मिपावरील उत्तमोत्तम लेख वाचायचे असतील तर... (काय करावे ?)
आजवरच्या मिपावर वावरण्याच्या अनुभवावरून असं वाटतं की मिपावर कधी कधी खूपच छान, सुंदर, अप्रतिम असं काही काही वाचायला मिळतं, जे मी माझ्या सोयीसाठी वैयक्तिकरित्या वाचनखूण म्हणून साठवून ठेवू शकते.
पण काही वेळा जसे की
१) मिपा वर रोज लॉगइन व्हायला जमत नसेल/ वेळ नसेल तर
२) किंवा समजा मी मिपाची आजच सभासद झाली असेन तर मला याआधीचे
अनेक चांगले चांगले लेख/पा.कृ. मिस होतात. (वाचायचे राहून जातात.)
आणि सध्या असा कोणताही पर्याय मिपावर अस्तित्वात नाही की जेणे करून मला पर्टिक्युलरली(नेमके) हेच लेख वाचता येतील किंवा असं म्हणू की अशी कोणतीही सुविधा सध्या अस्तित्वात नाही की जेणे करून हे चांगले, सुंदर लेख ट्रॅक करता येतील.
तर असं काही करता येइल का की
१)प्रत्येक लेखाला वाचक १ ते ५ स्टार पैकी काही रेटिंग त्याच्या मनाने देउ शकतो. लेख ज्या प्रमाणात आवडला त्याप्रमाणात स्टार देता येतील आणि खूपच जास्त आवडला तर ५ स्टार.
त्यायोगे चांगल्या चांगल्या लेखनाचा ट्रॅक राहील असं वाटतं.
२)किंवा कमीत कमी लाइक(लेखन आवडले) चे बटन दिले तरी ज्या लेखाला जास्तीत जास्त लाइक मिळाले आहेत त्या लेखनाचा ट्रॅक राहील.
[ कारण प्रतिक्रियांची संख्या हा काही (चांगल्या लेखांचा) निकष ठेवता येतो असं मला वाटतं नाही कारण बरेच वेळा अवांतर होत असते.]
मला माहिती आहे की वरील पर्याय हे सांगायला/ म्हणायला सोपे असतील पण आमलात आणायला कठिण असेलही तरी पण मला हा विचार मांडावासा वाटला.
याबाबत जाणून घ्यायला आवडेल की
१) मिपाकरांना याबाबत काय वाटतं किंवा
२) कोणाकडे चांगले लेख ट्रॅक करण्यासाठी अजून काही उपाय / युक्ति(आयडिया) असल्यास
कृपया सुचवा.
वाचने
3463
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
पर्ल तै ,हा उपाय योजला होता
मी नवा आहे व मला असे वाटते
>>लेखाची गुणवत्ता अजिबात ठरवू
ह्ये लई ब्यास !
In reply to >>लेखाची गुणवत्ता अजिबात ठरवू by Pearl
चला... कुणालातरी जाणवला
हॅ हॅ हॅ
उपाय
बेष्ट
In reply to उपाय by रमेश आठवले
काय चांगल, काय वाईट हे
बाकीचे उपाय मेमरी /
स्टार्स च्या ऐवजी फु बाई फु