Skip to main content

आपण सगळेच अश्वत्थामे

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 14/07/2022 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे. युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्‍यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव. अश्वत्थामा आपल्या कर्माची फळे भोगतोय.

आठवणींचा पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 13/07/2022 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रभर पडणारा पाऊस सकाळी नकोसा होतो कितीही हलका का असेना जेव्हा सतत बरसतो संध्याकाळी उदास वातावरणात मुसळधार कोसळतो तेव्हा नको त्या आठवणींचा पूर मात्र मनात येऊन जातो रात्र उदास जाण्याची चाहूल लागते मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो. - पाभे १३/०७/२०२२

पुस्तक परिचयः एक होता कार्व्हर-- विणा गवाणकर

लेखक सुजित जाधव यांनी मंगळवार, 12/07/2022 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता कार्व्हर ही लेखिका विणा गवाणकर यांची १९८१ साली प्रकाशित झालेली पहिलीच कादंबरी.. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची ही जीवनगाथा... आपल्या आईवडिलांचे नीट तोंडही पाहू न शकलेल्या कार्व्हर यांची जीवनकहाणी जितकी आपल्याला भावनिक करते तितकीच ती प्रेरणा देऊन जाते. या पुस्तकात लेखिकेने कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, त्यांनी जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुरेख रित्या शब्दबद्ध केलेली आहे.. अमेरिकेतील मिझुरी राज्यातील 'डायमंड ग्रोव्ह' पाड्यावर मोझेस कार्व्हर नावाचा एक शेतकरी आपली पत्नी सुझन कार्व्हर सोबत रहायचा.

आठवणींच्या जंगलात-१

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 12/07/2022 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
खाटेवर पडताच भूल दिल्या सारखी क्षणात झोप लागली......पुढे.... http://misalpav.com/node/50393/backlinks वाचकांचे, प्रतीसादकांचे धन्यवाद. काश्मीर खोर्‍यातील व सीमावर्ती भागातील भुमीपुत्रांना प्रतिकूल परिस्थितीची सवय आसते. सैनिकांना मात्र सर्वथा नवीन वातावरण,स्वतःला प्रकृतीशी मिळते जुळते घेताना विषम परीस्थीतीला तोंड द्यावे लागायचे/लागते. खास करून जेव्हां कडाक्याच्या थंडीत या भागात बदलून येतात त्यांना जास्त त्रास होतो. मी डिसेंबर मधे रिपोर्ट केला होता. "सर मुंडाते ही ओले पडे".

चारोळया: ताज्या घटनांवर

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 11/07/2022 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रूटस सीजर कुणीच नव्हता सारेच ब्रूटस होते. खंजीरीच्या पात्यांना रक्ताची तहान होती. जो पळतो तो जिंकतो बाजीरावाने घुडदौड केली निजामचा पराभव केला. शिंदेंनी विमानदौड केली उद्धवचा पराभव केला. दैवयोग किती षड्यंत्र केले किती वेश बदलले नशिबी मात्र माझ्या फक्त मंत्रिपद आले. ज्ञानी लोक रात्री झोपतात ज्ञानी रात्री जागतात गीतेचा संदेश हा शिंदेंना कळला होता. आजचा पाऊस वेगळा होता आसामच्या डोंगर-दर्‍यातून मुंबईत कोसळला होता. मर्सडीज पाण्यात बुडाली रिक्शा तरंगत होता.
काव्यरस

त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-२)

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 11/07/2022 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
दरम्यान, सकाळचा चहा येऊन गेला होता आणि नाश्ता यायला अजून थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे गाडीत काहींच्या सहप्रवाशांबरोबर गप्पा चालू होत्या, काहींचे वर्तमानपत्राचे वाचन सुरू होते, तर काहींची डुलकी सुरू होती, तर काहींचे मोबाईलमध्ये डोळे घालून काही पाहणे सुरू होते. पुढे भिगवणमध्ये आत जाताना शताब्दी थोडी हळू धावू लागली. भिगवणनंतर पुढे अजून दुहेरी मार्ग सुरू झालेला नसल्यामुळे इथे नेहमीच डाऊन दिशेला जाताना गाडीचा वेग मंदावत असतो. त्यामुळे मला वाटलं की, हळूच गाडी पुढे जाईल आता, पण तितक्यात वेग आणखी कमी झाला आणि गाडी 3 मिनिटं भिगवणमध्ये फलाटावर विसावली.

रंगदृष्टीचे तिरंगी सूत्र

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 11/07/2022 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीवरील जीवसृष्टीत निसर्गाने अनेक रंगांची उधळण केलेली आहे. ती अर्थातच मनमोहक आहे. विविध वनस्पती आणि प्राणी हे भिन्नरंगी असून ते वेळोवेळी आपापले ‘रंग’ दाखवत असतात ! मानवनिर्मित अनेक गोष्टीही रंगीत आहेत. विविध रंगांच्या दर्शनातून मनात वेगवेगळे भाव उमटतात. आपल्या दैनंदिन जीवनातील सुसूत्रता अनेक रंगांवर आणि रंगबदलांवर अवलंबून आहे. मुळात आपल्याला रंगज्ञान होण्यासाठी आपले डोळे व मेंदू यांच्यातील विशिष्ट यंत्रणा कारणीभूत आहेत. या अद्भुत व अमूल्य अशा जीवशास्त्रीय प्रणालीवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी हा लेख. निसर्गातील ज्या विद्युतचुंबकीय लहरी आपल्या डोळ्यांना जाणवतात त्याला आपण प्रकाश म्हणतो.

श्रीगणेश लेखमाला २०२२

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 10/07/2022 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीगणेश चतुर्थी हा आपल्या मिपाचा स्थापना दिन. त्या निमित्ताने दर वर्षी आपण गणेशोत्सवादरम्यान श्रीगणेश लेखमाला आयोजित करतो. विषयाचे काहीही बंधन नाही. फक्त श्रीगणेश लेखमालेसाठी पाठवलेले लेखन इतर संकेतस्थळांवर वा सामाजिक माध्यमांवर पूर्वप्रकाशित नको. लेखमालेसाठी प्रवेशिका साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेश करून पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा. sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल ॲड्रेसवरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता.

मिपा साईट कंपनी नेटवर्क मध्ये चालत नाही

लेखक लई भारी यांनी शुक्रवार, 08/07/2022 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस misalpav.com आमच्या ऑफिस नेटवर्क मध्ये ब्लॉक केली जातेय. "या साईट/सर्व्हर वरून याआधी malicious software, viruses spread होतात असे निदर्शनास आले आहे", अशा स्वरूपाचा मेसेज येतोय. याआधी कित्येक वर्षे चालत होती साइट नीट. Mobile वर चालतेय पण connection secure नाही असा मेसेज येतोय. असा अनुभव अजून कुणाला आहे का? Block Reason : DNS RPZ असे heading आहे block केल्या नंतर. वेगवेगळे browser वापरून बघितलेत.