Skip to main content

भला उसकी कमीज मेरे कमीज......

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 25/05/2012 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेली साठ-सत्तर र्वष चाललेल्या डिर्टजंट वॉरचा आढावा घेतल्याशिवाय टिनोपालच्या कथेचा अध्याय वाचता येणार नाही. १९५९ साली हिंदुस्थान लिव्हरने सर्फ बाजारात आणले आणि बकेट वॉशची पद्धत सुरू झाली. स्वस्तिक केमिकल्सचा डेट नावाचा एक डिर्टजट ब्रँड सोडल्यास सर्फच्या स्पर्धेत कुणीच नव्हतं. सत्तरीच्या दशकात निरमा नावाच्या ब्रँडने हिंदुस्थान लीव्हरची झोप उडवली. सर्फची शुभ्रतेची मक्तेदारी संपली. ‘दूध सी सफेदी निरमा से आये’ या ओळीनं सर्फचा ब्रँड रिकॉल संपवून टाकला. ज्यावेळी सर्फ १२-१३ रुपये किलोने विकलं जायचं तेव्हा निरमाची किंमत तीन रुपये किलो होती. छायागीत आणि सोबत निरमाची जाहीरात.

केशर-पिस्ता अंगुर रबडी / रसमलाई

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 24/05/2012 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य अंगुर रसगुल्ला बनवण्यासाठी: १/२ लिटर दूध दीड टेस्पून लिंबाचा रस ३/४ वाटी साखर दीड वाट्या पाणी १/२ टीस्पून वेलचीचे दाणे बर्फ पत्री खडीसाखर . . पाकृ: जाड बुडाच्या पातेल्या दूध उकळायला ठेवावे.

कातर वेळ

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 24/05/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
आवरलेल्या मनातुन सावरलेले क्शण आहेत तुझ्यासाठीच राखुन ठेवलेले काही गुलाबी पण आहेत तुझ्याशिवाय दिवस साजरे करण्याची सवय आता मला करुन घ्यायला हवी कारण रात्रींमध्ये तुझ्याच आठवणींची स्पंदनं आहेत फक्त मला भिती वाटत राहते संध्याकाळ्ची कारण या कातर वेळी तुझ्यावर दुसर्याच कोणाची तरी राखण आहे . . . . अनिरुद्ध
काव्यरस

' ती असताना .......! '

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 24/05/2012 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
" चहाच आदन ठेवलय रे ,तेवढ उकळल्यावर दुध ओतशील का ?" "पोळ्या झाल्यात ...तू डबे भर ना , मी आंघोळीला पळते .." प्रत्येक कामात तिला मी हवा असतो .तिला येत नाही ते काम म्हणून नाही ,तर मी आजूबाजूला ,सतत तिच्या डोळ्यासमोर लागायचो .मी खुपदा चिडायचो ,"एकही काम पूर्ण करत नाहीस ,एक तू केल तर दुसर मी आटपेन ना , तू तुझ्याच कामातली सगळी पडकाम माझ्याकडून करून घेतेस " त्यावर जीवघेणी हास्याची चमचमती मखमल माझ्याभोवती पसरवून ...आपल्या कामासाठी पसार व्हायची . ती असताना , ती सतत माझी सावली बनायची ,नाहीतर माझ्याच सावलीखाली स्वताहाच अस्तित्व जपू पहायची .ती असताना मला कसलीच काळजी नसायची ,माझ घर ,माझी माणसं ,जे आधी मा

प्रेम म्हणजे काय रे भाऊ?

लेखक पुश्कर यांनी गुरुवार, 24/05/2012 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी तरी काही चांगल्या ओंळी लिहिल्या आहेत..... मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय? मी त्याला सागितले की ... कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम. दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम. कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम. कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचारणारी बहिण म्हणजे प्रेम. पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्

युरोप मधील आर्थिक संकट व रुपयाची घसरण - कारणे काय आहेत?

लेखक Madhavi_Bhave यांनी गुरुवार, 24/05/2012 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या ऑफिस मध्य प्रोमोशनच्या इंटरव्यूहची तयारी करत आहे. मुळात मी सायन्स शाखेची आहे त्यामुळे इकॉनॉमी इत्यादीची एवढी कल्पना नाही आहे. आता पर्यंत बाकीच्यांचे जेवढे इंटरव्यूह झाले आहेत त्यानुसार सध्या करंट अफेअर्स मध्ये खालील गोष्टी विचारत आहेत. (१) युरोप मधील आर्थिक संकट - कारणे आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम (२) डॉलरच्यासमोर रुपयाची का घसरण होत आहे? (३) रुपयाच्या घसरणीचा पेट्रोल किमतीवर का परिणाम झाला? कृपा करून अगदी थोडक्यात व सर्व सामान्य लोकांना समजेल असे कोणी मार्ग दर्शन करू शकेल का? मला नितांत गरज आहे हे सर्व समजून घेण्याची.

एका क्षणावरी या

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 24/05/2012 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी चुकता हिशेब केला सार्‍याच जिंदगीचा... १ फकिरीवरी फिदा तू मज ओढ चांदण्याची कवितेत छंद केला मी चंद्र माळण्याचा... २ नव्हते जरी दिलासे सोडून हात गेले मी बांधला निवारा छायेमध्ये स्वतःच्या... ३ लाजून शांतता ऐके स्वच्छंद गीत ऐसी अंतरी ध्यास तिलाही असा व्यक्त होण्याचा... ४ एकांत कधीचा जागा तृप्तीने रात जरी निजली बहाणा अवेळी मग झाला फिरूनी उजाडण्याचा... ५ हा साजण घेऊन आला चांदणे देह सजवाया उधळून कस्तुरी तूही कर सौदा आकाशाचा... ६ शीतल सहवासाला कलाहाचे गोंदण कैसे स्पर्शाने करूया उत्सव अंतरीच्या अद्वैताचा... ७

हे धंदड तत्तड...पगार अजूनच वाढणार

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 24/05/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! २०१२ मध्ये भारतातल्या नोकरदारांचे पगार ११.९ टक्क्यांनी वाढणार!! http://www.dayandnightnews.com/2012/02/indian-employees-to-get-11-9-sal… धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

न्यूयॉर्क मधील पर्यटन स्थळे

लेखक Pearl यांनी गुरुवार, 24/05/2012 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
लवकरच न्यूयॉर्कला भेट द्यायचा बेत आहे. तर आवर्जून पहावी अशी अशी कोणकोणती ठिकाणं आहेत, आणि miss करू नयेत अशा काय काय गोष्टी आहेत. लहान मुलांसाठीची काय काय attractions आहेत. आणि कशाकशाचे (कोणजोणत्या पर्यटन स्थळांचे) आधी बुकिंग करावे लागते? यावर जाणकार काही माहिती देऊ शकतील का? तस नेटवर बर्‍याच साइटसवर ही ठिकाणांची यादी आहे. पण आपले (मिपावरचे) NY ला जाऊन आलेले किंवा NY च्या आसपास रहाणारे जास्त नीट सांगू शकतील असं वाटतं म्हणून इथे विचारत आहे.