Skip to main content

जे लेनो आणि सुवर्णमंदीर

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 03/02/2012 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना जे लेनो माहित नाही त्यांच्याकरता: http://en.wikipedia.org/wiki/Jay_Leno सध्या अमेरिकेत रिपब्लिकन पक्षात रणधुमाळी चालू आहे. चार उमेदवार राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवण्याकरता नामांकन मिळवायला झुंजत आहेत. त्यातला एक आघाडीचा अतीश्रीमंत उमेदवार म्हणजे मिट रॉमनी. जे लेनोने त्याच्या एका कार्यक्रमात तमाम उमेदवारांची घरे दाखवली. एक विनोद/उपरोध/टिंगलीचा प्रकार म्हणून मिट रॉमनीच्या घराच्या जागी त्याने चक्क सुवर्णमंदीरचा फोटो दाखवला! अर्थात रॉमनीच्या श्रीमंतीवर एक उपरोधिक टोमणा मारला.

!!...'मानवी भूकंप'...!!

लेखक सन्दीप१२३३० यांनी गुरुवार, 02/02/2012 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
!!...'मानवी भूकंप'...!! गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत नवे स्फुरलेले.. मानवी भूकंपामुळे जरी झाली हो

नमस्कार ई मासिक

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 02/02/2012 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !!! ..बर्‍याच दिवसानी आवतरतोय आज .. अर्थातच एका नव्या उपक्रमाच्या निमित्ताने ..गेले काही दिवस सगळ ध्यान तिकडेच होते ..तेच आज तुमच्यापुढे सविनय सादर करत आहे .."नमस्कार" ई -मासिक.. नमस्कार मागची माझी भुमिका तर गेली जवळपास ३-३.५ वर्षे या नेट च्या विश्वात मी वावरत आहे ...पडलो ,धडपडलो ,पुढे गेलो ...सगळी काही झाले .. हे सगळ करताना मित्र परीवारही वाढत गेला . काही खुप छान संधी मिळाल्या. अशाच बर्‍याच ठिकाणी चर्चा,गप्पांमध्ये मराठीतील नेट विश्वाबाबत चर्चा सुरु असायची..आणि त्यातुन एक मुद्दा पुढे यायचा की . हे इ-जग अधीक छान करण्यासाठी काय काय करता येईल ?

निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 02/02/2012 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला थोड्क्यात ओळ्ख /इतिहास :- १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे.

ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता...

लेखक चैतन्य दीक्षित यांनी गुरुवार, 02/02/2012 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
''ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता'' म्हणते सखी मला, अन् हळूच हसते । तळहातांवर चेहरा घेउन, उत्सुकतेने समोर बसते । समजत नाही काय करावे, जुनीच कविता मांडावी? की स्वस्थ बसावे- -समोरची वाचावी कविता? वाचू देते खुशाल तीही, केवळ माझ्या कवितेकरता । क्षणाक्षणाला अधिरा होतो रंग तिचा, मी बुडू लागतो तिच्यात, तेव्हा पुनश्च हसते, अन् उंचावुन भुवया म्हणते, विसरलास का रे कविता ती? उत्तर देण्याइतके नसते भान मला, मी तिलाच केवळ पाहत बसतो, बऱ्याचशा माझ्या कवितांचा जन्माचा क्षण असाच असतो !! - चैतन्य

भारत चीन : अमेरिकेचा आगाऊपणा

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 02/02/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर खात्याचे संचालक जेम्स क्लीपर यांनी भारताची चीन शी लढण्याची तयारी असल्याची बातमी करून विनाकारण खळबळ माजवली आहे. आमच्या घरात आम्ही कसली तयारी करतो आहे आणि काय करतो आहे हे आमच्या परवानगी शिवाय जगभर बोंबलून सांगण्याची यांना काय आवश्यकता आहे ? भारतचे धोरण स्पष्ट आहे. सामंजस्याचे आहे. कुठल्याच शेजाऱ्याशी कुरापत काढून देशवासियांना विनाकारण युद्धाच्या खाईत लोटण्याचा भारताचा इतिहास नाही. कुणी कुरापत काढली तर संरक्षण करण्याचे सामर्थ्य ठेवणे या पलीकडे आम्हाला काही करायचे नाही. आपले अन्य प्रश्न देशाला महत्वाचे वाटतात हे स्पष्ट दिसते आहे.