Skip to main content

आठवांची अंतरीची रांग आहे लांबडी

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शुक्रवार, 04/05/2012 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी राघवामागून सीता लालुपाठी राबडी जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा आठवांची अंतरीची रांग आहे लांबडी बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले गोजिर्‍या पोरीस आता गोजिरी गं टोपडी
काव्यरस

गार्लिक - कोरिएंडर नान आणी मटर-पनीर

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 04/05/2012 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य गार्लिक -कोरीएंडर नान : १ वाटी मैदा २ टेस्पून दही २ टेस्पून कोमट पाणी १ टेस्पून ऑलिव्ह ऑईल २-३ लसूण पाकळ्या १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून कलौंजी २-३ कोथंबीरीच्या काड्या ३/४ टीस्पून इझी ब्लेंड ड्राईड यीस्ट १ टीस्पून साखर मीठ चवीनुसार . पाकृ: मैदा, मीठ व धणेपूड एकत्र चाळून घ्या. त्यात छोटा खळगा करून त्यात कोमट पाणी, दही, कलौंजी व तेल घालावे. बारीक चिरलेला लसूण घा

अंदोलने

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 04/05/2012 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
पाहून कंठ दाटे लागे तरंग भंगू काठांस पापण्यांच्या जळपात पाहि लंघू हे अस्त्र नयनबाणी शब्दात काय सांगू घायाळ वृश्चिकाचे नांगीत वीष पंगू ओठांस माणकांची आलेपणे फिरंगी गाली गुलाबमाया स्मित रेशमी सुरंगी काट्यास आकळे ना ममता उलाल अंगी अंदोलने सुखाची व्यापून अंतरंगी अस्पर्श गोत न्यारे गेले विरून सारे चहुओर रजतकांती आनंदघन पसारे हळव्या सुरात हलके गंधर्वगीत भारे गंधात जाणिवांच्या अस्तित्व विलय वारे ............................अज्ञात
काव्यरस

जुनी गोष्ट आहे.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 04/05/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
जुनी गोष्ट आहे. कन्या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती.. व लग्न हि ठरले होते तिचे. रात्री जेवण झाले की आम्ही लॉग राईडला जात असू .. दिवसभरातल्या गप्पा..पी.जे मजा यायची.. घरी जाताना कुठेतरी कॉफी असा कार्य क्रम असायचा.. मुलगी नव्या पिढीतली असल्याने सी.सी.डी वा तत्सम मध्ये कॉफी पिण्यास जाण्याचा आग्रह करीत असे.. मुळात मला कॉफी आवडत नाही..आम्ही चहा बाज.. त्यांतून जगातला सुंदर चहा फुगेवाडीच्या अशोक च्या टपरीवर मिळतो असे ठाम मत.. खर मला म्हणजे कॉफी शॉप ही नवी संस्कृती फारशी पसंत नाहि..नव्यास विरोध असे नाही पण कॉफीच्या कपाला अ‍ॅम्बियन्स च्या नावाखाली ७०-८०रुपये मोजणे मला पटत नाही..त्या मुळे मी त

फोटोशॉप किडे - ३ (फोकसिंग आणि polygonal lasso tool)

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 04/05/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोशॉप किडे - १ फोटोशॉप किडे - २ नमस्कार.. आजच्या भागात आपण polygonal lasso टूल चा एक उपयोग पाहणार आहोत polygonal lasso हे टूल.. selection साठी वापरल जात , इखाद्या फोटो वरचा आपण आपल्याला हवा तो भाग आपण या टूल ने सिलेक्ट करू शकतो फोकसिंग ... फोटोग्राफी मधला अत्यंत महत्वाचा भाग .. फोकसिंग मुळे फोटो खूप उठून दिसतो..

संगीतप्रेमी मिपाकरांनो ,

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 04/05/2012 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व संगीतप्रेमी मिपाकरांसाठी एक मस्त कार्यक्रम होत आहे. पुणे परिसरातील मिपाकराना तर या कार्यक्रमाला जाणे सहज शक्य आहे. सादरकर्ते- श्री अमित वैद्य .( खास वेगळे अ‍ॅकॉर्डेयन वादक ) कार्यक्रमाचे नाव- अ‍ॅन इव्हनिंग विथ अ‍ॅकॉर्डेयन श्री वैद्य हे मेलडी व रिदम एकाच वेळी या वाद्यातून निर्माण करतात. त्यामुळे हे एक्सटेंडेड हारमोनियम वादन नाही. जुन्या जमान्यातील शंकर जय ओपी नय्यर, सी आर, एस डी यांची अजरामर गीते वेगळ्याच ढंगात ऐकायला मिळतील. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून केर्सी लॉर्ड ( खास आर डी बरोबर काम केलेले ) आहेत.

समाजसेवा म्हणजे काय?

लेखक विकास यांनी गुरुवार, 03/05/2012 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठी घटनेतील नियमात लिहीलेल्या Literature, science, art and social service या चार पैकी, सचिन नक्की कशात बसतो ह्या चर्चेत खालील वाक्य होते:
सचिनने भारतासाठी उत्कृष्ट खेळ करून त्याच्या मनाने भारतीय समाजाची सेवाच केली नाही का? का सेवा करायची म्हणजे राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रच असले पाहिजे?
या वाक्यावरून वेगळा चर्चा प्रस्ताव टाकायचा मोह झाला. चर्चा सचिनबद्दल नसून तसेच त्या वाक्यासंदर्भात व्यक्तीगतही नसून, केवळ "समाजसेवा" नक्की कशाला म्हणावे या संदर्भात आहे.

शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी गुरुवार, 03/05/2012 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. हे वाक्य वाचून आपल्यापैकी अनेकांच्या नजरा सहज दिनदर्शिकेकडे वळतील कारण जयंती नेमकी कधी होती याची कल्पनाही अनेकांना नसेल. शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू! आद्यशंकराचार्यांनी तयार केलेली काही पिठं आहेत - बहुतेक चार! याशिवाय अनेक स्वयंनिर्मित पिठं आहेत. किती? माहिती नाही! सध्या हयात असलेल्या शंकराचार्यांपैकी कुणाचं नाव आठवेल का? तर कांची पीठाचे श्री जयेन्द्र सरस्वती! कारण? कसल्यातरी वादाच्या भोव-यात अडकले होते, ते हेच शंकराचार्य ना?