Skip to main content

'मनोगत' चे काय झाले?

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 10/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे जालावर शुद्ध मराठीची सेवा करणारे संकेतस्थळ 'मनोगत' आज बंद पडलेले आहे. याबाबत कुठलिही पूर्वसुचना सदस्यांना दिली गेली नव्हती. तसेही गेले काही महिने ज्या प्रकारे मनोगत चालत होते त्यानुसार असे काही घडू शकते याची जाणिव होतीच. सन्माननिय मिपाकरांना याबाबत काही माहिती असल्यास येथे त्यावर प्रकाश टाकावा. 'मनोगत' चे पुनुरूज्जीवन व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना!!

वाचने 11782
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

अरेच्चा. खरंच की! काल-परवाच चक्कर मारली तेव्हा ठीक ठाक वाटत होते! असो, या विषयावर तात्याचे विचार वाचायला आवडतील!

In reply to by सुनील

नको! 'मनोगत' काहीही कारणांमुळे बंद पडले असेल तरे ते दु:खद आहे. त्याचे सध्याचे बंद असणे तात्पुरते आहे असे मानतो.

In reply to by प्रदीप

'मनोगत' काहीही कारणांमुळे बंद पडले असेल तरे ते दु:खद आहे. त्याचे सध्याचे बंद असणे तात्पुरते आहे असे मानतो.
+१, हेच म्हणतो. - छोटा डॉन

मनोगत काही तांत्रिक कारणांनी बंद असावं असं वाटतं मनोगतावर वावरणारे अधिक माहिती देतील . कविता वाचायला (मला कोणी पाहात तर नसेल ना असे समजून) चक्कर टाकायचो तेवढेच. अधिक काही माहिती नाही. अशात तर चक्कर टाकायलाही वेळ नव्हता. आमचे कवी मित्र केशवसुमार यांच्याकडे मनोगताबद्दल चौकशी करुन पाहतो. ;) >>> 'मनोगत' चे पुनुरूज्जीवन व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना!! हम्म..... -दिलीप बिरुटे

'मारुती कांबळेचे काय झाले?' हा प्रश्न उगा आठवला. असो... आता शुद्धलेखनचिकित्सा अजुन कुठे मिळण्याची सोय आहे काय ह्यावरती जाणकारांनी प्रकाश टाकून उपकृत करावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मी ५० पैसे प्रतिशब्द या दराने शुद्धीकरण करुन देण्यास तयार आहे. व्हिसा, मास्टर,पेपाल वगैरे ऑप्शन्स असतील. मेगाबायटी प्रतिसादांना सवलत मिळेल.

In reply to by गवि

मी ५० पैसे प्रतिशब्द या दराने शुद्धीकरण करुन देण्यास तयार आहे. व्हिसा, मास्टर,पेपाल वगैरे ऑप्शन्स असतील.
एकदम ३ सदस्य डोळ्यासमोर चमकले. बाकी दरात थोडीफार सवलत देत असल्यास, 'मचाक'च्या पुढील सर्व लेखन शुद्धीकरणाचे काम तुम्हास देऊ म्हणतो. अर्थात कामात गुप्तता पाळावी लागेल, तसेच लेखन पूर्वप्रसिद्ध होऊ नये ह्याची देखील दक्षता घ्यावी लागेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मी फुकट करतो रे. (याला म्हणतात स्पर्धात्मक अर्थव्यवस्था! तुम्ही सवलतीत देताय तर आम्ही फुकट देतो.) ;)

In reply to by रमताराम

हॅं हॅं.. तुमचे फुकट करण्याचे ठरत असले तर ठीक आहे पण सांभाळा हो.. काहीतरी अन्य गुप्त लाभ असतीलच.. हॅं हॅं हॅं ..

In reply to by गवि

गुप्त लाभांची अशी 'जाहीर' चर्चा कशाला.

In reply to by राजघराणं

एकदम श्रद्धांजली? अहो रिन्यूअलचा गोंधळ झाला असेल काहीतरी. ऑनलाईन पेमेंटची गफलत होऊ शकते कधी कधी, त्यातून काहीतरी गडबड झाली असण्याची शक्यता आहे. बाकी मनोगतावर बहुतेक जुन्या जालकरांची पहिली पावले पडली असल्याने (तात्यांच्या भाषेत सांगायचे तर) ते 'पहिले प्रेम'. फक्त ते लिखाणच नव्हे तर प्रतिसादही अप्रूवलखेरिज प्रकाशित करणार नाही वगैरे प्रकरण आले नि सगळं बिनसलं. असो. ही तात्पुरती स्थिती असो नि त्याचे पुनरागमन होवो अशी सदिच्छा.

