दररोज वृत्तपत्रे, वाहिन्यांवर पाह्तो, आज साईबाबांना ५ किलो सोन्याचा हार अर्पण केला, तिरुपतीच्या हुंडीत अज्ञात इसमाने करोडो रुपये दान केले, लालबागच्या राजाला सोन्याचा पंजा लावला इ.इ.
वस्तुतः हे धन त्या दानकर्त्याने कोणाकडून तरी लुबाडलेले असते, ती बोच जावी म्हणून ही देवाला लाच दिली असते.खरे तर या धनावर नारायणा पेक्षा दरिद्री नारायणाचा हक्क जास्त पोहोचतो. देवस्थानांनीही ह्या धनाचा विश्वस्त म्हणून सुयोग्य वापर करावा असे वाटते.
आज पश्चिम महराष्ट्रातील सोलापूर , सांगली, सातारा, नगर, व उभा मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला आहे. माणसांपेक्षा गुरांचे काय करावे हे शेतकर्यांना समजेनासे झाले आहे.