Skip to main content

(किल्ले विसापूरः एक वेगळा अनुभव)

लेखक sagarpdy यांनी बुधवार, 13/06/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज हा धागा वाचला आणि माझ्या विसापूर च्या भटकंतीच्या आठवणी ताज्या झाल्या. किस्सा तसा मोठा असल्याने वेगळा धागा काढला. (फोटो सापडल्यास नंतर डकवण्यात येतील) जेव्हा पुण्यात शिकण्याच्या निमित्ताने नुकताच आलो होतो, तेव्हाचा हा किस्सा, मी आणि माझा एक वर्गमित्र, दोघानाही गिर्यारोहणाची चढलेली नवखीच हौस! दोघंच जण कुठेही भटकायला जायचो, स्पोर्ट्स शूज वगैरे लाड कधी झाले नव्हते, तेव्हा चप्पल घालून जगभर भ्रमंती. (असे करता करता घोरोडेश्वर बरोबर तळेगाव, देहूरोड च्या जवळचे बहुतेक सगळे डोंगर, त्यावरील कोणत्या जगावेगळ्या वाटांनी भटकून झाले होते).

एलियन आणि प्रॉमिथियसच्या निमित्ताने ...

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 13/06/2012 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बघणं हा कधीकधी त्या चित्रपटापेक्षा त्याच्या कथादुनियेत रमवणारा एक अनोखा अनुभव असू शकतो. म्हणजे ज्या इहलोकात तो घडतो, ज्या जगाचे परिमाण त्या चित्रपटाशी आणि त्याच्या पटकथेशी निगडीत असतात तेच कित्येकदा आपणास अत्यंत समाधानकारक अनुभव देऊन जाऊ शकतात. सायन्स फिक्शनचे काल्पनिक जग हे एका कलाविष्कारापुरताही सीमित असू शकते जसे "वॉर ऑफ द वर्ल्ड"चे जग; म्हणजे आधी कॉमिक्स आणि नंतर स्टिवन स्पीलबर्गने टॉम क्रुसला घेऊन बनवलेल्या चित्रपटात दाखवले गेलेले.

मेहदी हसन यांना श्रद्धांजली!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 13/06/2012 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिद्ध गायक मेहदी हसन यांचे निधन झाले आहे अशी बातमी नुकतीच समजली. त्यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली! या निमित्ताने त्यांनी गायलेल्या गझलांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल चर्चा व्हावी ही अपेक्षा! माझ्याकडून हे... सुरूवातीचा संवाद ऐकण्यासारखा आहे. ***

का लिहितो मी कविता?

लेखक रसप यांनी बुधवार, 13/06/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
का लिहितो मी कविता? कारण 'ती' लिहित नाही.. तीच जिला आजकाल गुलाबी रंग खूप आवडतो किती ठोके चुकले त्याचा हिशेब नेहमी चुकतो ती हसत राहते मनातल्या मनात कुणालाच न सांगता मी तेच मोती वेचतो आणि गुंफतो माझी कविता ! का लिहितो मी कविता? कारण 'तो' लिहित नाही.. तोच ज्याला कुठे दुखतंय तेच कळत नाही, पण दु:ख उगाळायला आवडतं त्याची व्यथा डोळ्यातून झरत राहते काहीच न बोलता.. मी तेच शब्द टिपतो आणि गातो माझी कविता ! का लिहितो मी कविता? कारण 'तो' लिहित नाही.. तोच जो फक्त किनाऱ्याच्या दगडांवर आपटत राहातो पुन्हा पुन्हा मागे जाऊन, पुन्हा पुन्हा उसळत राहातो तो खवळतो, आतल्या आत खदखदतो.. कधीच न थकता मी तोच उत्साह चोरतो

शांघाय

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 13/06/2012 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
विकांताला मेंदूला झालेला त्रास बघता ह्या वेळी मेंदूचा वापरच करावा लागणार नाही असा एखादा मसालापट बघायचे ठरवले आणि पावले चालली 'शांघाय'ची वाट. 'पोलिटिकल थ्रिलर' असा गाजावाजा झालेला हा चित्रपट ना पोलिटिकल थ्रिलरच्या अपेक्षा पूर्ण करतो ना नुसत्या थ्रिलरच्या. हान काही काही प्रसंगात थिल्लर वाटण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे हे नक्की.

