Skip to main content

नायगारा धबधबा

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 08/07/2022 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
mipa ** mipa गोट बेटावर निकोल टेस्ला यान्चा पुतळा mipa ** mipa हायड्रो-एलेक्ट्रिक पावर mipa ** mipa नायगारा परिसर , आणी रेनबो ब्रिज mipa**mipa बोटीवरुन आणी जवळुन हाॅर्स शू फॉल्स mipa**mipa मेड ओफ द मिस्ट आणी मेड ओफ द मिस्ट थ्री सीस्टर्स बेटावरुन mipa**mipa व्हर्लपूल आणी फॉल्स टुगेदर. मेड ओफ द मिस्ट +हाॅर्स शू फॉल्स mipa**mipa हाॅर्स शू फॉल्स वेग वेगळ्या दिशेने धबधबा रात्रीच्या प्रकाशात mipa**mipa mipa**mipa mipa**mipa आमेरीक आणी कनेडा निरीक्श्ण टावर mipamipa ** mipa काय पाहल mipa**mipa भारतीय होटल्स mipa**mipa देशी विदेशी जेवण्यची सोय आणी सिनेमा आणी सन्ग्राहालय म्हणतात की ऋषीचे कुळ आणी नदीचे मुळ कधी शोधायला जाऊ नये पण ही गोष्ट अमेरिकेतील नायगारा नदीच्या बाबतीत खोटी ठरते.नदीचा उगमापासून ते मिलना पर्यतंचा सर्व प्रवास अगदी सुर्यप्रकाशा सारखा स्वच्छ दिसतो.या वर्षी पुन्हा अमेरिकेला जायचा योग आला आणी तेव्हांच ठरवले की प्रसिद्ध, प्रेक्षणीय, प्रवासी यादीतील "नायगारा फॉल्सला" जरूर भेट द्यायची. mipa**mipa मानचित्र -नदीचे मुळ बफेलो शहर विकांता मधे न जाता आठवड्यात सोईस्कर दिवस बघून जायचे म्हणजे गर्दी कमी असेल आसे ठरले. राहात्या घरापासून साडे सहा-सात तासांचा प्रवास. गुगल मानचित्रावरून जाण्याचा रस्ता निश्चीत केला. दोन रस्ते उपलब्ध होते,एक कॅनडा मधून अडिच-तीन तासाचा व दुसरा अमेरिके मधून साडे सहा-सात तासाचा.चौकशी अंती आसे कळाले की कॅनडा मधून जायचे असेल तर तिकडचा प्रवासी व्हिसा पाहिजे. अंदांज घेतला,केंव्हा निघायचे,केंव्हा पोहचणार,किती दिवस रहायचे, तेथील पर्यटन स्थळे इ.माहिती अंतरजालावर बघून झाल्या नंतर प्रश्न पुढे आला रहायचं कुठे ? रहायचं कुठे ? mipa**mipa mipa**mipa mipa**mipa हवा बिस्तर आणी नाष्टा (Airbnb) न्यूयॉर्कमधील नायगारा फॉल्स जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आसल्याने मोठी मोठी हाॅटेल्स तर आहेतच पण खुपच महागडी.शेवटी, तुम्हाला झोपायला जागा हवी आहे. लेक ओंटारियो वर घर भाड्याने घेऊन राहू शकता. नायगारा फॉल्स न्यूयॉर्कमध्ये राहण्यासाठी सर्वोत्तम अतिपरिचित क्षेत्र हे डाउनटाउन क्षेत्र आहे कारण ते बहुतेक आकर्षणांच्या अंतरावर आहे. तथापि, जर तुम्ही कमी गर्दीचे क्षेत्र शोधत असाल, तर तुम्ही उपनगरीय प्रदेशात सहज राहू शकता जे मुख्य आकर्षणांपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहेत आणि खूप कमी खर्चिक आहेत. नायगारा फॉल्स, न्यूयॉर्कमध्ये राहण्याच्या