221 ब, बेकर स्ट्रीट- बहुधा जगातील सर्वात प्रसिध्द पत्ता! शेरलॉक होम्स या पत्त्यावर १८८१-१९०४ या काळात राहत असे आर्थर कोनन डॉयल यांच्या साहित्यात वर्णन आहे.
शेरलॉक होम्स कथा वाचताना आपल्या मनात एक काल्पनिक वातावरण तयार होते..मागच्या शतकाच्या सुरुवातीचा काळ, जुने रस्ते, विक्टोरिया, पावसाळी कुंद वातावरण आणि शेरलॉक होम्स आणि इतर पात्रांचे स्टायलीश संवाद. खिळवून ठेवणारे कथानक. त्याचे अजब तर्क आणि वेगळा विचार करायची पद्धत! काल्पनिक आहे माहित असून कधीतरी पहायला हवे असे वाटणे. हेच ऑर्थर कोनन डॉयल चे वैशिष्ट्य. रहस्यकथा वाचायची आवड असलेल्या प्रत्येकाला कधीतरी शेरलॉक होम्स वाचायचे चे वेड लागतेच. मग इतकं वेड जगभरातल्या लोकाना आहे तर असे एक घर तयारच का करू नये? झालं कल्पना सुचली आणि अमलात पण आली. आणि साकारलं एक सुंदर संग्रहालय..
१९९० साली हे सुरु झालं असलं तरी २२१ ब हा (खरा तिथला नसलेला )पत्ता मिळवायला निर्मात्यांना बराच त्रास पडला. मुळात हे घर २३७ आणि २४१ क्रमांकाच्या घरांमध्ये आहे. शेरलोक होम्स आणि डॉ. वाटसन हे मिसेस हडसन च्या गेस्ट हाउस मध्ये भाडेकरू होते असे लिहिले गेले होते. गेली ऐंशी वर्षे शेरलोक होम्स साठी येणारी जगभरातली पत्रं Abbey National ही बँक पहात असे. कारण हा त्यांचा खरा पत्ता ! हल्ली ही पत्रे थेट संग्रहालयाला मिळतात.रॉयल मेल अर्थात ब्रिटीश पोस्टाने लोकप्रियता पहाता ते मान्य केले
एकदा या प्रसिद्ध पत्त्यावर भेट द्यायची खूप इच्छा होती. जालावर समजलं की नाताळ चा दिवस सोडून वर्षभर साडेनऊ ते सहा हे संग्रहालय सुरु असते. मादाम तुसाद्स संग्रहालयामागे चालताना अगदी समोरच हेही संग्रहालय आहे. एकदा पहावेच असे सन्ग्रहालय आहे.
एकदा बेकर स्ट्रीट ला गेल्यावर विचारायला पण लागत नाही. महाशय आपला तोच पाईप घेऊन स्टेशन समोर स्वागताला उभे! इथून अवघ्या दोनशे पावलांवर २२१ ब बेकर स्ट्रीट!
शेरलॉक होम्स यांचे कार्ड…त्यावर फोन नंबर नाही!
या जुन्या घराच्या तळमजल्यावर प्रवेशिका घेऊन रांगेत उभे राहिलो. सगळीकडे पारंपारिक इंग्रजी वेषातील कर्मचारी पाहून छान वाटते.
घराबाहेरच एक गार्ड स्वागतासाठी उभा आहे. हाच तिकिटे पाहून आत सोडायचे काम करतो.
हे एक जुने घर असल्याने एकाच दारातून आत बाहेर जावे लागते. एका वेळी फक्त दहा-पंधरा व्यक्ती आत जातील हे तो पहातो. त्यामुळे पंधरा मिनिटे रांगेत वाट पहावी लागते.
मग प्रवेश मिळाला अन एक खजिनाच उघडल्याचा भास झाला. पहिल्या मजल्यावर मूळ कथेतील घराप्रमाणे खोल्या सजवल्या आहेत. त्यावर दोन मजले तत्कालीन इतर वस्तू , व्यक्ती आणि प्रसंगांवर आधारित आहेत.
इथे तर डॉ वाटसन किंवा शेरलॉक होम्स येऊन 'हेलो! इथे काय करतोयस?'’ विचारतील असे वाटले.
गुप्तहेराची छोटीशी प्रयोगशाळा
जमवलेले पुरावे
आर्थर कोनन डॉयल यांचे हस्तलिखित
'Man with twisted lip’ डॉयल यांची एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा.. मेणाच्या पुतळ्याच्या रुपात...
काही वेळा केवळ तीन मजले भरायचे म्हणून उगाचच काही वस्तू गोळा केल्या असे वाटते अन तेव्हढेच खटकते. उदा. शिवण यंत्र , व्हायोलीन वगैरे!
या घराच्या तुलनेत जे होम्स पट आले त्यात बऱ्यापैकी मोठी घरे दाखविली आहेत आणि ती कथेला अनुरूप पण वाटतात. पण अधिकृत घर मात्र असं आहे.
शेवटी आपल्याकडे असे संवर्धन का करून ठेवले जात नाही हा प्रश्न पडतोच. व्यवस्थित तिकीट विकत घेऊन पहायला लोक तयार असतात. पण आधी ते तयार तर केले पाहिजे ना?
भारतात मोजके सन्माननीय अपवाद वगळता संग्रहालय म्हणजे केवळ पुरातन अवशेष दाखवले जातात. काही नवीन भर टाकून ते चांगले करता येईल. पुण्यातले केळकर म्युझियम आणि रेल्वे म्युझियम असे वैयक्तिक संग्रह सोडले तर आवर्जून पहावे असे काही निर्माण झाले नाही. आणि इथे तर अस्तित्वात नसलेल्या, केवळ साहित्यिक अस्तित्व असलेल्या व्यक्तित्वाचे, त्यातल्या पात्रांचे संग्रहालय बनवले आहे! आणि त्यासाठी वेड असावं लागेल नव निर्मितीचं ..

वाचने
10386
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरें लिव्हलाव हो!
वा
आवडले. कधीन राणीच्या देशात
मस्त!!! धन्यवाद ह्या सुंदर
वाह!
वावावा !बसल्याजागी आमच्या
कीर्तीकरांबद्दल प्रथमच वाचलं
In reply to वावावा !बसल्याजागी आमच्या by यकु
नवीनच माहिती.
In reply to वावावा !बसल्याजागी आमच्या by यकु
आईच्या गावात!!!! एक नंबर हो
काल्पनिक पात्राचं असं
तुमच्या बरोबर २२१ ब बेकर स्ट्रीटवर फिरुन आल्यासारखं वाटलं!
अभिनंदन.
डोळ्याचे पारणे फिटले.
बाकी अत्यंत कुशाग्र
In reply to डोळ्याचे पारणे फिटले. by सुधीर
हो मान्य!
In reply to बाकी अत्यंत कुशाग्र by यकु
थँक्स. चुकीच्या आडनावाबद्दल
In reply to हो मान्य! by सुधीर
चांगली सफर घडवलीत. धन्यवाद.
छान