' ती असताना .......! '
लेखनप्रकार
" चहाच आदन ठेवलय रे ,तेवढ उकळल्यावर दुध ओतशील का ?"
"पोळ्या झाल्यात ...तू डबे भर ना , मी आंघोळीला पळते .." प्रत्येक कामात तिला मी हवा असतो .तिला येत नाही ते काम म्हणून नाही ,तर मी आजूबाजूला ,सतत तिच्या डोळ्यासमोर लागायचो .मी खुपदा चिडायचो ,"एकही काम पूर्ण करत नाहीस ,एक तू केल तर दुसर मी आटपेन ना , तू तुझ्याच कामातली सगळी पडकाम माझ्याकडून करून घेतेस " त्यावर जीवघेणी हास्याची चमचमती मखमल माझ्याभोवती पसरवून ...आपल्या कामासाठी पसार व्हायची .
ती असताना , ती सतत माझी सावली बनायची ,नाहीतर माझ्याच सावलीखाली स्वताहाच अस्तित्व जपू पहायची .ती असताना मला कसलीच काळजी नसायची ,माझ घर ,माझी माणसं ,जे आधी माझ माझ होत ते सगळच तीनं केव्हाच आपल करून टाकल होतं .ती असताना ..हो ती असताना ..
आज नाहीय ती ,म्हणजे ह्या जगासाठी नसेल ती ,माझ्यासाठी मी असे पर्यंत ती असणार ,माझ्या प्रत्येक हालचालीत तिची छबी असणार ,माझ्यात पूर्ण सामावून गेलेली ती .मी म्हणजे तीच पूर्ण जग ,माझ बोलण ,माझ चिडण ,माझ्या चुका म्हणजे तिच्यासाठी रोज नव्यान जगण. वेडी होती जराशी पण माझी होती ,फक्त माझी .
त्या दिवशी आई कुणाला तरी म्हणाली " मुलबाळ नव्हत म्हणून बरं ,नाहीतर अजून एक जीव टांगणीला लागला असता " ....अस वाटलं कुणीतरी भळभळनार्या जखमेवरची हळवी कातडी जड शब्दांची दाबण वापरून शिवतंय ...
एम जी रोडवरच्या बरिस्ता मध्ये बसलो होतो तेव्हा बाळाच्या नावावरून भांडली होती माझ्याशी ,म्हणाली " तीचं नाव
' मंजुश्री ' च ठेवायचं ,मंजिरीतली मंजू आणि श्रीकांत मधला श्री ..." मी म्हणालो " आत्ताच्या काळात हे पुराण काळातल नाव नको ,तीच नाव श्रेया च ठेवायचं ,बरेच वाद घातले होते ,पण पहिली मुलगीच हवी ह्यावर मात्र एकमत होतं आमचं ." ए तिच्यासाठी खूप सारे वूलनचे कपडे आईंकडून बनवून घेणार मी ,तिला जगातली सगळी सुख द्यायची ,तीच जग आनंदान सजवायचं ,
तुझ्यासारखे बोलके डोळे असावेत तिचे "
.." आणि तुझ्यासारखी चोवीस तास बडबड करणारी असली कि झाल माझं ,आज एकीला झेलतोय ,मग दोघी मिळून माझ्या डोक्याचा भुगा करणार.."
माझ्या ओठानवर एकदम हसू आलं ,ती असताना जे जे घडल होतं ते मला आठवल कि मी असाच ,एकटाच हसायचो ..
ती गेली तेव्हा मला अजिबात रडू आल नव्हत ,बरेच जन म्हणाले " त्याचं काळीज तरकलय , अचानक ,अनपेक्षित घडलेलं त्याला सहन झाल नाहीय "
तिला छानस सजवलं होत ,नवी कोरी हिरवी साडी ,पहिल्यांदाच आम्ही दोघांनी एकत्रितपणे न निवडलेली साडी तिने जाताना घातली होती ,तश्याच म्याचींग हिरव्या बांगड्या ,नाकात नथ , भल मोठ्ठ कुंकू लावलं होत ,जे तिला एवढ मोठ्ठ कधीच आवडल नव्हतं ,
एकदा आई म्हणाली होती ," मंजू निदान पाहुण्यांकडे जाताना तरी दिसेल एवढी मोठी टिकली लाव गं ,कुंकू नाही ना आवडत ,मग टिकली तरी मोठ्ठी लाव "!