अनेक ठिकाणांपैकी सर्वात प्रसिद्ध 26 मजली सेनेका नायगारा रिसॉर्ट आणि कॅसिनो आहे, हे काउंटीचे एकमेव AAA चार-डायमंड पुरस्कार विजेते हॉटेल आहे. निवडण्यासाठी आणखी शेरटन, मॅरीएट,हॉलिडे ईन,रॅडिसन सारखी बरीच हॉटेल्स आहेत, तसेच द बटलर सारखी आरामदायक बेड्स आणि ब्रेकफास्ट्स आहेत. "आश्रम मोटेल" ,सारखी शंभर डाॅलर्स पर डे दराची, (नावावरून भारतीय असावे ) राहाण्याची सोय आहे. तुमच्याकडे कार असल्यास आणि डाउनटाउन क्षेत्रापासून थोडे दूर राहण्यास हरकत नसल्यास, पूल आणि अविश्वसनीय दृश्यांसह या सुंदर घर भाड्याने घेऊन शकतो. हाॅटेल्स,हवाई बिस्तर आणी नाष्टा (Airbnb) किवां मनोरंजन गाडी (Recreational Vehicle) अश्या वेगवेगळ्या सोई उपलब्ध आहेत. कुतूहलापोटी अंतरजालावर खंगाळू लागलो आणी अपसुकच डोक्यात तुलनात्मक विचारांनी गोंधळ/थैमान घालायला सुरुवात केली. खाण्या पिण्याच्या सवयी,बरोबर लहान नातू त्याच्या खाण्या पिण्याच्या वेळा सवयी व वारंवार उठणारी चहाची तल्लफ यामुळेच महागड्या हाॅटेल्सच्या तुलनेत दुसरा पर्याय हवा बिस्तर आणी नाष्टा (Airbnb) जास्त सोयीस्कर व खिशाला परवडणारा वाटला. आमच्याकडे गाडी आसल्याने थोडे दुरचे ठिकाण निवडले. रहाण्याचे ठिकाण निवडताना "Area compromised"( गुन्हेगारी जास्त आसलेला) तर नाही ना व होम सिक्युरिटीज काय व्यवस्था आहे हे जरूर बघावे. Airbnb चे रिव्ह्यू आणी रेटिंग जरूर बघावे. इथे सर्वच व्यवहार अंकात्मक (digital) त्यामुळे अंतरजालावर पैसे भरून रहाण्याचे ठिकाण निश्चित केले. लगोलग सर्व सूचनांच्या बरोबर डिजीटल लाॅक कोड नंबर पण आला.हा पर्याय खुपच आवडला. सर्व मानव संपर्का विरहित. पुढे तेथील व्यवस्था व एका कुटुंबाला लागणाऱ्या गोष्टी याचा तपशीलवार आढावा घेऊन योजनाबद्ध सामान, टोस्टर,डिश वाॅशर,मीठ,मिर्ची ब्रेड, बटर, चिझ, अंडी,चहा,काॅफी,दुध ते कप बशा, काटे चमचे,नाईफ, टी ते सर्व्हिंग स्पून थोडक्यात काय सगळ्ळ काही उपलब्ध होते.सुदंर रंग संगती व प्रकाश योजना, आरामदायक बिछाने. सुसज्ज न्हाणी घरे. बारीक सारीक सुचना तर इतक्या की प्रत्येक शोभेच्या फुलांच्या कुंडीत " झाडाला पाणी घालू नये " आसा मुद्रित अक्षराचा झेंडा. या वरून आपल्याला कल्पना आलीच आसेल की कीती चांगली सोय आहे. दर दिवशीचे भाडे फक्त शंभर डाॅलर्स. तीन दिवसा करता घराचे जणू मालकच आणी हे सर्व अनुभवताना अमेरिका निवासी मुलगी,जावई यांचा निर्णय किती योग्य होता सारखे जाणवले. हा मी घेतलेला अनुभव आहे.आपले अमेरिकन मिपाकर यात सुधारणा सुचवू शकतात. कारण त्यांचा अनुभव माझ्या पेक्षा निश्चितच जास्त आहे.. जास्त काही लिहीत नाही. फोतो मधे सर्व कही आले आहे. सर्व फोतो मोबाइल आणी निकोन डि एस आर चे आहेत.

