Skip to main content

प्रॉन्स बिर्याणी

लेखक मृगनयना यांनी शुक्रवार, 01/06/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : कोळंबी - १/२ किलो लिंबाचा रस केशर २ टीस्पून गुलकंद आलं - लसून पेस्ट १ चमचा ३-४ कांदे बारीक चिरलेले ४-५ टोमॅटो बारीक चिरलेले २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या कढीपत्ता काही पाने १ टेस्पून कसूरी मेथी बारीक चिरलेली कोथींबीर बारीक चिरलेला पुदिना २-३ टेस्पून साजूक तूप १/२ टीस्पून लाल तिखट १/४ टीस्पून हळद १/२ टीस्पून गरम मसाला पावडर लवंग , काळी मिरी आणि दालचिनी मोकळा शिजवलेला भात. मीठ चवीनुसार पाककृती : कोळंबीला लिंबाचा रस आणि मीठ लावून मॅरीनेट करण

माझ्या निसर्गास..

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 01/06/2012 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
विषादाने मन ओतप्रोत भरलेलं असताना, अंगावर येणारी झुळूक, तुझं आस्त्तित्व जाणवून देणारी.. तुझं सुंदर हिरवंगार, रूप पाहून मळभाने दूर सरावंच! निराशा झटकण्यासाठी, नव्या जोमाने लढण्यासाठी, चैतन्याला जिवंत ठेवण्यासाठी, खरं तर- जगण्याचंच बळ मिळवण्यासाठी, पुन्हा तुझाच आधार, तुझीच गरज...! कधी कधी मग आपसूकच मिळतं उत्तर- का तुझ्या इतकी जवळ आहे ते.. फक्त, तू प्रलय घडवून आणू नकोस...!

बुवांचा जन्म

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 01/06/2012 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका वाचनमात्र मिपासदस्याकडून इमेलवर मिळालेली कथा. त्यांच्या परवानगीने प्रसिद्ध करत आहे. प्रेरणा/मूळ कथा: भुताचा जन्म. लेखक - द. मा. मिरासदार
-------------------------
गेले चार दिवस भिंतीला तुंबड्या लावत होतो. काय करणार? मी सतत मिपावर पडीक. कामाच्या नावाने बोंब. **वर एक सणसणीत लाथ मारून साहेबांनी हाकलला मला. तेवढीच एक बसली असती तर ठीक पण साहेब भारदस्त त्यांची लाथ त्यांच्याहून भारदस्त. मी जो कोलमडलो तो थेट डोक्यावर जाऊन पडलो. तेव्हापासूनच थोडासा बदलत चाललो होतो हे लक्षात येत होते. त्यातच देशमुख्याचा फोन आला. देशमुख्या म्हणजे बापमाणूस. नै नै तसा बाप नाही.

डुबुकवड्यांची आमटी

लेखक आर्या१२३ यांनी गुरुवार, 31/05/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
मसाल्यासाठी: मिरे: ८-१० लवंगा-५-६ दालचिनी- २-३ मसाला वेलदोडा_ ३ चक्रफुल- ४ लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे घरची गरम मसाला पावडर आवडत असल्यासः २ चमचे सुके खोबरे: अर्धी वाटी कांदे: मध्यम आकाराचे ३ लसुणः ८-१० पाकळ्या आलं- बोटाच्या पेराएवढं मीठः आवडेत तितकं डुबुकवड्यांसाठी: बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन मीठः चवीपुरते लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा हळदः किंचित ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा क्रमवार पाककृती: मसाल्याची आमटी: कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल.

एक कोडे घालु ?

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 31/05/2012 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
एक कोडे घालु ? :p एक घर , घरात नऊ मुले , मुले मोठी झाली ,लग्ने झाली , वाद होउ लागले म्हणुन सगळ्यानी वेगळे व्हायचा निर्णय घेतला, वाटण्या करुन टाका आता, अशी बापाकडे मुलांची मागणी . जमिन जुमला नव्हता , होता दुधाचा व्यवसाय ,८१ म्हशी होत्या. नऊ मुलांना नऊ-नऊ याप्रमाणे ८१ म्हशींचे वाटप झाले पण पुन्हा मुलांमध्ये वाद ! कारण होते प्रत्येक म्हशीला क्रमांक दीलेला होता ,कारण प्रत्येक म्हशीचे दुध देण्याचे प्रमाण वेगवेगळे होते . उदा. म्हणजे क्रमांक १ ची म्हैस १ लि. दुध देत होती. क्रमांक १० ची ,१० लि. कमांक २५ ची २५ लि. अन क्रमांक ८१ ची ८१ लि. समजले ?

थोडी सुखी, थोडी कष्टी

लेखक शरद यांनी गुरुवार, 31/05/2012 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
"आली माहेरपणाला ('http://www.misalpav.com/node/18384) या इंदिरा संत यांच्या कवितेत आपण एका माहेरवाशीणीची व्यथा पाहिली होती.पण ही अशी एखादीच व्यथा असू शकते असे नाही. या माहेरच्या भेटीत अनेक पैलू पहाता येतात.स्वत:च्या पहिल्या मंगळागौरीकरिता वा बाळंतपणा करिता येणारी,घरातील दुसर्‍या एखाद्या मंगलकार्याकरिता येणारी, ... अशा आनंददायक घटनांबरोबरच घरातील एखादी वृद्ध व्यक्ती गमावणे अशा दुख:द प्रसंगाकरिताही ती माहेरी येणे अपरिहार्य असते. अनेक कवितांचे बीज ह्या भेटीत कवीला खुणावत असते. विंदा करंदीकरांनी अशीच एक हळुवार कहाणी पुढील कवितेत गायिली आहे.

रिसेल फ्लॅट घेताना

लेखक राजो यांनी गुरुवार, 31/05/2012 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी पुण्यामधे रिसेल फ्लॅट घेण्यास इच्छुक आहे. तरी यासंबंधी कोणती खबरदारी घ्यावी? फ्लॅट्स बद्दल जाहिराती गोळा करतांना अनेक शब्द कानावर पडले. जसे कि गुंठेवारी, कलेक्टर एन ए,... यासंबंधी अधिक माहिती मिळेल का? रिसेल फ्लॅट साठी गृहकर्जाचे काय नियम आहेत?

प्यार्टी साठी मदत हवी आहे

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 31/05/2012 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्स. आमच्या एका मित्रवर्यांच्या प्रगट दिना निमित्त ह्या रविवारी प्यार्टी करण्याची योजना आखणे चालू आहे. साधारण १० ते १२ लोक्स ह्या संमेलनाला हजर असतील. संमेलनाचे ठिकाण सुचवण्यासाठी मिपाकरांची मदत हवी आहे. १) संमेलन स्थळ पुण्यापासून साधारण १.३० ते २ तासाच्या अंतरावरती असल्यास उत्तम. २) ठिकाण शक्यतो शांत आणि थोडाफार निसर्ग आजूबाजूला असल्यास उत्तमच. ३) सर्व संमेलक हे कावेरी विद्यापीठाचे स्नातक असल्याने त्यांना मदिरा आणि गिळायला अन्न ह्याची आवश्यकता आहेच.