किल्ले विसापूरः एक भन्नाट अनुभव
किल्ले विसापूर, पवनमावळच्या संरक्षक दुर्गचौकडीपैकी एक. चौकडीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात उंच. चहूबाजूंनी कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण असलेला पुराणपुरूष.
भटकायला जायचा प्लान अचानक ठरला तो रात्री आलेल्या मित्राच्या एका फोनमुळे. सकाळी ९ वाजता मळवली स्टेशनावर पुणे लोणावळा लोकलमधून उतरलो. कुठे जायचे हे नक्की नव्हतेच. शेवटी भाजे, कार्ले, लोहगड ही असंख्य वेळा जाणे झालेली ठिकाणे वगळून विसापूर गाठायचे ठरले. लोहगडावर तर २०/२५ वेळा जाणे झालेले आहे पण त्याचाच जुळा भाऊ असलेल्या विसापूरला मात्र एकदाच आणि तेही बर्याच वर्षांपूर्वी गेलो होतो.
मिसळपाव
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.