आईच ऐकलं होतं तिने पण फुरंगटली होती ,तिकडून घरी येईपर्यंत कुणाशी बोलली नव्हती ,मग रात्री तिला जवळ घेऊन समजावलं होत ,तिचा राग एक दिवसाच्यावर कधीच टिकला नव्हता .
आज तिला कुणीही येऊन हव तस सजवत होतं ...तरीही गोंडस दिसत होती ,मी एका जागी बसून फक्त तिच्यावर होणारे सोपस्कार परक्यासारखा पहात होतो .सतत तिच्या अवतीभोवती असणारा मी ,तिच्यावर अधिकार गाजवणारा मी ,तिच्यात स्वताहाची सगळी सुख पहाणारा मी ,आज इतका परका झालो होतो कि ती मला सोडून गेली होती ,पचतच नव्हतं .ती असताना च्या बर्याच गोष्टी आजुबाजूच्या लोकांकडून कानावर पडत होत्या ..मी मात्र 'ती नसताना ' च्या कुठल्याच गोष्टीना सामोर जायला तयार नव्हतो .
ती असताना बाबा संध्याकाळचा चहा सात वाजता प्यायचे .मी सकाळी एकदाच चहा घ्यायचो ,पण तिला ऑफिसवरुन आल्या आल्या चहाची तलप व्हायची ,पण कुणीतरी जोडीला हव म्हणून चेहेरा पाडून बसायची .एवढ्या वर्षांची पाच ला चहा पिण्याची सवय बाबांनी फक्त तिच्यासाठी मोडली .
एकदा ती खूप दमून आली होती ,पण एकटीसाठी कुठे करत बसू ह्या विचाराने त्रासलेली बाबांनी बघितली ,स्वतःच येवून मायेन तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाले " मंजू ,थोडा चहा आज मी हि घेईन ,तुला सोबत म्हणून " ..तिचा खुललेला चेहेरा आजही माझ्या नजरेसमोरून हलत नाही ,साध्या साध्या गोष्टीत सुख शोधायची .
कधीमध्ये ऑफिसवरुन येताना आईसाठी गजरा आण ,बाबांसाठी काला जामून , कधी कधी माझ्यासाठी माझा रविवार फक्त तिच्यातच गुंतावा म्हणून नाटकाची तिकीटं ,कधी मराठी सिनेमाची तिकीटं ....तिला जगायचं होतं माझ्या माणसात ,तिला तिच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करून घ्यायच्या होत्या माझ्याकडून ..पण,
माझी सगळीच स्वप्न माझ्या डोळ्यात तशीच तरंगत ठेवून निघून गेली .
आजही बाबाना सात वाजले कि चहाची आठवण होते ,चुकून कधीतरी किचन कडे मान वळवून काहीतरी बोलायला जातात , मग अगतिकपणे अचानक मागे बघतात . त्यांचा कावराबावरा चेहेरा ,प्रत्येक सुरकुतीवर उमटलेली दुखाची छटा ,जीव कासावीस करते माझा .आई म्हणते " आता कुणाची वाट बघता ,आता कुणीही येणार नाहीय तुम्हाला सोबत करायला " तेव्हा आवंडे गिळत थरथरता आवाज निघतो फक्त " ती असताना लागलेल्या सवयी एकवेळ पुन्हा मोडतील ,पण ती असताना तीन स्वताहा विणलेलं मोहाच जाळं , ते कस मोडू ?"
खुपदा वाटायचं तिला गाडी शिकवलीच नसती तर ?,तिचा तो आयुष्य विस्कळीत करणारा हट्टच पूर्ण केला नसता तर ? तरी मी कितीतरी ठिकाणी तिला गाडीवरून जाण्यास मनाई केली होती ,बर्याचदा चिडायची " कितीरे घाबरतोस तू ,इथे हायवे ने जाऊ नकोस ,तिकडे मधल्या गल्ली बोळातनच जात जा ,अश्याने मी घाबरटच राहील आयुष्यभर " पण ह्या सगळ्यामागे माझा स्वार्थ तिला दिसायचाच नाही कधी .
