Skip to main content

New York मध्ये संपर्क

लेखक yeda यांनी शुक्रवार, 11/05/2012 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या मित्राची पत्नी New York मध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ६ महिने फेलोशिप करण्यासाठी पुण्याहून येत आहे. तिची राहण्याची सोय विद्यापीठात होणार आहे. तिला काही मदत लागली तर आपल्यापैकी कोणी New York मध्ये असेल तर उत्तम. मदत म्हणजे, फक्त एखाद्या कुटुंबाचा संपर्क असला तर चांगलं होईल. धन्यवाद. भूषण केरूर (bkerur1 @yahoo.com )

कलाईगनर

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी शुक्रवार, 11/05/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी! डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे.

गरमागरम चहा

लेखक नाना चेंगट यांनी शुक्रवार, 11/05/2012 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : एक कप एक बशी एक चमचा चांगली गाळणी एक छोटेसे पातेले गॅस शेगडी (शिलींडरसह) लायटर अर्धा कप पाणी एक कप दूध दोन चमचे साखर एक चमचा चहापावडर चिमुटभर चहामसाला किंवा वेलचीपावडर कृती : प्रथम सिलिंडरमधे गॅस असल्याची खात्री करुन शेगडीवर पातेले ठेवावे. पातेल्यात पाणी, दूध, साखर, चहापावडर आणि मसाला किंवा वेलची पावडर टाकून मिश्रण चांगले ढवळावे. लायटरच्या सहाय्याने गॅस पेटवून चांगली उकळी आणावी. अधुन मधून चमच्याने ढवळावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दोन मिनिटे जमल्यास झाकण टाकून वाट पहावी. आता चहा गाळणीच्या सहाय्याने गाळून कपात घ्यावा.

लेडी ड्रायवर

लेखक पुश्कर यांनी शुक्रवार, 11/05/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिस मधून निघताना एक लेडी ड्रायवर कार चालवताना दिसली. तेव्हा मनात विचार आला की लोकं एका स्त्रीला ड्रायवर म्हणून कामाला ठेवू शकतील का ? तेवढी त्यांच्या मनाची तयारी आहे का असा प्रश्न पडला . पण आजचे बदलते जग बघता अजून काही वर्षात हे हि शक्य वाटते. तुम्हाला काय वाटते ? विचार केल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभे राहिले ?

चिरजीवीत कहाणी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 11/05/2012 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरले ते पळ,......मन भरुनी जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;.. शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी लाटेस किनारा; किनार्‍यालगत; अगणित; व्रत लेणी ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी ............................अज्ञात
काव्यरस

'मनोगत' चे काय झाले?

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 10/05/2012 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे जालावर शुद्ध मराठीची सेवा करणारे संकेतस्थळ 'मनोगत' आज बंद पडलेले आहे. याबाबत कुठलिही पूर्वसुचना सदस्यांना दिली गेली नव्हती. तसेही गेले काही महिने ज्या प्रकारे मनोगत चालत होते त्यानुसार असे काही घडू शकते याची जाणिव होतीच. सन्माननिय मिपाकरांना याबाबत काही माहिती असल्यास येथे त्यावर प्रकाश टाकावा. 'मनोगत' चे पुनुरूज्जीवन व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना!!

१९ कोटी ४८ लाख

लेखक विकास यांनी गुरुवार, 10/05/2012 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
मटा मध्ये एक रोचक बातमी वाचनात आली: कसाबचा खर्च राज्याला परवडेनासा यातील मुख्य मुद्दा असा:कसाबच्या सुरक्षीत बंदोबस्तासाठी आर्थर रोड तुरूंगाच्या बाहेर इंडो-तिबेटीअन जवानांचा ताफा २८ मार्च २००९ पासून तैनात आहे. त्यांचा ३० सप्टेंबर २०११ पर्यंतचा जो खर्च झाला त्याची पावती राज्यसरकारकडे पाठवण्यात आली. या एका तैनातीचा या वेळेपुरता खर्च १९ कोटी ४८ लाख इतका आहे. राज्यसरकारचे म्हणणे असे आहे की २६/११ चा हल्ला देशावरचा होता आणि केंद्राने तो खर्च उचलावा... मला ते म्हणणे योग्य वाटते.