In reply to by रमताराम

कुठे कुठे काय काय बिनसले ..स्कोर सेटल केले गेले.. इत्यादी इत्यादी !! हा विषय निघाला तर धागा १०० सहज मारेल

In reply to by नाना चेंगट

अहो बंद पडलंय म्हणून बोम्ब तर तुमचं निराळंच???? अहो बंद पडलेलं आहे ते! चालायचं कसं???? - हातवारे करत प्यारक सराफ ;)

चला, पाहुण्‍यांना स्‍टॅण्‍डवर सोडून या बरं लवकर! :p :p :p :p गुण नाही तर वाण* लागायचा उगाच ;-) * हे मूळ वाण नाही तर गुण आहे असं पिल्लू सोडू नये! यापूर्वी एका ग्रंथपाल अबलेशी वाणच लागतं, गुण अपेक्षित नाही - असा खडाजंगी वाद झालेला आहे. पण त्यांनी डायरेक पुस्तकच काढून दाखवल्यानं आम्ही तटीत ठरल्याप्रमाणं मिशी ठेवत नाहीच! पण हे वाणच आहे यावर आम्ही ठाम आहोत.

मिपावरती नुसती चर्चा चालु झाली आहे म्हणल्याबरोब्बर देशापुढे प्रॉब्लेम देखील चुटकीत सोडवले जातात. मनोगताचे काय कौतुक ? ते चालू होणारच होते.

मनोगत पुन्हा सुरू झाले आहे. तीन वर्षांपूर्वी बजबजपुरी असेच बंद पडले होते ते आजवर सुरू झाले नाही.

मनोगत पुन्हा चालू हट्ट तिच्याआयला. मिपाकर मनोगतींनी एवढा प्रेमाने धागा काढला होता किमान आठेक दिवस तरी दु:खात ठेवायला पाहिजे होते असे वाटले. असो, या बातमीने दोनच लोकांना मोठा आनंद झाला असेल एक आमचे रावसाहेब आणि दुसरे केशवसुमार. :) असो, नमोगताला शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

झालं का चालू? बंदच बरं होतं. नाहीतरी ते हल्ली फक्त "कामथे काका" नावाचं अतिफालतू कथानकच छापत होतं फक्त...

In reply to by रामपुरी

असो... पण मनोगतावरचे लिखाण हे मिपापेक्षा नक्कीच सकस असते. मिपावरती आजकाल इंग्रजी लेखांचे आणि गोष्टींचे भाषांतर आणि हिंदी गाण्यांच्या केलेल्या मराठी चिंध्या, ह्यापेक्षा वेगळे काही नसतेच. नुसती कंपूबाजी आणि बालीश आणि भिकारड्या धाग्यांचे पण वारेमपा कौतुक हेच चालू असते. उद्या इथे एखाद्याने कोर्‍या कागदावरती 'शी' असे लिहून त्याचा स्क्रीनशॉट कलादालनात लावला तरी त्याला अवर्णनीय, हातात कला आहे असले प्रतिसाद मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको. शिंगे मोडून वासरांमध्ये शिरलेल्या इथल्या काका लोकांविषयी तर न बोललेलेच बरे. उद्या, मिपा म्हणजे 'पुरुषांची मंगळागौर' असे कोणी म्हणले नाही म्हणजे मिळवले. वरील प्रतिसाद हा कुठल्याही इतर प्रतिसादाचे विडंबन वाटल्यास अथवा दुसर्‍या एखाद्या समुद्रातील लेखनाचे मराठीकरण वाटल्यास तो निव्वळ योगायोग आहे.

मिपावर शुद्धीचिकित्सक उपलब्ध करावा अशी मागणी करत आहे. पर्‍याशी काही बाबतीत सहमती दर्शवत आहे.

In reply to by आदिजोशी

मिपावर शूची सुविधा उपलब्ध होई पर्यंत मनोगत वर मजकूर टंकून तिथला शूची वापरून ते येथे डकवण्याची कॢप्ती मी वापरतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

>>>>मिपावर शूची सुविधा उपलब्ध होई पर्यंत पण आपापल्या घरी / कार्यालयात करत जा ना. इथं कशाला? ;) सीरियसली हे खरंच समजलेलं नाही! शुचीव्यवस्था कसली ब्वा?

> एखाद्याने कोर्‍या कागदावरती 'शी' असे लिहून त्याचा स्क्रीनशॉट कलादालनात लावला तरी त्याला अवर्णनीय, हातात कला आहे असले प्रतिसाद मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको त्यालाच आम्ही सकाळची कामे म्हणतो विशेषतः आधीच्या प्रतिसादातील एखाद्या वाक्यातील शब्द पकडून भेंड्या खेळल्यासारखे प्रतिसाद टाकले जातात त्याला तोड नाही. धाग्यांचेही धागे काढले जातात. चालायचच लोक्सनाही जिन्दगीमधला वैताग काढायला काही जागा हवी ना !