तिची काळजी वाटायची . साधी सायकलही कधी चालवली नव्हती तिने ,डायरेक्ट स्कूटी चा हट्ट धरला होता .अक्खा महिना तिला समजावलं पण हट्टी होती ,जे मनानं घेतल ते पूर्ण झाल्याशिवाय चैन पडायचं नाही .मी अबोला धरून पाहिलं ,रागावून पाहिलं ,चिडचिड करून पाहिलं ,पण ती तरिही तस कि नस झाली नाही . माझा राग क्षणात कसा पळवायचा ह्याची किल्लीच होती तिच्याकडे .
शेवटी लग्नाच्या तिसर्या वाढदिवसा दिवशी तिला मी स्कूटीच सर्प्रायीझ दिलं ,आज ते सर्प्रायीझ माझ्या आयुष्यालाच कायमच शाप देवून गेलं .
आजही तीच शेवटच "श्री ...मला जगायचय ..तुझ्यासाठी ..आपल्या होणार्या बाळासाठी ...मला वाचव " हे शब्द माझा पिच्छा सोडत नाहीत . ज्या श्वासांच्या उबदार सहवासात मी कायम धुंद असायचो ते श्वास आज नाहीत ,ज्या हातांची बोट माझ्या बोटात गुंफण्याचा खेळ करत राहायचे आज ते खेळ नाहीत ..ती असताना ,मी कधीच रडलो नव्हतो ,आज ती नसताना आसवांच्या पावसात भिजतो ..
ती असताना मी अर्थपूर्ण आयुष्य जगलो ,आज ती नसताना फक्त जगण्याचा प्रयत्न करतोय ..पण अजूनही आठवणी बोलायला लागल्या कि सुरुवात मात्र अशीच होते .." ती असताना ..."
"ती असताना .......
वाचने
6172
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
हम्म्म्म......
अतिशय सुंदर! आत्ता फक्त एवढेच सुचतंय. . .
-('ती'च्यात गुरफटलेला) सोकाजी
कथा चांगली लिहिलीय.
छानच लिहिलय.

चांगली लिहीलिये. :)
अत्यंत सुंदर निवेदन! संयमित पणे एखाद्या जीवाची तगमग आणि तळमळ व्यक झाली आहे.
खुपच आवडले.
पण पूजा मला दु:ख आवडत नाही, कितीही दु:खाचा प्रसंग असला तरी मी त्यातनं मार्ग काढायला पाहतो किंवा कुणी दु:खात असेल तर त्याला पर्याय सुचवतो
In reply to लेखनाचा प्रयत्न आणि शैली प्रामाणिक आहे by संजय क्षीरसागर
आवडीन का येत दु:ख वाट्याला?
मला तर दु:ख नाकारणारी माणस कळतच नाहीत. सुख अन दु:ख ही दोन्ही जीवनाची दोन अंग आहेत. दाबुन घालुन दु:ख नाहिस होत का? मग सुख कस बर सेलिब्रेट करायच?
पुजा छान .
In reply to आवडीन का येत दु:ख वाट्याला? by स्पंदना
नाही ना; पण मला दु:खाचं प्रदर्शन किंवा विश्लेषण करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यातून मार्ग काढणं श्रेयस वाटतं आणि काय होतो उपयोग दु:खी राहून? परिस्थिती हाताबाहेर असेल तर ती मान्य करता क्षणी दु:ख संपतं. मला तर दु:खी माणसं अजिबात आवडत नाहीत.
दु:ख दाबायला लागत नाही फक्त प्रश्न सोडवणं किंवा मान्य करणं इतकच आहे, आनंद ही सहज स्थिती आहे, बाय डिफॉल्ट प्रत्येकाला आनंदातच राहायला आवडतं मग कशाला दु:खी व्ह्यायच? किमान लेखनातून तरी काल्पनिक दु:ख कशाला निर्माण करायच? अर्थात कुणी काय लिहावं हा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि न वाचणं हा पर्याय मला देखील आहे पण कुणाला उपयोग होत असेल तर एक अँगल दिला इतकंच.
