Skip to main content

वेडी मीरा

लेखक यश पालकर यांनी रविवार, 30/09/2012 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या प्रीतीत रंग भरावे मी तुझी वेडी मीरा ठरावे मी खेळ आयुष्याचा जिंकता जिंकता तुझ्यासोबत एकदा हरावे मी परतून येशील ना रे आता किती आठवणीत झुरावे मी निसटुनी जाती रेशीमबंध सारे हृदयाशी त्यांना घट्ट धरावे मी पुरे झाले आता दु:खाचे निखारे तुझ्यासाठीच ह्या जगी उरावे मी......... यशवंत http://dhyanimani.blogspot.ca/
लेखनविषय:

वाचने 929
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया