मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आता कंटाळा आलाय....

अज्ञात · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आता कंटाळा आलाय मोठं होऊन जगण्याचा उगाच मक्ख चेहऱ्याने जगभर वावरण्याचा कधी वाटत आपलेही लाड कोणीतरी करावेत अन भीती वाटल्यावर हळूच कुशीत घ्यावे कधी दुडक्या चालीने रान भर हुंदडाव तर कधी भर पावसात चिंब भिजावं कधी कडक उन्हात बर्फाचे गोळे खावे वाट दिसेल तिकडे वेड्या ओढीने पाळावे कधी पोटात दुखतंय सांगून शाळेला बुट्टी मारावी अन बाबांच्या भीतीपोटी आईशी सलगी करावी कधी जेवताना चिऊ काउचे घास कोणी भरवावे मग झोपताना काका दादाबरोबर घोडा घोडा खेळावे नेहमीच आपल्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं म्हणून काहीही करावं अन मनासारखा नाही झाल तर फुगून बसावं आता अपेक्षांचे ओझे वाहताना स्वतःला रोज्गाड्याला जुंपून बसलो आरशात स्वतःला पाहताना आता पुरता अनोळखी भासलो खरच कंटाळा आलाय आता मोठेपणाच कातडं पांघर्ण्याचा मागे पडण्याच्या भीतीने शर्यतीत एकटच पळण्याचा

वाचने 1604 वाचनखूण प्रतिक्रिया 1

विजुभाऊ 09/04/2012 - 19:30
आले रे आले झम्प्या दादा आले आले रे आले झम्प्या दादा आले आले रे आले झम्प्या दादा आले आले रे आले झम्प्या दादा आले आले रे आले झम्प्या दादा आले आले रे आले झम्प्या दादा आले आले रे आले झम्प्या दादा आले आले रे आले झम्प्या दादा आले