Skip to main content

अकरा तारखेची अकरा वर्षे

लेखक मन यांनी मंगळवार, 11/09/2012 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
अकरा तारखेची अकरा वर्षे..... आज, म्हणजे ११ सप्टेंबरला अकरा वर्षे पूर्ण होतील. अकरा वर्षे झाली. घडले तेव्हा जगभर टीव्हीवर प्रसारितही झाले. आख्ख्या जगाला दिसले. तरीही मुळात घडले काय हेच अजून कुणाला ठाउक नाही म्हणतात. ज्याने ते घडवल्याचा आरोप केला जातो, त्याला खलनायक दाखवलं जातं. त्याच्या ह्याच कामगिरीमुळं कित्येकांचा तो "हिरो" ठरला. त्याचा पूर्वेतिहास पाहता, त्यानेच हे घडवलेले असणे अशक्य वाटत नाही. कुठल्याही मोठ्या घटनेबद्द्ल काही कॉन्स्पिरसी थिअरीज नेहमीच असतात. अगदि मर्लिन मन्रो हिच्या हत्येपासून , ताजमहालाच्या निर्मात्यापर्यंत.

लाह्यांचा खरवस.

लेखक ज्योति प्रकाश यांनी मंगळवार, 11/09/2012 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-२ वाट्या ज्वारीच्या लाह्या. १ वाटी काजू. १ वाटी खवलेले खोबरे. ८-९ चमचे साखर(गोडीप्रमाणे) अर्धा चमचा वेलचीपूड. दिड वाटी कोमट पाणी(नारळाच्या दुधासाठी). तूप. कृती :-प्रथम थोड्या गरम पाण्यात दोन तास काजू भिजत घाला.पाऊण वाटी कोमट पाणी घालून खोबरे वाटा व घट्ट पिळून दाट दूध काढा.परत उरलेले पाणी घालून दूध काढा.दोन्ही दूध एकत्र करा.

कुणाचा दोष सांगा ?

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 10/09/2012 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रहो, आपल्याला आपले म्हणणे विचारण्या अगोदर एक अगदी छोटीशी गोष्ट . एक व्यावसायिक फोटोग्राफर असतो. त्याच्याच देशातून असाच फिरताना त्याला एका समुद्रकिनार्‍यावर एक पुतळा दिसतो. त्या पुतळ्यावर वार्‍याने वाहून आणलेला पाचोळा स्थिरावलेला असतो. त्या पुतळ्याच्या मस्तकावर एक कावळा विष्ठाकर्म करीत असताना तो फोटोग्राफर " अरेरे काय या पुतळयाची अवस्था ! " या विचाराने फोटो काढतो. व ही बाब इतरांच्या नजरेला यावी म्हणून तो सदर फोटो एका ठिकाणी प्रसिद्ध करतो. होते काय की , तो पुतळा कोणा महान नटाचा, महान खेळाडूचा नसतो तर त्या देशाच्या राष्ट्रपुरूषाचा असतो.

आधी बसू मग बोलू.

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 10/09/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
“बसणे” या शब्दाचे तसे वैकल्पिक आणि व्यावहारिक अभिप्रेत अर्थ बरेच आहेत. जसे “गाडीवर बसणे”, “खुर्चीवर बसणे”, “सकाळी सकाळी १५ मिनिटे एकांतवासात बसणे” इत्यादी इत्यादी. या सर्व प्रचलित अर्थांबरोबरच “बसणे” या शब्दाला एक स्पेशल अर्थ आहे. या “बसण्यात” सगळंच येतं, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद या सगळ्यांच्या व्याख्या या शब्दाला तंतोतंत लागू होतात. अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे. खरं तर ही एक साधना आहे, पण त्या साठी तुम्ही साधक असण्याची अट अजिबात नाही.

गरीबांसाठी निवारागृहांची गरज.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 09/09/2012 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
परवा नाशिकहुन पुण्यास जाण्यासाठी रात्री १२ वाजेची गाडी पकडण्यासाठी बसस्थानकावर गेलो होतो. बसस्थानकावर नेहमीचे चित्र दिसत होते. काही लोक बसची वाट पाहत होते तर काही परगावावरुन आलेले दिसत होते. फलाटावर अथवा जेथे जेथे जागा होती तेथे काहि लोकं झोपलेली दिसत होती. तसे पाहिले तर नेहमीचे असणारे असे दृष्य होते ते. इतक्यात काही पोलिस आले आणि त्यांनी झोपलेल्या लोकांना काठीने मारहाण करीत उठवायला सुरवात केली. बरेच झोपलेली लोकं काय चालले ते न समजुन कावरेबावरे होऊन झोपेतुन उठत होते तर काही एकदम मारहाण होत आहे हे पाहुन झोपेतच मारु मारु नका अशी गयावया करीत होते.

देवळाबाहेरचा गाभारा

लेखक अज्ञात यांनी रविवार, 09/09/2012 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाटल की देवळात जावं आणि देवाच दर्शन घ्यावं भर दुपारी तशी शांतताच होती, बहुतेक देवाचीसुद्धा आरामाची वेळ होती, मनात म्हंटलं नको द्यायला त्याला त्रास घटकाभर बघावी वाट, आणि पहावी आरास गाभारा तसा दिसत होता बराच प्रशस्त त्याची भग्नता देत होती गतवैभवाची साक्ष प्रांगणही देवळाच तसं जाणवत होतं मोठं पडक्या तटबंदीत सावरत होतं कस बसं एका कोनाड्यात काही लोक दिसत होते, दगडातून काहीतरी घडवत बसले होते, त्यातली काही वयस्कर, प्रौढ तर काही तरणी होती, जी छन्नी हातोड्याने नवनिर्मितेचे गीत गात होती, आजूबाजूला काही लहान मुलं ही खेळत होती, पण उडणार्‍या दगडांची त्यांना मुळीच चिंता नव्हती एक वेगळीच जादू त
काव्यरस

हिरवं झालं रानं

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/09/2012 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
हिरवं झालं रानं हिरवं झालं रानं हिरवं झालं रानं तिथंच गाठलं त्यानं ग बाई तिथंच गाठलं त्यानं ||धृ|| पायवाट नागमोडी पांधीतून जायी गाडी शेतावर सावरूनी चालले बांधावरूनी एकल्याच नारंला तिथंच गाठलं त्यानं ||१|| मोठी झुंबड तिथं झाली आधाराला नाही सावली व्दाड वारा पदराशी खेळला, पाडला पायाशी सावरू तरी मी कशी त्यानं ठरवलं झोंबणं ||२|| आधी जरा घाबरले बावरले पण मी मला नाही सावरले त्याला अंगाशी ओढले त्याच्यामधीच भिजले अस्सा तस्सा आला बरसून गेला तन चिंब भिजवूनं ||३|| हिरवं झालं रानं हिरवं झालं रानं ||धृ|| - पाषाणभेद (