मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चॉकलेट सुफ्ले

स्वाती२ · · पाककृती
चॉकलेट सुफ्ले हा प्रकार तसा करायला खटपटीचा. बेस म्हणून वापरले जाणारे बेचामल सॉस नीट जमणे महत्वाचे. त्यामुळे मी बरेचदा शॉर्टकट वापरते. ही शॉर्टकट रेसिपी गुड हाऊस किपिंग मासिकातील आहे. साहित्य: ४ औस बिटरस्वीट चॉकलेट चिप्स १/३ कप स्विटन्ड कंडेन्स्ड मिल्क २ अंड्याचा बलक ३ अंड्यातले फक्त पांढरे रॅमिकिन्सना आतुन लावण्यासाठी थोडे बटर आणि १ टे स्पून ग्रॅनुलेटेड साखर ( बारीक दळलेली साखर) थोडी आयसिंग शुगर वर भुरभुरवण्यासाठी Image removed. Image removed. कृती: ओवन ३७५ फॅ. ला तापत ठेवा. ४ औस मापाच्या रॅमिकिनला आतून बटर लावून घ्या. नंतर त्यात थोडी ग्रॅनुलेटेड साखर घालून रॅमिकिन हळू हळू फिरवा आतून साखरेचा थर बसेल. जास्तीची साखर झटकून टाका. असे चारही रॅमिकिन्सला करा. मायक्रोवेव मधे चालेल अशा बोलमधे चॉकलेट चिप घालून १५-२० सेकंदाच्या अवधीसाठी गरम करा. ढवळून पुन्हा १५-२० सेकंद गरम करा. असे साधारण एक ते दिड मिनीट केल्यावर चिप्स वितळतील. मावेतून बाहेर काढून वितळलेल्या चॉकलेट मधे कंडेन्स्ड मिल्क घालून वायर विस्क वापरून ढवळा. आता त्यात दोन अंड्याचे बलक घालून ढवळून एकजीव करा. आता अंड्यातील पांढरे हँड किंवा स्टँड मिक्सर वापरुन फेटायला घ्या. ३-४ मिनिटे फेटल्यावर मिश्रण मिडीयम स्टीफ होईल. Image removed. यातले १/३ पांढरे चॉकलेटच्या मिश्रणात घालून हलक्या हाताने ढवळा. Image removed. एकजीव झाले की त्यात उरलेले पांढरे घाला. आता रबर स्पॅट्युला वापरुन अंड्याचे पांढरे हलक्य हाताने मिश्रणात फोल्ड करा. Image removed. तयार मिश्रण ४ रॅमिकिन्स मधे हलक्या हाताने घाला. Image removed. वरुन थोडी आयसिंग शुगर भुरभुरवा. आता रॅमिकिन्स कूकी शीट वर ठेऊन ओवन मधे ११-१३ मिनिटे बेक करा. रॅमिकिनच्या कडेच्या साधारण १ इंच वर सुफ्ले आला पाहिजे. बेक करताना ओवन मधे उघडू नका. ओवन मधून बाहेर काढून लगेच वाढा कारण १-२ मिनिटात सुफ्ले फ्लॅट होतो. Image removed.

वाचन 4974 प्रतिक्रिया 0