In reply to >आवडीन का येतं दु:ख वाट्याला? by संजय क्षीरसागर
तुमचा अँगल समजला मला, पण माझा स्वतःचा अनुभव मला वरिल कमेंट लिहायला कारण आहे.
जाउ दे. मला जे वाटत ते तुम्हाला वाटेलच अस नाही, अन तुमच्या भावना मला समजतीलच अस नाही. सो लेट इट बी.
नक्कीच वन टाईम वाच आहे
In reply to छान कथा by बदक
असेच म्हणतो ...व.टा.वाच कथा !
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनाला स्पर्शून गेली.
छान लिहिलं आहे, धन्यवाद.
कथा आवडली.. पण शुध्द लेखनाचा एवढाही बाजार उठवू नकाहो
कथा छान हृदयस्पर्शी आहे.
छान 'लिहीली' गेली असती तर डोळ्यात उभं राहिलेलं पाणी वाहायला लागलं असतं... असो.
पुलेशु. :)
In reply to कथा छान हृदयस्पर्शी आहे. छान by प्यारे१
सहमत, शब्दांची निवड आणि शुद्धलेखनाकडेही लक्ष पुरवलं असतंत, तर कथा खरोखर काळजाला भिडणारी झाली असती, नुसतीच वाचनीय राहिली नसती. कथेच्या वातावरण निर्मितीला याही गोष्टींचा हातभार लागत असतो.
आदन (आधण), स्वताहाच (स्वतःचं), तरकलय (..?) असे अनेक शब्द योग्य रीतीने टंकता येतील.
जे आधी माझ माझ होत ते सगळच तीनं केव्हाच आपल करून टाकल होतं
- हे वाक्यही असंच. तीनं (योग्य शब्द : 'तिनं') आणि होतं वरचा अनुस्वार अधोरेखीत शब्दांमध्येही हवा होता.
"प्रत्येक कामात तिला मी हवा असतो ." आणि लगेचच पुढच्या वाक्यात "सतत तिच्या डोळ्यासमोर लागायचो" अशीही गडबड झाली आहे.
टंकलेखनाच्या बाबतीतली बरीच मदत (आणि चिक्कार मनोरंजन) इथे उपलब्ध आहे. मनोगतावरही लेखन तपासून मिळण्याची सोय आहे. शब्दांच्या निवडीसाठी आपलं लेखन पुन्हापुन्हा वाचणं हा उपाय आहे.
बाकी साध्या, नित्य घडणार्या घटनांमधली भावनांची आंदोलनं तुम्ही छान टिपता, हे नक्की. लिहीत राहा.
पु.ले.शु.
In reply to +१ by इनिगोय
डिस्क्लेमरः
मी प्यारे१, इनिगोय या आयडी ला/ना अथवा इनिगोय प्यारे१ ला वैयक्तिकरित्या नाहीच पण दूरान्वये देखील ( खरडवही, ख रडफळा, व्यनि, अथवा इतर संदेशवहनाच्या कोणत्याही साधनाच्या वापराद्वारे देखील ) ओळखत नाही.
तद्वत मत मांडण्यातील, विचारांमधील समानता हा निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद. :)
In reply to +१ by इनिगोय
+१०००
In reply to +१००० by ५० फक्त
यांच्याशी माझा इथेच आणि या लेखाच्या निमित्ताने परिचय झाला आहे, असे आनंदाने नमूद करत आहे. (हे चालेल ना प्यारेजी? :) )
In reply to मी इनिगोय, प्यारे१ आणि ५० फक्त by इनिगोय
@ इनिगोयः
चालेल कसलं ? धावेल, धावेल...!
हाथ मिलाओ! ;)
मस्त ग पू. आवडली मला. :)
प्रतिक्रियेन्बद्दल धन्यवाद ........
मनापासुन आभारि आहे .
फक्त इतकच आता लिहायला जमतय.
