Skip to main content

हाजीर हो !

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 31/07/2022 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
हाजीर हो ! ... पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या ,तरूण आणि रुबाबदार पस्तीशीतील राजन काळे नी आपली गाडी आपल्या पार्किंग मध्ये लावली. आपला टाय जरासा सैल केला . समोरच्या आरशात बघून आपले काळेभोर केस जरा सारखे केले. गाडीतून बाहेर पडून ,मागच्या सीट वरून आपली लॅपटॉप ची बॅग घेतली . आपल्या खिशातील मोबाईल काढून तो चालू केला. आजच्या दुपारच्या मीटिंग मध्ये त्याने तो बंद केला होता. मेघनाचे एक दोन मिस काल्स होते. एक दोन मेसेज सुद्धा होते. आता घरी जातोच आहे तेव्हा बोलू असा विचार करून तो पुढे निघाला. सहज घड्याळात बघितले तर रात्रीचे नऊ वाजून गेले होते. आज जरा जास्तच उशीर झाला होता.

सध्या मी काय पाहतोय ? भाग १०

लेखक मदनबाण यांनी रविवार, 31/07/2022 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे !

पुस्तक परिचय: मनात -- भाग १

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 30/07/2022 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
----
अभियांत्रिकीमधे करियर असूनही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात रुची जपणारे, किंवा इतर विषयात नाक खुपसणारे, खोऱ्याने सापडतील. अभियंत्यांचा तो अवगुण म्हणावा लागेल, किंवा तार्किक आणि तांत्रिक निश्चिततेचा कंटाळा.

ध्यान- लाखमोलाचं लक्ष!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 30/07/2022 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
IMA- परभणीद्वारे ध्यान सत्र सर्वांना नमस्कार. परभणीमध्ये इंडियन मेडीकल असोशिएशन अर्थात् 'आयएमएच्या' वतीने ध्यान सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ते सत्र घेतानाचा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मला हे सत्र घेण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आयएमए परभणी व डॉ. अनील दिवाण सर, डॉ. जी. एम. चांडक सर, आयएमए परभणीचे अध्यक्ष डॉ. अनील कान्हे सर, श्री. कारेगांवकर सर व सर्वांना धन्यवाद. त्याबरोबर ह्या आयोजनामध्ये अनेक प्रकारे सोबत असलेल्या निरामय परिवाराचेही धन्यवाद.

ब्रह्मानंदी

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 30/07/2022 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
इ. स. १८५९-६० सालची चिपळूण मधली सकाळ,कदाचीत पावसाळी असावी. रंगो भट नुकतेच पुजा अर्चना करून पडवितल्या लाकडी झोपाळ्यावर सुपारी कातरत बसले होते. आडकित्याच्या आवाजात झोपाळ्याचा 'कर्र ~, ~कर्र' आसा लयबद्ध आवाज मीसळून नादब्रह्म निर्माण होत होते. रंगो भटाच्या संजाबा वरची शेंडी प्रशिक्षीत नर्तकी प्रमाणे नर्तन करत होती. रंगो भटाची सुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागली असावी. तेवढ्यात रूबाबदार लष्करी गणवेशातला एक हरकारा त्यांच्या चौसोपी वाड्याकडे येताना पाहून आजूबाजूच्या वाड्यात खळबळ माजली. सगळे अंदाज घेत होते कुणाकडे हा राक्षस आला आसावा.

पुस्तक परिचय - कोकणच्या आख्यायिका

लेखक चिमी यांनी शुक्रवार, 29/07/2022 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणच्या आख्यायिका हे अफाट भारी पुस्तक वाचून पूर्ण झाले. Arthur Crawford (हो, हा म्हणजे मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट ज्याच्या नावावर आहे ना, तोच हा) मुंबईचा पहिला Municipal Commissioner .. याने आपल्या कोकणातल्या वास्तव्यामध्ये एका भटजीबुवांबरोबर मैत्री केली. या भटजीबुवांकडे एक पोथी-पुराणांचे बाड होते. या पोथ्यांमध्ये लिहिलेल्या होत्या कित्येक वर्षांपूर्वीच्या गोष्टी.

