Skip to main content

कृपाशंकर सिंह यांच्या पुस्तकाला शीर्षक सुचवा

लेखक सू डोकू यांनी सोमवार, 05/03/2012 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
कृपाशंकर सिंह यांना आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केल्याचा साक्षात्कार नुकताच झाला असून, या आपल्या जीवनातल्या वाटचालीविषयी त्यांनी एक पुस्तक लिहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सतरंज्या उचलण्यात राजकारणांत आयुष्य घालविणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच, आयुष्यभर लोकलच्या हँडलला लटकून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना जे आजपर्यंत कधी जमले नाही ते कृपाशंकर सिंह यांना कसे शक्य झाले याचे रहस्य या पुस्तकातून उलगडले जाणार आहे. ही बातमी आम्हाला कळताच आम्ही त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचे हक्क त्वरित मिळविले आहेत.

७.४७ ची कर्जत ट्रेन

लेखक रेशा यांनी रविवार, 04/03/2012 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
"आज पण लेट का ग ट्रेन?" "अरे देवा म्हणजे परत घरी जायला उशीर आणि सगळाच गोंधळ ग!!" , "रेल्वे म्हणजे ना काही सिस्टिमच नाही", "अगदी वैताग आहे, "अरे ४ दिन भी ट्रेन time से आई ना, तो वो central railway ही नही" ... C. S .T .स्टेशन वरची ती एक संध्याकाळ असते .. थोडक्यात दिवस नॉर्मल असतो, central railway च्या trains पुन्हा एकदा काही अपरीहार्य, घोषित अथवा अघोषित कारणामुळे उशिराने धावत असतात ......

कबुतर...

लेखक मदनबाण यांनी रविवार, 04/03/2012 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी हा पक्षी आपल्या ( पक्षी:- माझ्या) लयं म्हणजी लयं डोक्यात जातो बघा ! का ? कसं हाय बघा, ते रस्त्यावरच्या मोकाट कुत्तरड्यां नंतर माझ्या साखर झोपेचे पार खोबरं करण्याचा मोलाचा वाटा ही मंडळी उचलत्यात ! च्यामायला ! नाय तांबड फुटल आकाशा मंदी तर् ह्यांच हुं हुं हुं हे असल इचित्र ओरडनं चालु व्हतं बघा ! बाकीचे पक्षी कसं गोड गात्यात... पर ह्यो काय इचित्रच आवाज काढतो ! पार डोक्याची ( हे हे हे समजलचं असलं तुम्हासनी ! ;)करुन टाकतो. कुत्र्यांन नंतर माणसांच्या वातावरणाशी जुळवुन घेणारी ही जमात...ज्या पशु पक्षांना जमले नाही त्यांची संख्या कमी झाली,म्हणजी चिमनी,कावले... पर ह्याची प्रजा अमाप वाढली !

मिपावरील उत्तमोत्तम लेख वाचायचे असतील तर...

लेखक Pearl यांनी रविवार, 04/03/2012 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील उत्तमोत्तम लेख वाचायचे असतील तर... (काय करावे ?) आजवरच्या मिपावर वावरण्याच्या अनुभवावरून असं वाटतं की मिपावर कधी कधी खूपच छान, सुंदर, अप्रतिम असं काही काही वाचायला मिळतं, जे मी माझ्या सोयीसाठी वैयक्तिकरित्या वाचनखूण म्हणून साठवून ठेवू शकते. पण काही वेळा जसे की १) मिपा वर रोज लॉगइन व्हायला जमत नसेल/ वेळ नसेल तर २) किंवा समजा मी मिपाची आजच सभासद झाली असेन तर मला याआधीचे अनेक चांगले चांगले लेख/पा.कृ. मिस होतात.

अंबरात फिरुनिया उगवतो....

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 04/03/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ || बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा ......... || १ || स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी निळ्या बोलक्या..
काव्यरस

अफू

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/03/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
सांगली बीड मध्ये अफूच्या शेतीचे प्रकरण गाजत आहे.. शेका~या वर अटक करून खटले भरले जात असल्याचे वाचनात येते. शेतकरी अफू कडे आता नगदी पिक ह्या दृष्टीतून बघत आहे.८०० रुपये किलो भाव चालू आहे. शरद जोशी यांनी सरकाराने परावाने द्यावेत व ह्या शेतीस कायदेशीर मान्यता द्यावी असा विचार मांडला आहे.. अफू तयार करणा~या कारखान्यावर बंदी आणा ...पिका वर बंदी नको...शेतक~याना का त्रास असा खडा सवाल जोशी यांनी उभा केला आहे.... उसा पासून दारू व हात भट्टी करतात म्हणून उस शेतीवर बंदी आणणार का? सरकारचे धोरण शेतक~यास कर्ज बाजारी करते.. पोलिसांनी हप्ते घेणे बंद केले तर हि शेती होईलच कशी?असा टोला पतंग रावांनी मारत स

मालविका

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/03/2012 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ रात्रीची होती..त्यांतून अमावास्या असल्याने वातावरण काळोखात बुडून गेले होते.. त्या निर्जन भागात तो जीर्ण प्रासाद भयाण पणे उभा होता...आत एक मंद पणे मिणमिणता दीप तेवत होता.. प्रासादाच्या सोपानावर मालविका कुणाची वाट बघत बसली होती? मुख कमल म्लान झाले होते.व पाणीदार नेत्रातली प्रभा मंद झालेली होती..नजरेत एक क्लांत शिणलेला भाव होता.तरी मालविकेचे सौंदर्य वेड लावेल असेच होते..गौरांगनेची काया फिकट पडली होती..तर अधर सुकलेले वाटत होते.. दूर बाजूला एक मरणोन्मुख असा वृद्ध बसला होता...देवदत्त असे त्याचे नाव आहे..शरीरावरची कातडी लोंबत होती..डोक्यावरचे केस गेलेले...डोळे आत खोल गेलेले ..शक्तिहीन असे ते कले

गंमत शब्दांची ( रंगपचमी धमाल).

लेखक कलंत्री यांनी रविवार, 04/03/2012 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
रंग आणि शब्दांची धमाल करुन आपल्या भाषेतील असणार्‍या अनेक शब्दातील रंग असलेला शब्द ओळखू या. १. एक वाद्य - - - रं ग. २. एका रागाचे नाव - रंग. ३. मन / अंतःकरण - - रंग. ४. बु ध्दीबळाचा खेळ याचे एक नाव - - रंग. ५. निपुण, कुशल, वाकबगार - रंग - ६. हाताच्या / पायाच्या शेवटच्या बोटाचे नाव - रंग - ७. घोडा - रंग - ८. विष्णु, कृष्ण -रंग -- ९. हनुमान --रंग -- १०. त्वचेमधील असणारे द्रव्य रंग-- ११. नाट्यगृह रंग---, रंग--- १२.

रेल्वे कोर्ट, एक अनुभव

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी शनिवार, 03/03/2012 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
ते कॉलेज चे मयूर पंखी दिवस होते. हॉटेल व्यवस्थापन शिकत असतांना संध्याकाळी आम्हाला मुबई मधील अनेक पंचतारांकित हॉटेलात वेटिंग साठी जावे लागायचे. म्हणजे काय तर स्वतःचा पोकेट मनी सुटावा व आपण जे पुस्तकी शिक्षण घेत आहोत त्याची तोंड ओळख व्हावी म्हणून ह्या हॉटेलात आम्हाला काम करायला जावे लागायचे. १९९९ साली १५० रुपये दिवसाचे वर पंचातारीकीत भोजन ( प्रती थाळी ८०० ते ....) वर उंची विदेशी मद्ये अर्थात पैसा सोडल्यास ही खानपान सेवा रात्री बारा नंतर तळे राखी तो पाणी चाखी किंवा हाजीर तो वजीर ह्या न्यायाने आम्हास उपभोगास मिळायची.