संध्यासमय
लेखनविषय:
काव्यरस
विरल्या मनातल्या भावना, झाली संध्याकाळ .
संध्यासमयी पावसात, भिजलेले देऊळ !
श्रद्धेच्या आकांताने ,दिवस मावळला नदिकडे !
देवालयाचे शांत .. प्रतिमापुष्प त्यात पडे !
हवा असतो मनाला ,असा श्रद्धेचा उबारा .
हळवा नाजूक असत्य .. तरीही , काही क्षणांचा निवारा !
मावळलेल्या पावसाळी ..,वाटा जाती नदीकडे.
मध्ये उभे देवालय , मनाच्या संधीकडे !
काव्य आहे . . काव्यच असणार , म्हणूनी जीवन आहे .
मनाच्या गाभाऱ्यामध्ये श्रद्धेचे देवालय आहे .
तिथे लागते जेव्हा , वात समाधानाची .
हीच लोकहो अंतरीच्या , भगवंताची प्रचिती .
असा हा भगवंत कुणासही अंकित नाही
आपल्याच मनाचा तो , एरवी कोणीही नाही .
संध्यासमयी देवालयाने, शिकविले तत्त्वज्ञान !
नियती म्हणजे दुसरे नाही , अपुल्या प्रयत्नाचे पान .
याच श्रद्धेला घेऊन हाती , थांबतो या सुमनावर
बोलायचे आहे बरेच काही ... पण मन म्हणते . . . आवर .. काही काळ आवर !!!
========================
अतृप्त
वाचने
4712
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
खुप छान !
In reply to खुप छान ! by चौथा कोनाडा
देवालयाचा फोटो आणि त्यातले
In reply to देवालयाचा फोटो आणि त्यातले by चौथा कोनाडा
धन्यवाद
छान आहे.
मस्त...
मनाच्या गाभाऱ्यामध्ये
In reply to मनाच्या गाभाऱ्यामध्ये by Bhakti
पा.भे , पैजार , भकी -
फोटो आवडला.
In reply to फोटो आवडला. by कंजूस
मनःपूर्वक धन्यवाद
सुदंर भाव
सुदंर भाव
सुदंर भाव
सुदंर भाव
In reply to सुदंर भाव by कर्नलतपस्वी
धन्यवाद .