Skip to main content

हिरवं झालं रानं

रविवार, 09/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
हिरवं झालं रानं हिरवं झालं रानं हिरवं झालं रानं तिथंच गाठलं त्यानं ग बाई तिथंच गाठलं त्यानं ||धृ|| पायवाट नागमोडी पांधीतून जायी गाडी शेतावर सावरूनी चालले बांधावरूनी एकल्याच नारंला तिथंच गाठलं त्यानं ||१|| मोठी झुंबड तिथं झाली आधाराला नाही सावली व्दाड वारा पदराशी खेळला, पाडला पायाशी सावरू तरी मी कशी त्यानं ठरवलं झोंबणं ||२|| आधी जरा घाबरले बावरले पण मी मला नाही सावरले त्याला अंगाशी ओढले त्याच्यामधीच भिजले अस्सा तस्सा आला बरसून गेला तन चिंब भिजवूनं ||३|| हिरवं झालं रानं हिरवं झालं रानं ||धृ|| - पाषाणभेद (पुर्वप्रकाशीत)
लेखनविषय:

वाचने 1487
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

गाणं छान आहे. यातली कल्पना आणि गावातल्या स्त्रीगीतांचा बाज आवडला.

आवडलं..आवडलं.. रानाचं हिरवं होणं आवडलं. नेहमी असेच घडून रान कायम हिरवेगार राहू दे.