मी ६ वर्षापुर्वीच मनोगतवर रजिस्ट्रेशन केलेले. सुरुवातीला चांगले वाटले पण प्रतिक्रिया वगैरे खुप कमी असायच्या त्यामुळे कोणी आपले लेखन वाचते की नाही हाच प्रश्न पडायचा त्यामुळे तिथे जाणेही कमी झाले. मधे मधे चक्कर मारली तरी इतरांच्या लिखाणाचीही तिच गत. पण शुद्धलेखनाची जी सोय होती ती अजुन मला इतर ठिकाणी कुठे मिळाली नाही. बाहेर द्यायच्या लिखाणासाठी मी मनोगतवरच शुद्धलेखन तपासायचे. ती खुपच चांगली सोय होती.

In reply to by जागु

पण प्रतिक्रिया वगैरे खुप कमी असायच्या त्यामुळे कोणी आपले लेखन वाचते की नाही हाच प्रश्न पडायचा त्यामुळे तिथे जाणेही कमी झाले.
सहमत. लोकांनी प्रतिक्रिया दिल्याच पाहिजेत. आपले प्रतिक्रियेपेक्षा धागेच जास्त असतात म्हणून काय झालं? :)

In reply to by श्रीरंग_जोशी

च्यायला !
मनोगत पूर्ववत झाल्यामुळे माझ्यासकट बऱ्याच जणांच्या जीवात जीव आला.
कसलं अश्लील वाक्य हो हे.

मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील कसे काय असू शकते हे कृपया या बालकास समजावून सांगावे. मिपा जर महाविद्यालय असेल तर मनोगत हे माझ्यासाठी प्राथमिक शाळेसारखे आहे. ते बंद पडणे हे क्लेशदायक आहे. यावर सुनील पाल चे एक वाक्य आठवते - "भावनाओ को समझो, बाडी में क्या रख्खा हैं?".

In reply to by मृत्युन्जय

हो ना. अगदीच नैसर्गिक आणी गोड बातमी आहे. उगाच असल्या प्रतिसादांनी लेखकाला घाबरवू नका. पोटात गोळा यायचा त्यांच्या.

In reply to by श्रीरंग_जोशी

मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील कसे काय असू शकते हे कृपया या बालकास समजावून सांगावे. मिपा जर महाविद्यालय असेल तर मनोगत हे माझ्यासाठी प्राथमिक शाळेसारखे आहे. ते बंद पडणे हे क्लेशदायक आहे.
महाविद्यालयात आल्या आल्या लगेच डिग्री कशी मिळणार जोशी साहेब ? जरा सगळी लेक्चर्स अटेंड करत चला, अभ्यास वाढवा मग आपोआप काही गोष्टी लक्षात येत जातील. असो... बाकी काय घेणार, कॉम्प्लॅन का व्हिस्की ? @मृत्युंजय :- काड्या सारु नको बे हलकट ! हाच का तुझा धर्म ?

In reply to by नाना चेंगट

यावरून आमची वाहिनी - सह्याद्री वाहिनी वरील एक जाहिरात आठवली. संसाराचा नाश करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू...

In reply to by श्रीरंग_जोशी

ह्यासाठी फक्त आणि फक्त मिपावरती शिक्षण घेत चला, म्हणजे असे चुकीचे शिक्षण मिळणार नाही. खरे वाक्य असे आहे :- संसारा उद्ध्वस्त करी दारू, तेंव्हा संसारच नका करू...

In reply to by परिकथेतील राजकुमार

नको त्या वयात लोकांना नको त्या गोष्टी शिकवत जाऊ नकोस रे. काय नाय हो जोशी, तुमचं मनोगत चालुंद्या, ह्या पर्‍याकडे लक्ष देऊ नका.

In reply to by Nile

एकदम कुठे व्हिस्की? आधी बियर मारु दे अर्धी बाटली....
मी त्यांना दूधातून काय घेणार असे विचारत होतो.
नको त्या वयात लोकांना नको त्या गोष्टी शिकवत जाऊ नकोस रे.
त्यांचे वय 'नको ते' आहे हे तुला रे कसे माहिती निळ्या ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

शिंच्या प्रश्न पहा.. आम्ही शितावरून भात ओळखतो तसे प्रश्नावरून वयही ओळखतो, काय समजलांस!

In reply to by मृत्युन्जय

अहिंसा परमो धर्मः. आपल्याच नविन आयडींची अशी हिंसा नका हो करु. खरं तर तुम्हाला असं म्हणायचं होतं ना.