Skip to main content

अभीभी याद है.. 'तुम्हे याद होगा' ...!

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 16/04/2012 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणती दुपार. जेवण अंगावर आलेले. बारीक स्वरात एफ एमची निवेदिका कानाशी माशी गुणगुणल्याप्रमाणे गुणगुणत होती. त्याचा अर्थ काही मनात शिरत नव्हता. थोडा वेळ गुणगुणून झाल्यावर थकून की काय टी एकदम गप्पा झाली अन एक ग्याप.

<<बिन-पाण्याची दाढी>>

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 16/04/2012 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://misalpav.com/node/21389 "तुझ्या हाती ब्लेड आहे" खुंट, खुंटच राहतात, तेव्हा वेदना वळावते, घोटतात नाजूक गालही! चेहरा जळत असला, तरी गळा रक्ताळलेला असतो- वरचा!! फक्त असे केश उमलत जाऊन, 'फेस' मुळातुन सुरकुतू नये, इतकंच जपतोय.. शेवटी, बिन-पाण्याची ही 'दाढी जितकी नीटनेटकी तितकाच आयुष्याला गोरेपणा....!! -डहाणु
काव्यरस

सोफिया

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 16/04/2012 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
सोफिया ! मोझंबीकमधील मापूटो नावाच्या गावात एका इस्पितळासमोर, पंधरा एक वर्षापूर्वी एक छोटी मुलगी एका गंजलेल्या चाकाच्या खुर्चीत हताशपणे बसलेली होती. तिला दोन्ही पाय नव्हते आणि तिचे वय असेल अंदाजे १० एक. माझे लक्ष तिच्याकडे गेले आणि का कोणास ठावूक मला तिच्याशी बोलावेसे वाटले म्हणून मी बोलले. तिच्या अस्फूटशा आवाजात मला तिने तिचे नाव सांगितले तो प्रसंग मला अजून लख्खपणे आठवतोय. ती म्हणाली “सोफिया” आज अनेक वर्षानंतर आम्ही चांगल्या आणि अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहोत.

<< अजब न्याय निवाडा >>

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 16/04/2012 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, नुकताच हायकोर्टाने दिलेला एक निकाल माझ्या वाचनात आला. या निकालाची बातमी लोकसत्तेमध्ये मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली. मला हा निकाल केवळ पुरुषविरोधीच नाही तर अत्य़ंत आचरट वाटतो.

सय नाही जात

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 16/04/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
सय नाही जात, गेल्या दिसांची येती न जाऊन जे दिस, मन का पुकारे, त्यांस दिस पाखरू जर असते, पकडून मी ठेविता पाळता त्यांना खुशीने, मोत्यांचे दाणे देता छातीशी जपता धरून प्रतिमा तयांची जरी मी, लपवली नजरेसमोरून हृदयी उमटली मूर्ती, परंतु हटे न हटवून परकेच म्हटले जरी ते गतदिवसांच्या आठवणी विसरता विसरत नाहीत. त्यांचीच कैफियत कवीने मांडली आहे. तो कवी कोण? पाहा ओळखता आला तर! हे मराठी आविष्करण मात्र माझेच आहे. http://anuvad-ranjan.blogspot.in/ "अनुवाद रंजन" या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

मन : एक नितांत रमणीय प्रवास

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 16/04/2012 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
मन http://www.misalpav.com/node/21358 या नितांत सुंदर आणि बहुचर्चित कवितेचं रसग्रहण अनेकांनी केलंय. मराठीतील प्रतिभावंत कवी ग्रेस यांची उणीव भरून काढण्यासाठीच ही काव्यप्रतिभा प्रकट झालीये की काय? असं वाटतं कारण ग्रेसप्रमाणेच "मी कविता लिहीली, अर्थ ज्याचा त्यानी शोधावा" असं ते सांगतात", त्यामुळे अर्थ शोधण्याची जवाबदारी एक रसिक म्हणून आम्ही पेलली आहे. प्रथम, ही कविता "मुक्तक" असून ती "अद्भुतरसाचा" परिपोष करते असं कवीनं नमूद केलंय. आता या कवीतेत अद्भुत ते काय? असा प्रश्न रसिकांना पडणं स्वाभाविक आहे.

परिटघडी...!

लेखक वेणू यांनी सोमवार, 16/04/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला माझी साथ आहे" शब्द, शब्दच राहतात, तेव्हा वेदना हेलावते, गोठतात नाजूक भावनाही! चेहरा शांत असला, तरी कोपरा दुखावलेला असतो- आतला!! फक्त असे कोपरे दुमडत जाऊन, मन संकुचित होऊ नये, इतकंच जपतेय.. शेवटी, मनाची 'परिटघडी' जितकी नीटनेटकी तितकाच आयुष्याला कोरेपणा....!! -वेणू ब्लॉगवर पूर्वप्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/

(कु)मन....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 15/04/2012 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
मुख मूका घ्यायला सरसावते आणि त्याच वेळी लपवायचे असतात मला पाठीवरचे व्रण चणे खाऊन, देशी ढोसुन, हवेत विहार करत माझे मन आणि शरीर तयार असते, परत एकदा गटारात लोळण्याकरता.... आणि काही केल्या , चावणे बंद करत नाहीत हे डास, हे ढेकूण ,गटारातील किडे आणि उकीरड्यातुन माझ्या अंगावर येत रहातात ही पिसवे... खातच रहातो मी गटारातील घाण थोडे पोट भरण्यासाठी मेकूड शोधत राहतात माझे हात गाढवाच्या नाकामध्ये एक कच्चा बेडूक सरकवतो घशात, घास म्हणुन, किंवा चकणा म्हणुन देखील पण मेलेल्या कावळ्याला पिसां सकट गिळायला लाळ गाळत असते तोंड बिना दाताचे.. गटारात टाकलेली पाने चावत आणि गिळत. घाणीचे लेप चढतात काखेत
काव्यरस