श्रावण

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 29/07/2022 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्याशार पाटीवर पांढरी शुभ्र रेघ ग्रीष्माच्या पाठीवर काळे काळे मेघ खरपुस ताबुंस मातीवर हिरवी चंद्रकळा प्राजक्ताच्या झाडाखाली मोतीयाचा सडा सुखावली धरती सुखावली मने इवल्या इवल्या रोपानी डुलती हिरवी राने चिंब झाले मन रुंजी घालतो साजण उभा भाऊ दारी म्हणे आला पंचमीचा सण मन पाखरू पाखरू पोचले आईच्या पायाशी डोळ्यात श्रावण भरून उभा साजण दाराशी २९-७-२०२२

धारावाहिक भयकथा : तृष्णा - भाग १

लेखक साहना यांनी शुक्रवार, 29/07/2022 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे २ वाजले होते. संदीप आपल्या गाडींत कुडकुडत बसला होता. समोरील रस्ता सुनसान असला तरी एक श्वान पथदिपाच्या खाली शेपूट हलवत पडले होते. आजूबाजूच्या छोट्या इमारती अगदी मृतवत शांत होत्या. चुकूनच एखाद्याने गॅलरीतील दिवा चालू ठेवला होता. संदीपच्या हृदयाची धकधक वाढत चालली होती. डाव्या बाजूच्या स्मशानाची गेट बंद होती. त्याने हातातील फोन कडे पहिले. चित्राला पुन्हा एकदा फोन करू का ? तिच्या कडे बोलताच त्याच्या मनात अवसान उत्पन्न झाले असते. उजव्या बाजूला पर्वतावर वाहने अजून चालू होती.त्यांचा उजेड इतक्या दुरून काजव्यांच्या शिस्तबद्ध हालचालीपरामें वाटत होता.

जिलचे देवदूत - २

लेखक पर्णिका यांनी शुक्रवार, 29/07/2022 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग इथे वाचता येईल. सकाळी नोंदणी डेस्कवर जेव्हा आम्हांला फेन्स पेंटिंगचे काम दिले गेले, तेव्हा जेनिफरने आमच्या पाचजणींपैकी कुणालाच या कामाचा अनुभव नसल्याचे सांगितले होते. साध्या ब्रशने आणि रोलरने मात्र यापूर्वी आम्ही रंगकाम केले होते. " तुम्ही अजिबात काळजी करू नका. लंचनंतर, काही स्वयंसेवक तुमच्या मदतीसाठी येतील. " असे ग्रेगने, संस्थेच्या मुख्य संचालकाने आम्हांला त्यावेळी सांगितले होते. आम्ही जिलच्या घरी परतलो, तेव्हा मार्क आणि रॉबर्ट यांनी कुंपण रंगवायचे काम सुरु केले होते देखील!

विस्मृतीत गेलेले पदार्थ २ - लशुन पायसम अर्थात लसणाची खीर

लेखक यश राज यांनी गुरुवार, 28/07/2022 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
विस्मृतीत गेलेल्या पदार्थाच्या अनुशंगाने आजची पाककृती आहे लशुन पायसम अर्थात लसणाची खीर. असे म्हणतात की पुरुष हे उत्तम बल्लवाचार्य असतात (माफ करा माझा स्त्री पुरुषांमध्ये भेद करण्याचा कोणताही हेतु नाही, ही फक्त म्हण किंवा धारणा आहे). मी २ पुरातन काळातील व्यक्तींची नावे सांगतो त्यामुळे या धारणेला पुष्टी मिळु शकेल १. पांडवांपैकी एक असलेला भीम - विजनवासात असताना भीमाने विराट राजाच्या महाली बल्लवाचार्य म्हणुन काम केले होते. आता प्रचलीत असलेल्या श्रीखंडाचा जनक म्हणजे भीमच.(याबद्द्ल पुढच्या लेखात) २.