छान गोष्ट, संयमित लिखाण, अगदी 'प्पू'स्टाईल..... शुद्धलेखनातली निरागसता आता दूर ठेवायचा प्रयत्न करा ;-)
आवडली. नेहमीप्रमाणेच..... :-)
एक्दम खोलवर जखम :(
गोष्ट छान आहे.. पण पुन्हा दु:ख उगाळत बसण्यात काय अर्थ आहे..
- पिंगू
आवडली.
आणी प्रतिक्रियांविषयी -
दु:ख का उगाळता वगैरे प्रतिक्रिया वाचल्या. मजा वाटली
साहित्यात जसे नवरस असतात तसे माणसाच्या आयुष्यातही असतात. सगळ्यांचिच मजा लुटायची असते.
In reply to गोष्ट छान आहे by राजघराणं
अशा मानसिकतेला सॅडिस्ट म्हणतात. तुम्हाला नवरस माहिती आहेत असं गृहित धरतो त्यातले कुठले एंजॉयेबल आहेत आणि ते कसे एंजॉय करतात ते कळू शकेल का? (विषेशतः रौद्र आणि बिभित्स)
In reply to दु:खात मजा असते? by संजय क्षीरसागर
>>अशा मानसिकतेला सॅडिस्ट म्हणतात.
-- असेलही. पण दु:ख आवरायाला कधी कधी "चलो काम आ गई दिवानगी अपनी" आवश्यक असते.
>>तुम्हाला नवरस माहिती आहेत असं गृहित धरतो त्यातले कुठले एंजॉयेबल आहेत आणि ते कसे एंजॉय करतात ते कळू शकेल का? (विषेशतः रौद्र आणि बिभित्स)
-- कुठल्याही रसाला कलेच्या कोंदणातुन एंजोय करता येतं. आणि मन जर बॅटींग करण्यात निपुण असेल तर कुठल्याची रसाच्या चेंडुला "प्ले" करु शकतं.
अर्थात, सर्कस मनाच्या रिंगणात होत असते... प्रेक्षक बनता आलं तर अत्युत्तम.
अर्धवटराव
In reply to मध्येच टांग मारतोय, क्षमस्व !! by अर्धवटराव
कुठल्याही रसाला कलेच्या कोंदणातुन एंजोय करता येतं. आणि मन जर बॅटींग करण्यात निपुण असेल तर कुठल्याची रसाच्या चेंडुला "प्ले" करु शकतं.
अर्थात, सर्कस मनाच्या रिंगणात होत असते... प्रेक्षक बनता आलं तर अत्युत्तम.
मस्त .....:)
In reply to दु:खात मजा असते? by संजय क्षीरसागर
तुम्हाला नवरस माहिती आहेत असं गृहित धरतो त्यातले कुठले एंजॉयेबल आहेत आणि ते कसे एंजॉय करतात ते कळू शकेल का? (विषेशतः रौद्र आणि बिभित्स)
नवरसातील प्रत्येक रस एन्जॉय करण्यासाठीच आहेत या गैरसमजात का वावरताय?
प्रत्येक रसाचा आस्वाद वेगळ्या प्रकारे घ्यायचा असतो
जेवणाला संपूर्णत्व येण्यासाठी षड्रस असतात( तिखट गोड आंबट कडू तुरट खारट ) यातील चवींच्या काँबेनेशनमुळे जेवणाला चव येते.
साहित्यातील नवरसांचे असेच आहे. करूण ,भीषण इत्यादी रसनिष्पत्ती असलेले मजकूर साहित्य सम्पन्न करतात.
कथा खुपच छान आहे!!आवडली मला!!!!!
उत्तम !!
(वाचताना भावुक झालेला)
उत्तम !!
(वाचताना भावुक झालेला)
मनाला स्पर्शून गेली. मीही तीला स्कूटी घेवून दिली. कधीएही सवय नसताना तीचा अपघात झाला. हात मोडला. दच्वाक्गान्यातभरती.
आजही मी तिच्या दररोज प्रेमात पडतो. कितीही संशयी असली तरी तू मला हवी आहेस.
बाआआआआआआआआस एवढेच.
हम्म्म्म......