पुस्तक परिचय - ग्रोईंग अप बिन लादेन
११ सप्टेंबर २००१ - नेहमीप्रमाणे रात्री रिमोट हातात घेऊन चॅनेल सर्फिंग चालू होतं. रिमोटचं Next बटनं दाबता दाबता अचानक एका न्यूज चॅनेलवर हात थबकला. एका उंच बिल्डींगवर एक विमान जोरात धडकतांना दिसत होतं. अतिशयोक्ती वाटेल पण एका क्षणापुरतं तो सीन मला एखाद्या इंग्रजी मारधाडपटातला वाटला. अमेरिकेच्या Twin Tower वर दहशतवादी हल्ला झाला होता. घटना समजायला ५ मिनीटं गेली आणि पुढची ५ मिनीटं धक्क्यातून सावरायला. "असाही हल्ला होऊ शकतो??" हे फारतर चित्रपटांतच मी कल्पना केलं असतं. या घटनेनंतर काही दिवसांनी "अल-कायदा" या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली.
मिसळपाव