Skip to main content

चॉकलेट सुफ्ले

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 09/04/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
चॉकलेट सुफ्ले हा प्रकार तसा करायला खटपटीचा. बेस म्हणून वापरले जाणारे बेचामल सॉस नीट जमणे महत्वाचे. त्यामुळे मी बरेचदा शॉर्टकट वापरते. ही शॉर्टकट रेसिपी गुड हाऊस किपिंग मासिकातील आहे. साहित्य: ४ औस बिटरस्वीट चॉकलेट चिप्स १/३ कप स्विटन्ड कंडेन्स्ड मिल्क २ अंड्याचा बलक ३ अंड्यातले फक्त पांढरे रॅमिकिन्सना आतुन लावण्यासाठी थोडे बटर आणि १ टे स्पून ग्रॅनुलेटेड साखर ( बारीक दळलेली साखर) थोडी आयसिंग शुगर वर भुरभुरवण्यासाठी कृती: ओवन ३७५ फॅ.

आता कंटाळा आलाय....

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 09/04/2012 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
आता कंटाळा आलाय मोठं होऊन जगण्याचा उगाच मक्ख चेहऱ्याने जगभर वावरण्याचा कधी वाटत आपलेही लाड कोणीतरी करावेत अन भीती वाटल्यावर हळूच कुशीत घ्यावे कधी दुडक्या चालीने रान भर हुंदडाव तर कधी भर पावसात चिंब भिजावं कधी कडक उन्हात बर्फाचे गोळे खावे वाट दिसेल तिकडे वेड्या ओढीने पाळावे कधी पोटात दुखतंय सांगून शाळेला बुट्टी मारावी अन बाबांच्या भीतीपोटी आईशी सलगी करावी कधी जेवताना चिऊ काउचे घास कोणी भरवावे मग झोपताना काका दादाबरोबर घोडा घोडा खेळावे नेहमीच आपल्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं म्हणून काहीही करावं अन मनासारखा नाही झाल तर फुगून बसावं आता अपेक्षांचे ओझे वाहताना स्वतःला रोज्गाड्याला जुंपून बस
काव्यरस

बेअरलाऊख पेस्टो व पास्ता

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 09/04/2012 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅलियम अर्सिनम, रॅमसन्स ,वाइल्ड गार्लिक,ब्रॉड लिव्ड गार्लिक अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या बेअरलाउखच्या जुड्या आठवडी बाजारात साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दिसायला लागतात. ह्या पानांचे करतात तरी काय? असे आमच्या त्सेंटा आजीला विचारले असता तिने सांगितले याची पेस्टो करतात. ही पाने फक्त मार्च,एप्रिल मध्येच मिळतात म्हणून त्याची पेस्टो वर्षभर टिकेल अशी करुन ठेवता येते. हिरव्या रंगाची ही पेस्टो न्यूडल्स, पास्ता,सलाड, सूप इ. मध्ये वापरतात.

टायटॅनिक 4D

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/04/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे.

सत्याग्रही...

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 09/04/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
( ऑगस्ट २०११ मध्ये हा लेख मी लिहिला होता. मिपावर टाकला नव्हता. आज काही कारणांनी या विषयाची आठ्वण झाली त्यामुळे ठेवणीतुन बाहेर काढला. संदर्भ काही महिन्यांपुर्वीचा असला तरी विषय त्रिकालाबादित आहे ! ) ___________________________________________________________________ 'सत्याग्रही' मोर्चांचा वणवा पसरलाय देशभर. जल्लोष आहे. चीड आहे. उन्मादही आहे. सरकारी खजिन्यातल्या करोडो रुपये लंपास करणा-या बदमाषांच्या बातम्या कानावरून वा डोळ्यासमोरून जाताना प्रत्येक वेळी जो संताप झाला होता आणि जो असहाय्यपणे, हतबल होऊन दाबून ठेवला होता त्याला अहिंसक मार्गाने मोकळे करण्यासाठी समस्त भारतीयांना एक नेतृत्व मिळालंय.

विडंबना..

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 09/04/2012 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
भयाची सुरवात झाली ग्रिष्माच्या शुक्ल पक्षात.... थांबली दाराशी रुग्नवाहिका दिव्याचि निळ्या अल्पतात, चार पाऊंड घेउन अधिकचे उतरली विव्हळंत माय माझी.... सुखद, दुखद, वेदनेचि ति बळी, सोबतीला गनगोत माझे फक्त सुखद वेदनेचेच सोबती... निघाले सारे प्रसुतीग्रुहाकडे तयारी जन्माची, मरणाची.. लागला दिवा लाल बंद दारावर... स्मशान शांतता.. चालले आत, काही केल्या कळेना वेदनेच्या आंर्त हाकि काही केल्या उमजेना टवकारले काने ,सारीच रडण्याच्या त्या मंगल वाटेवर पण, आज अगा घडले असे नवलंच नि मी जन्मलो हसत,हसतच... ऐकता आवाज ,भांबवले सारेच माय वेदनोत्तर झाली शांत, बाप झाला घामाघूम...
काव्यरस

हे बंध रेशमाचे

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 09/04/2012 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी चिवचिवत येणार्‍या चिमण्या हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. सकाळी बाहेरच्या खोलीचे काचेचे दरवाजे सरकावायला जरा उशीर झाला तर बाहेर आवाज सुरू झालेला असतो. दारं उघडायची खोटी. चिवचिवाटाने जणु ’सुप्रभात’ करत चिमण्या आंत शिरतात. छज्जावर तांदुळ टाकले की प्रथम आपल्या थव्यातील इतर चिमण्यांना साद घालणार आणि मग एकेक दाणा टिपायला सुरुवात. एकिकडे चिवचिवाट सुरुच असतो. अनेक वर्षे हे नियमितपणे होत असल्याने आता सरावाने मला साधारण तीन प्रकारचे बोल लक्षात येउ लागले आहेत.