फोटोशॉपची किमया- फोटो धुरकटला ? नो प्रॉब्लेम !
मिपाकर मित्रानो,
आपल्या कॅमेर्यात मॅन्यूअल कंट्रोल असतात. पण बर्याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा " त्यापेक्शा आटो बरा , आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशेबाने मॅन्यूअल कंट्रोल वापरण्याचे आपण सर्व जण ( त्यात मी ही आलो) टाळतो.
आपला फोटो भुरकट येणे व धुरकट येणे या वेगवेगळ्या समस्या आहेत. आपल्याला फोकस जमला नाही की फोटो भुरकट येतो. पण फोटोत वातावरणातील दोषांमुळे एक धुरकट रंगाचा पातळ थर फोटोवर येतो. बहुतेक वेळा उन्हाकडे तोंड करून स्नॅप घेतला तर हा प्रकार घडतो.
असा फोटो आपल्या डोळ्याला त्रासदायक वाटतो.
मिसळपाव