Skip to main content

सुंदर ते ध्यान

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 07/07/2022 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
ध्यास सावळ्या विठूचा मनी वाट पंढरीची चालावी चालावी... समस्त संतांना ज्या रूपाने भक्तीची दीक्षा दिली,त्याच विठूच्या रूपाचा ध्यास घेत आजही भक्तीमय वारकरी पंढरीकडे मार्गस्थ करीत राहतो.

ऑफलाईन मराठी टायपिंग कसे करावे?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 07/07/2022 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ: उपाशी बोका यांचा धागा: http://misalpav.com/node/49825 ऑफलाईन मराठी टायपींगसाठी अनेक पद्धती आहेत. उपाशी बोकाने वर सांगितल्याप्रमाणे मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे. वरील धाग्यात बोकाने कळफलकचा कोड बदल केला असावा असे दिसते. मराठीबोला.कॉम च्या वेळी मराठी टायपींगसाठी मला असले अनेक प्रकार करावे लागले होते. तर मंडळी, मी त्यातल्या त्यात ऑफलाईन टाईप करण्यासाठी दोन सोप्या पद्धती कोणत्या ते आपण पाहू. तिसरी पद्धत ही मोबाईलवर टायपिंग करणे हे गमभनच्या जवळपास जाणारी प्रणाली आहे.

हॅप्पी बर्थडे माही….

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 07/07/2022 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या हिंदी चित्रपटात एक सिन असायचा बघा..एक गुंडांची टोळी हिरॉईनच अपहरण करते.. एका सूनसान जागी तिला बांधून ठेवल जातं.. आणि तिचा छळ केला जायचा...तिच्या अंगाला त्या टोळीच्या म्होरक्याचा हात लागतो न लागतो तोच आपला हिरो अचानक एन्ट्री मारायचा...आधी तो थोडा मार खायचा पण मग पुढे त्याचा पवित्रा अचानक बदलायचा आणि तो गुंडांना बदडून काढायचा...क्रिकेटच्या मैदानावर पण असाच एक हिरो होता. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडायचा तेव्हा तेव्हा तो अगदी शांतपणे मैदानात एन्ट्री करायचा आणि आपल्या स्टाईल मध्ये सामना जिंकवूनच परतायचा..

(सन्तूर)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 07/07/2022 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा आमचे परम मित्र श्री श्री १०८ अनन्त्_यात्री यांची ही कविता http://misalpav.com/node/50404

(सन्तूर)

झटपट छनछन तुषार अगणित भवतालाला व्यापत उडले रोमरोम पुलकित करुनी त्यांनी वरुणावरती गारूड केले स्वरचित्रातील अवकाशात अचूक तिचे आगमन झाले सुंदरीचे त्या चिमुरडीशी निगूढ नाते पुनश्च कळले स्वप्नशिल्पातील कल्पनेचा वर्तमानाशी घालूनी मेळ नेहमी सारखा सहज रंगला सुपरमॉमचा अद्भुत खेळ पैजारबुवा, कवितेतले गूढ उलगडण्यासाठी खालील व्हिडीओ जरूर पहावा https://www.youtube.com/watch?v=Oy9za_67vg

सन्तूर

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 06/07/2022 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्वरतत्वाचे तुषार अगणित भवतालाला व्यापुनी उरले रोमरोम पुलकित करणार्‍या स्वरपुंजांनी गारूड केले स्वरचित्रातील अवकाशाच्या सुप्त मितीचे दर्शन झाले स्वरलहरींचे जललहरींशी निगूढ नाते पुनश्च कळले स्वरशिल्पातील अमूर्ततेचा चिरंतनाशी घालुनी मेळ शब्दावाचून सहज रंगला विलक्षणाचा अद्भुत खेळ

बहारो फूल बरसाओ - ३

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 06/07/2022 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
माया माझ्याकडे पहाते. थोडी हसते. हसताना तीचे डोळे अधीकच पाणीदार दिसतात. ओठांना लावलेल्या ड्रीम रोझ लिप्स्टीक मुळे तीचे दात ही एकदम जहिरातीतल्या मुलीसारखे वाटताहेत. "अगं चला , चला, तिकडे गुरुजी खोळंबलेत. नवरदेव येऊन उभा देखील राहिला. झालं ना सगळं. बघ गं मीरा, काही राहिलं नाही ना. मायाच्या आईची लगबग सुरू आहे. मागील दुवा http://misalpav.com/node/50355 नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. शुभमंगल सावधान..... सावधान ची सम पकडून लोक अक्षता फेकतात.

किल्ले जीवधन

लेखक चक्कर_बंडा यांनी सोमवार, 04/07/2022 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
२५ -२६ सप्टेंबर २०२१ ही भटकंती तशी मागील वर्षी केली आहे, पुन्हा पावसाला सुरुवात झालीय, अपेक्षा आहे कि आवडेल जीवधन !!! ऐन घाटमाथ्यावरचा उभ्या बेलाग कडय़ावरील दुर्ग. सहय़ाद्रीचा भेदक भूगोल, सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन नाणेघाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भारलेला आहे. पुणे जिल्हय़ातील जुन्नरपासून २७ किलोमीटरवर, प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी आणि घाटघर गावाच्या परिसरात असलेला हा पूर्वाभिमुख किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

पृथ्वी एक अंतराळयान

लेखक भागो यांनी सोमवार, 04/07/2022 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला मनातून अंतराळ वीरांचा हेवा वाटत असेल. लहानपणी अनेक स्वप्ने असतात. त्यापैकी एक म्हणजे अंतराळवीर होण्याचे! जुल व्हर्नचे ‘चंद्रावर स्वारी’ पुस्तक वाचले असणारच. पण पुढे मोठे झाल्यावर तुम्ही अंतराळवीरांच्या ट्रेनिंगची चित्रफित बघितली असेल किंवा हॉलीवूडचे चित्रपट बघितले असतील. मनातल्या मनात तुम्ही विचार केला असेल, “नको रे बाबा, त्यापेक्षा आपला ९ ते ५ जॉब चांगला आहे.” पण.... तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण आपण सगळेच अंतराळवीर आहोत! तुम्ही, तुमची प्रिया पत्नी, चिरंजीव गोट्या, शेजारचे काका-काकू, सोसायटीचा वॉचमन? येस, तो सुद्धा. आणि आपले अंतराळयान आहे पृथ्वी.

महाराज की जय..

लेखक आजी यांनी सोमवार, 04/07/2022 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी एका गावी राहात होते. माझ्या कडे एक १५/१६ वर्षांची मुलगी कामाला होती. वरकाम करायची. मी तिला शाळेतही घातलेली होती. तिच्या शिक्षणाचा खर्च मीच करायची. तिची आई माझ्याकडे काही जास्तीचं काम निघालं तर ते करायला यायची. तिचा नवरा दारुड्या होता. काबाडकष्ट करून मुलीचं,नवऱ्याचं आणि स्वतःचं पोट भरत होती. नेहमीचं चित्र. एके दिवशी मी तिला विचारले,"उद्या माळा झाडायचाय. येशील का?" तर ती म्हणाली,"मला हजार रुपये उसने द्या. मला भगताकडं जायचंय."मी म्हटलं "का ग?भगताकडं का? तुला काही होतंय का?" तिनं उत्तर दिले,"मला बाया आल्याती. उतरवायच्या आहेत." मला काही कळलं नाही.