वाचने 5656
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

खूप पूर्वी काही काळ डेट्रॉईट मध्ये रहात असताना कॅनेडियन व्हिसा घेऊन कॅनडातून प्रवास करून नायगरापर्यंत गेलो होतो. तेथून पाहून झाल्यानंतर मधला पूल ओलांडून अमेरिकेच्या बाजूने सुद्धा धबधबा पाहिला होता. अमेरिकेतील असंख्य सहलींपैकी नायगराची सहल सर्वोत्तम ३ सहलींमध्ये आहे. त्यावेळी आईवडील सुद्धा बरोबर असल्याने सहलीचा आनंद द्विगुणित झाला होता. जीव ओवाळून टाकावा अशी असंख्य निसर्गरम्य ठिकाणे अमेरिकेत आहेत. नायगरा त्यापैकीच एक.

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी मिशिगन ते बफेलो संपुर्ण प्रवास तलावाच्या काठाकाठाने. त्याचा सुद्धा एक वेगळाच अनुभव. पेनसिलव्हानीया मधे वाईन यार्ड सुद्धा भारी. नायगारा मला पण खुप आवडला.

म्हणजे प्रत्येकी तीन MBचे आहेत. धागा लवकर लोड होण्यासाठी कमी साईजचे( 200 -500 KB) टाकले तरी चालेल. बाकी नायगारा काही खास आहे असं मला नाही वाटत.

In reply to by कंजूस

कंजुस भाई प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. खयाल अपना अपना,पण नायगारा मधे रौद्र सौंदर्य दिसले. धधबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज एवढा मोठा की आपल्याच मनातला आवाज आपल्यालाच ऐकू येत नाही. निकोल टेस्ला व त्यांच्या सहकार्याने जगावर करून ठेवलेला उपकार व कठीणतम प्रवास सिनेमात दाखवतात, खुपच मस्त. तकनीकी माहीती बद्दल आभार.

नायगारा फॉल्स हे माझ्या बकेट लिस्ट मधे होते. आमच्याकडे पण कॅनडा विसा नव्हता. पण एका मिपाकराने सुचवल्यानुसार मी भारतातूनच मी एका चायनीज टूर ऑपरेटर ची न्यूऑर्क - नायगारा - वॉशिंग्टन अशी सहल बुक केली खूपच स्वस्तात पडली. माझ्या सोबत तीन ज्येष्ठ नागरीक होते ( सासरे ८०+ सासू बाई आणि माझी आई ७५+ ) त्यानाही ते खूप सोयीचे पडले. तीन दिवसात नायगारा सोबत स्टर्लिंग काचेचा कारखाना , वॉशिंग्टन म्युझियम वगैरेही होते. खूप मजा आली. डेट्रॉईट मधून कॅनडा मार्गे नायगारा सोपे पडते. वेळ वाचतो .

डेट्राईट नदीवरील अम्बेसिडर पुलावरून खुपच जवळ आहे. प्रकाशयोजना कॅनडात जास्त चांगली दिसते.तसेच तेथील निरीक्षण स्तंभ हा अमेरिकन स्तंभा पेक्षा जास्त उंचावर आसल्याने एरीयल व्ह्यू अधिक प्रमाणात मोठा दिसतो.

छान माहिती आणि फोटो. फोटोची फाईल साईझ मोठी असल्याने लोड होण्यास वेळ लागतो. फोटो जमल्यास कंप्रेस करुन अपलोड करावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TV

फोटो छान. माहितीही आवडली. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे

प्रा डाॅ बिरूटे सर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

मुडी,टर्मीनेटर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.