पातळ पोहे चिवडा --

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 13/06/2012 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - पातळ पोहे अर्धा किलो, शेंगदाणे एक वाटी, चिवडा डाळे अर्धी वाटी, कडीपत्ता, मिरची पावडर एक चमचा, धने पुड एक चमचा, मिठ चवीनुसार, पिठीसाखर एक चमचा, तेल, फोडणी साहित्य, कॄती -- पोहे निवडुन घ्या, कढईमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.. नंतर प्रथम जिरे हिंग, हळद घालून खमंग फोडणी बनवा त्यात कढीपत्ता घाला, शेंगदाणे घाला,चांगले खरपुस होईपर्यंत भाजा, आता त्यात डाळे घाला, मिठ, मिरची पावडर, धने पुड त्यातच घाला, पोहे घाला चांगले परतुन घ्या , मिठ तिखट सगळीकडे लागले पाहिजे.वरुन पिठीसाखर घालून पुन्हा थोडावेळ परतत रहा... झाला चिवडा तय्यार, खावुन पहा, चव कशी आहे, मिठ कमी असल्यास थोडे घाला व एकत्र कर

देव देवळातला

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 13/06/2012 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
देव देवळातला अधु झालाय हो देव देवळातला माणुस मेलाय हो माणसातला रक्ताळ्लेल्या उत्सवात मस्जिदे आणी मंदिरे रंगतात स्वप्नातल्या भाकड कथा आज आम्हाला धर्म सांगतात धर्मग्रंथातिल सुवचने आमच्या हत्यारात लपली धर्माच्या नावाखाली आज हिंसाही खपली माणुस कोण ? व्यक्ति काय ? फरक कुणी सांगेल काय ? माणुसकी च्या मंदिरातला देव आमचा जागेल काय ? (साभार) वरिल काव्य आपणास पटते काय ?कारण माणुसच माणसाला विसरत चालला आहे,या जगात फक्त एकच धर्म योग्य आहे ,व तो म्हणजे माणुसकी --

शेरलॉक होम्स म्युझियम

लेखक खेडूत यांनी बुधवार, 13/06/2012 03:53 या दिवशी प्रकाशित केले.
221 ब, बेकर स्ट्रीट- बहुधा जगातील सर्वात प्रसिध्द पत्ता! शेरलॉक होम्स या पत्त्यावर १८८१-१९०४ या काळात राहत असे आर्थर कोनन डॉयल यांच्या साहित्यात वर्णन आहे. शेरलॉक होम्स कथा वाचताना आपल्या मनात एक काल्पनिक वातावरण तयार होते..मागच्या शतकाच्या सुरुवातीचा काळ, जुने रस्ते, विक्टोरिया, पावसाळी कुंद वातावरण आणि शेरलॉक होम्स आणि इतर पात्रांचे स्टायलीश संवाद. खिळवून ठेवणारे कथानक. त्याचे अजब तर्क आणि वेगळा विचार करायची पद्धत! काल्पनिक आहे माहित असून कधीतरी पहायला हवे असे वाटणे. हेच ऑर्थर कोनन डॉयल चे वैशिष्ट्य. रहस्यकथा वाचायची आवड असलेल्या प्रत्येकाला कधीतरी शेरलॉक होम्स वाचायचे चे वेड लागतेच.

पु लं , तुम्ही परत या

लेखक yeda यांनी बुधवार, 13/06/2012 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
पु लं , तुम्ही परत या. आम्हाला येवून हसवा. खूप खूप हसवा. तुम्हाला जावून आज १२ वर्ष झाली. आम्ही पोरके झालो. १२ वर्षात आमच्या आयुष्यात बरेच बदल झाले. अहो, 'भाई' या शब्दाचा अर्थही बदललाय. विनोदाची व्याख्याही बदललीय. तुमच्या सारखा निर्भेळ विनोद आज नाही. आज पोपट पंचीला प्रतिष्ठा मिळाली आहे. निराश झालो कि तुमचे टेप केलेले कार्यक्रम बघतो; मनाला उभारी येते. आजही नारायण आहे, आजचा नारायण जीन्स घालतो, रंगीबेरंगी टीशर्ट घालतो. मनगटावर किमती घड्याळ, डोळ्यावर ray -ban चा गॉगल घालतो. पायात reebok चे बूट घालतो. हातात आयफोन असतो. तो बाईक चालवतो. पण तो तेवढाच जुन्या वळणाचा आहे .