विषादाने मन ओतप्रोत भरलेलं
असताना, अंगावर येणारी झुळूक,
तुझं आस्त्तित्व जाणवून देणारी..
तुझं सुंदर हिरवंगार,
रूप पाहून
मळभाने दूर सरावंच!
निराशा झटकण्यासाठी,
नव्या जोमाने लढण्यासाठी,
चैतन्याला जिवंत ठेवण्यासाठी,
खरं तर-
जगण्याचंच बळ मिळवण्यासाठी,
पुन्हा तुझाच आधार,
तुझीच गरज...!
कधी कधी मग आपसूकच मिळतं उत्तर-
का तुझ्या इतकी जवळ आहे ते..
फक्त,
तू प्रलय घडवून आणू नकोस...!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1045
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
पण ती उरलेली पत्रं कुठं दिसत नाहीत. नाही म्हणजे पत्रांचा स्टॉक(अस्तित्व :-)) संपला असेल तर कळवा पाठवून देतो. पण असं मधुनच मालिका तोडणं काही बरं नाही. आशा आहे भावना पोचल्या असतील.
अमृत
अमृतजी, केलाय भाग तिसरा
अमृतजी,
केलाय भाग तिसरा पोस्ट, आभारी आहे.
वेणू
वेणू तुला नक्की काय सांगायच होतं ते सांग. रघू