डोक्यावर) कधीही घातल्याचे ऐकिवात, वाचण्यात व पहाण्यात नाही. जर कुणा जाणकारांकडे याची माहिती असेल तर ती द्यावी. व महात्मा गांधींजींचा (गांधी) टोपी परिधान केलेला 'तो' दुर्मिळ अप्रकाशित फोटो येथे अपलोड करावा. धन्यवाद!

बुरगुंडा (बरमुडा) आन आकूडकी कापलेली प्यँट (थ्रीफोर्थ)

लेखक सू डोकू यांनी गुरुवार, 19/01/2012 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी रामराम, आप्ले म्हन्ने थोडक्यात सांगा या यस्टी स्ट्यँडवर चौकशीच्या खिडकीवर ल्हेल्यानुसार आमी आमचं म्हन्नं आपनापुडं थोडक्यात मांडतो, परवाच आमी मंबयला गेलो व्हतो तवा तितं येक दिवस आमच्या मित्राकडं मुक्काम पडल्यानं आमाला पुर्षांनी घरात कोन्ते कपडे घालावे ह्याईषई प्रश्न पडला. गावी आल्यावर लै टकुरं खाजवून ठरवलं की, मिसळपावच्या गाडीवर आन्ना, दादा, नाना, मामा, काका, मास्तर, गुर्जी, वकील ह्यासारकी लै बुद्दीमान आन इच्यारवंत मंडळी बसलेली (पडीक) असत्यात तवा त्यास्नीच ईच्यारावं म्हनून ठरवून टाकलं.

" शोध तिचा लागेना ...! "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 19/01/2012 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे शोधू तुला एकटीला किती शोधू तुला एकटीला तुझा विरह असह्य होतोय तुझ्याविना चडफडतोय ! येताजाता बाहेर फिरायला कामाला आणि उंडारायला तुझी साथ असायची ! लांब जवळ गेलो तरी तू बरोबरच असायची ! दारापासून कार्यालयापर्यंत- मंदिरापासून मद्यालयापर्यंत तुझ्याविना बाहेर पडायला लाज वाटते मला , तुझ्याशिवाय बाहेर जायला तोंड नाही मला , 'प्रिये'च म्

"आई"

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 19/01/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी ला असताना आंम्हाला फकीरराव शिंदे यांची 'आई' ही कविता होती. शाळेत असताना आमच्या सर्वात जास्त आवडत्या कवितांमधीलच ही एक कविता! फ.मु. शिंदेंनी आपल्या प्रभावि अन् नेमक्या शब्दांत आई या शब्दाचा व्यापक अर्थ पटवुन दिला होता. तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा होता. अशीच एक 'आई' या शिर्षकाची कविता याअगोदरच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये होती, काळाच्या ओघाने ती विस्मरणात गेली होती, पण फ.मु. च्या कवितेने- त्या कवितेची आठवण पुन्हा ताजी केली. 'यशवंत' यांची होती ती कविता! फ.मु.ची कविता जेथे हृदयस्पर्शी होती तिथेच यशवंत यांची कविता मनाच्या खोल गर्तेत सलणारी, हृदयाला चटका देणारी होती.
काव्यरस

लहानपणीच्या गोष्टी

लेखक तिमा यांनी गुरुवार, 19/01/2012 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय कधीच नव्हता. शाळेमधे परसेंटेज व नंबर खाली यायचा तो याच विषयामुळे. त्यातून मोठ्या बहिणी त्याच शाळेत असल्यामुळे तर मला चांगलीच बोलणी बसायची. त्या दोघींची चित्रकला अप्रतिम होती, अगदी बोर्डावर त्यांची चित्रे लावली जात. मला मात्र माणसाची फिगर अजिबातच जमत नसे. तशी इतरांची सुंदर्, सुंदर चित्रे बघायला मला खूपच आवडत. पण मला येत नसलेली कला, अशी मारुन मुटकून कशी येणार हे समजत नसे. वर्गात ३/१० मार्क मिळवणारा मी घरुन काढून आणलेल्या चित्रांना मात्र ९/१० मिळवत असे. पण ते मार्कस देताना चित्रकला शिक्षक, छदमीपणे हंसून, बहिणीने काढलेलं ओळखताय हं गाढवा!

(जीव गुंतला)

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 19/01/2012 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ गीत : खेळ मांडला (नटरंग) प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला...
काव्यरस

माझा निबंध.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 19/01/2012 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझा निबंध..... एकदा वर्गात ऑफ पिरिअड होता. मस्त पुस्तक वाचत होतो....मार्क ट्वेन चे....टोम सायर....बाईनी निबंध दिला.... "मला पंख असते तर" कोण मुंबईला गेला.....कोण हिमालयात गेला...(एक तर पार अमेरिकेत गेला....त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते..)...तर कोण पक्ष्यान बरोबर गप्पा मारत बसला.... आता पुस्तक वाचावे की, निबंध लिहावा....मग काय पटकन निबंध लिहिला आणि पुस्तक वाचायला लागलो..... बाईनी बघितले कि हे काय...हा मुलगा लिहित का नाही?

ठ्या... ड्वाले पाणावले...esakal.com

लेखक मन यांनी गुरुवार, 19/01/2012 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. (नेहमीप्रमाणेच) हापिसात रिकामपणीचे उद्योग करण्यात आम्ही व्यस्त होतो. जरा जालावर पेपर वगैरे वाचावेल म्हटले म्हणून esakal उघडला. तिथे चक्क http://www.esakal.com/eSakal/20120119/4672807682597002147.htm ही बातमी दिसली. त्यातील एकदम भारी वाटलेला मजकूर देतोयः- इराणवर हल्ल्याचा विचारही करू नका (युएनआय) Thursday, January 19, 2012 AT 03:00 AM (IST) Tags: jerusalem, iran, international जेरुसलेम - इराणवर हल्ला करण्याचा कोणताही विचार इस्राईल करत असेल, तर त्यांनी त्यापासून लांब राहावे.

आपण आधुनिक आहोत का (अधु) निक?

लेखक वाटी यांनी गुरुवार, 19/01/2012 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सध्या समाजाचा कल हा आधुनिकतेकडे झुकलेला दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक ठीकाणी आपण आधुनिकतेचाच जास्त अवलंब करतांना दिसत आहोत. असो पण या आधुनिकतेमुळे खरंच आपण (अधु) निक तर नाही ना होत चाललोय? असा विचार मनात आला. असो तरीही यावर निव्वळ चर्चा व्हावी हाच हेतु. उदाहरणार्थः १) आज आपण घर बसल्या भ्रमणध्वनीवरून आपल्याला काय जिन्नस हवे आहेत याची यादी देऊन मोकळे होतो त्यामुळे आपल्याला सहजच घर बसल्या हव्या त्या गोष्टी उपलब्ध होतांना दिसतात.