Skip to main content

आशा

लेखक sneharani यांनी सोमवार, 16/07/2012 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नावच कशाला हवं एखाद्या नात्याला ऋणानुबंध समज हवं तर..... हिर्‍याच्या तेजासम असणारा जिव्हाळा - त्याला नात्याच्या नावाचं कोंदण हवच कशाला? हिराही चमकतो की मग तो सोन्याचांदीच्या कोंदणात असला काय किंवा नसला काय.... अशा जिव्हाळ्याच्या हिर्‍यामधून आशेची किरणं परिवर्तित होतात... अन् मग रंगबेरंगी स्वप्नं आकार घेतात स्वप्नं सत्यात उतरताना आशेची किरणं सदोदीत साथ देत राहतील ही कदाचित पण नशिबाची साथ मिळायला लागतेच की... म्हणतात की लाख शिंपले उघडले की एखादा अनमोल मोती सापडेल इतके प्रयत्न करूनही नाही सापडला तर "नशीब" खोटं ठरत पण शिंपली उघडण्याची आस अन् त्या प्रत्येक क्षणात असणारी आशा सत्य होतीच ना? अगदी तसच
काव्यरस

हे सगळे गेले कुठे?

लेखक स्मिता. यांनी सोमवार, 16/07/2012 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात कोणत्या मित्र-मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून मनसोक्त गप्पा केल्या आहेत असा प्रश्न विचारल्यास फार कमी लोकांना ठाम उत्तर देता येईल. मात्र त्यात जीमेल वरच्या लिखित गप्पा किंवा स्काइपवरच्या ऑडिओ-व्हिडिओ गप्पांचा पर्याय टाकला तर बहुतेकांना ठाम उत्तर देता येईल. मी स्वतः या दुसर्‍या गटातली म्हणजे बहुसंख्यांपैकी आहे.

इशारा..

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 16/07/2012 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
सोकावालास का रे? अलिशान मंदिरात राहून? डॉलबी आरत्यांच्या गजरान कानाचे पडदेही फाटले असावेत. बहिरा झालायस का? सांजसकाळच्या छप्पन भोगांनी अ-पचन झाली असावीत अन धुपादिपांच्या आडून काही दिसतही नसाव आधी बरा होतास चार तुळ्यांनी कसबस पेललेल शिखर आत्ता पडतय की मग तुला चांगला जागृत ठेवत होत. एखादा गुळाचा खडा अन अधीमधी चव पालटिला चार फुटाणे बरचस चलाख ठेवत असावेत तुला कधी उमलली तर दिसणारी गुलबक्षिचि फुल तरतरी आणून जायची कापऱ्या आवाजातल्या स्तोत्रांना भुकेला होतास तेंव्हा चल उठ चल परत माळरानावर कुठेतरी शेताच्या बांधाला बस पुन्हा शेंदूर फासून अन त्यावर रेखलेले डोळे रोखून

का ग धरिला

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/07/2012 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला मी दिला होता सखे, चन्द्र तुझिया हाती फेकुनी पाण्यामधे, कवडसा का ग धरिला पाहिली होती सखे तू बेवफाई माझी श्वासातल्या जाणिवांचा, भरवसा का ग धरिला ओलावा शोधित, फिरलीस वणवण सखे संग ऐसा कोरडा, गरमसा का ग धरिला मखमली पाकळ्यानी लपविले मी कफन पदर त्याचा रेशमी, तलमसा का ग धरिला जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला
काव्यरस

काल

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 16/07/2012 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
सजगता किंवा अवेअरनेस म्हणजे वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची आपली क्षमता (The ability to differentiate between a fact & fiction). आपला अवेअरनेस जितका जास्त तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं. अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही.

मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

लेखक प्रास यांनी रविवार, 15/07/2012 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे.

दाल तडका

लेखक आचारी यांनी रविवार, 15/07/2012 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - १) १ वाटी तुरीची दाळ (यासोबतच हरभरा किवा मसूर / मुग दाळहि घालू शकता) २) ५ लसून पाकळ्या (बारीक चिरून घ्यावे) ३) १ इंच आले (बारीक चिरून घ्यावे) ४) हिरव्या मिरच्या - ५ (बारीक चिरून घ्याव्या ) ६) फोडणी साठी - कडीपत्ता , जिरे आणि तेल ७) तडका साहित्य - गरम मसाला, लाल तिखट, २-३ लाल सुक्या मिरच्या. कृती - १) तुरीची दाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. २) एका कढई मध्ये थोडे तेल घालून चांगले कडक होऊ द्यावे त्यात आधी मिरच्या , कडीपत्ता , जिरे घालावेत. नंतर आले लसून घालून एक दोन वेळा परतून लगेच त्यात शिजलेली दाल घालून थोडेसे पाणी घालून उकळू द्या.

मंदी आली का हो !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 15/07/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवाची गोष्ट. आमचा एक मित्र आहे. नुकतेच त्याचे कॉलेज संपले. नोकरीच्या शोधात आहे. म्हणून त्याचा बायो डेटा एका परीचिताकडे पाठवला. हा परीचित एका बँकींग क्षेत्रासाठी आय टी सर्व्हिस देणार्‍या कंपनीत काम करतो. म्हणाला 'अहो चूकीच्या वेळेला आलात." मागील आठवड्यातच आमच्याकडे काही शे लोकांना नारळ दिला. आम्हालाही नोटीस मिळालीये. निरोप समारंभ ३ महिन्यांनी होणार आहे. म्हणून तो बायोडेटा घेऊन गेलो दुसर्‍या मित्राकडे. त्याचे कम्पनी जागतिक, त्यामुळे बेंचही जागतिक.