Skip to main content

पु.ल :महाराष्ट्राचे लंगडे व्यक्तिमत्व !

लेखक तर्री यांनी सोमवार, 17/09/2012 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच एक ब्लॉग वाचण्यात आला. ह्या ब्लॉग मध्ये अतिशय वैचारिक , पुरोगामी व बहुजनहिताय लेखन केलेले आहे. अनेक तथाकथित मान्यवरांची धोतरे , तुमानी टराटरा फाडण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कुसुमाग्रज - ज्यांना साहित्य चोरी करता ज्ञानपीठ देण्यात आले त्यांचा समावेश आहे. आता कुसुमाग्रजांवर / त्यांच्या नाटकावर शेक्पिअरचा प्रभाव होता हे स्वतः तात्यासाहेब म्हणायचे ! पण हया ब्लॉग च्या विदुषींनी वि.वा. शिरवाडकरांनी आपल्या “नटसम्राट” हया नाटकात कशी शेक्पिअरची वाक्ये उचलली आहेत ? त्याचा अती सखोल अभ्यास केला आहे. सर्व सामान्य वाचकास हे संशोधन झेपणारे नाही.

बौद्धिक दिवाळखोरी

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 17/09/2012 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुरोगामी महाराष्ट्रातील ही घटना फारच वाईट आहे. त्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे "डान्स बार बंद (?)करून तरूण पिढीली वाचवले" असा दावा करणा-या मा. आर. आर. पाटील यांचा प्रस्तावाला विरोध. जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांना शिक्षणाची अट लागू करण्याचा प्रस्ताव बारगळला हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे . महिला व राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्यांना ८वी पास , तर खुल्या प्रवर्गातील प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्यांना १०वी उत्तीर्ण होणे बंधनकारक करणे असा ठराव राज्य मंत्रीमंडळाच्य बैठकीत आला होता. बंधनकारक करणे गैर नव्हते .

निहारी

लेखक गणपा यांनी रविवार, 16/09/2012 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
चुकला फकीर जसा मशिदीतच सापडायचा तसेच भरकटलेले अस्मदिक पुन्हा एकदा सामिष पाककृतीकडे वळतो. :) गेल्या आठवड्यात 'मी मराठी'वर न्यहारीच्या पदार्थांवर चर्चा चालली होती. त्यात प्रतिसाद देताना निहारीची आठवण निघाली. दोन्ही शब्दांतल सार्धम्य पण कुतुहलाचा विषय आहे. (थोडंस गुगलल्यावर कळलं की याच मुळ 'Nahar' نهار‎ (मराठी अर्थ दिवस) या एका अरबी शब्दात आहे. जाणकार मंडळी यावर प्रकाश टाकतीलच.) परत त्यात हा पदार्थ शक्यतो सकाळी न्यहारीच्या वेळीच खाल्ला जातो. अनेक उपहार गृहातही निहारी केवळ न्यहारीच्या वेळीच मिळते. अगदी ११ वाजता गेलात तर संपलेला असतो.

मुगाच्या डाळीचे वडे.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 16/09/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
Mugache-Vade
साहित्यः मुगाची बिनसालाची डाळ १ वाटी आलं २ इंच हिरव्या मिरच्या ३ नग कोथिंबीर अर्धी वाटी हळद १/२ लहान चमचा (टी स्पून) जीरं १ लहान चमचा खायचा सोडा

माणुसकी....

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 16/09/2012 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
न मानला धर्म न मानली जात धरली फक्त माणुसकीची कास कारण हीच आहे माझी वाट ... बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते इथे नसे कधी दुजाभाव, न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट, बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास कारण हीच आहे माझी वाट ... करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे, कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव, कारण हीच आहे माझी वाट ...

शास्त्रिय गणकयंत्र घेण्याबाबत सल्ला हवाय

लेखक दादा कोंडके यांनी रविवार, 16/09/2012 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. कॉलेजात असताना कॅसिओ १०० एफेक्स आणि नंतर ९९१ मॉडेलचं कॅल्क्युलेटर घेतलं होतं. आताही पटकन आकडेमोड करण्यासाठी ऑफीसमध्ये मागच्या आठवड्या पर्यंत हेच वापरत होतो. पण मागच्या सोमवारी ते माझ्या चुकीने खाली पडून फुटलं. मग आता विचार केला की 'परीक्षेला चालणारं पाहिजे' ही अट नसल्यामुळे एखादं जास्तं फंक्षन असणारं मॉडेल घेउया. आंजावर शोध घेतल्यावर तीनच चांगले ब्रँड असल्याचं समजलं. कॅसिओ, एचपी आणि टीआय. टीआयचे ८४ आणि एन्स्पायर छान आहेत असं वाटतं. काही फोरम्स वरती रिवियुस देखील वाचले. पण याची किंमत ६०००-१०००० मध्ये आहे.

कताई शास्त्र ५

लेखक बापू मामा यांनी शनिवार, 15/09/2012 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात आपला भारत प्राचिन काळापासून अग्रेसर आहे. कोंकणातील बंदरे इसवीसन पुर्व व इसवीसनोत्तर प्राचिन काळात कापडाच्या मध्य पुर्व तसेच युरोपीय देशाशी व्यापारामुळे संपन्न झाली होती. मध्य युगात भारतीय कापडाच्या आयातीसाठी युरोपीय देशांनी इस्ट ईंडिया कंपन्यांसारख्या संस्था ही काढल्या होत्या. औद्योगिक क्रांती नंतर मात्र चित्र बदलले. भारतातून मँचेस्टरसाठी कच्चा माल (कापूस) निर्यात होवू लागला. तयार कापडास भारतासारखी हुकुमी बाजारपेठ मिळाली. मँचेस्टर संपन्न झाले,व एतद्देशीय कारागिर बेकार ,निर्धन झाले.कपाशीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले गेले.

कवितांचे प्रकार

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 15/09/2012 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी आम्ही नुकतेच आमची समज वाढवण्याच्या प्रयत्नात काही काव्य प्रकार समजून घेतले. त्यातले काही आम्ही प्रसवून सुद्धा पाहिले. आमचा हा प्रयत्न गोड मानावा. काही चुका असल्यास माफ कराव्यात. सुधारणेस वाव असतो असे आमचे मत आहे. त्यामुळे एक ना एक दिवस आम्ही नक्की साहित्यिक या पदवीला लायक होऊ असा आमचा विश्वास आहे.

को. ऑप. गणेशोत्सव

लेखक चेतन माने यांनी शनिवार, 15/09/2012 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट ची दुपार झाली होती. सगळे सोसायटीच्या आवारातून ऑफीस कडे चालले होते. "चला रे बसुया " च्या पाच सहा हाका आल्या आणि सगळे निघाले. "काय रे साला नुसती फालतुगिरी आहे ही दरवर्षीची मीटिंग म्हणजे" , मी. "अरे यार जाऊन बसुया तर सही" रमेश. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला आणि आणखी तो सोसायटीचा असला तर मीटिंग नावाची औपचारिकता झालीच पाहिजे . बरेच जण न जाणे का पण मीटिंग साठी खूपच उत्साही असतात . हि असली मंडळी फक्त मीटिंग साठीच उत्सुक असतात कामासाठी नाही! आणि अश्याच बर्याच जणांच्या एकापेक्षा एक फालतू आयडिया ऐकणे म्हणजे मीटिंग!! माझी आपली नकार घंटा सुरूच होती पण मित्रांबरोबर जाऊन बसावच लागलं.