Skip to main content

गोंय (गोवा) - पाटणें बीच - १

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 20/12/2012 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा! हा शब्द जरी नुसता ऐकला तरी माझ्या अंगात एक चैतन्याची लहर फिरून जाते; इतका गोवा मला आवडतो. स्पेसिफिक कारण असे कोणतेही नाही. आता अगदी जरी जोर लावून विचारलेच कोणी तरीही कदाचित नक्की कारण सांगता येणार नाही पण प्रयत्न करतो, गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ! पहिल्यांदा गोव्याची सफर घडली १५ वर्षांपूर्वी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यावेळी, त्या वयानुसार, मला गोवा भेटला आणि भावला तो बांद्याच्या चेकपोस्टवर. बांद्याची चेकपोस्ट पार करून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि नजरेला पडलेला नजारा म्हणजे रस्त्याच्या बाजूला ओळीने असलेले बियर बार्स आणि वाइन शॉप्स.
Taxonomy upgrade extras

मनाला समाधान देणारी घटना (आपले मत अपेक्षीत आहे)

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 20/12/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
हि कथा वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगावे *************************************************************** तो काळच असा होता कि त्यावेळी माझे मन पूर्णपणे अध्यात्ममय झाले होते. दर वर्षी श्रावणात ग्रंथ वाचण्यासाठी गावात मला बऱ्याच ठिकाणी मागणी असायची. (ऐकाणारांच्या मते ) मी वाचून अर्थ सांगितला कि सगळे समजते. त्यामुळे रात्री दोन ठिकाणी आणि सकाळी एका ठिकाणी ग्रंथ वाचण्यासाठी मी जात असे. याच्यापेक्षा जास्त वेळ मी देऊ शकत नसे. तर त्यावेळी मी पूर्ण अध्यात्म मय झालो होतो. शिवाय पहिल्यापासून माझ्या मनात भक्तीची खूप आवड निर्माण झाली होती.

द सिंपसन्स : वेगळेपणातले वेगळेपण

लेखक पिंपातला उंदीर यांनी गुरुवार, 20/12/2012 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्‍या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्‍या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्‍या एका परिवाराभोवती फिरते.

आजूनहि मी

लेखक श्रीमत यांनी गुरुवार, 20/12/2012 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
अजूनही अजूनही मी वावरतो ह्या माणूस हरवलेल्या सनातन शहरात ऐकतो पवित्र परंपरा अन संस्कृतीचा झिंगलेला जयघोष, नग्न करून धिंड काढलेल्या स्त्री बद्दलचे, भाड्याने आणलेल्या रडव्यांचे मुक्त पंचतारंकित परिसंवाद गरिबी हटाव आणि जाती वादाच्या मादक गर्जना.......... पहातो लोकशाहीच्या शाही सुपुत्रांकडून लोकांवर झालेला पाशवी बलात्कार निर्विकारपणे मनावर एकही ओरखाडा उमटू न देता मी मित्रांबरोबर चहा पितो ,सिगारेट ओढतो, हिंदी सिनेमा पहातो प्रयेसीच्या दारावर चक्कर मारतो............ मग रात्री निर्लज्जपणे माझ्यातला मी, स्वत:ला विचारतो एवढा का मी षंढ अजून ही????????????
काव्यरस

ऊखाणे नवीन पीढीचे

लेखक neeta यांनी गुरुवार, 20/12/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
जपानी कलात्मकतेच्या प्रतिसादांवरुन बर्‍याच जणांनी सुचविले यात तुमची कलात्मकता काय आहे तुम्ही तर नुसते फोटो डकवलेत. आता मिपाकरांची कल्पनाशक्ती बघूया. मी लिहीलेले काही नवीन उखाणे देत आहे. तेच तेच जुने उखाणे ऐकून कंटाळा आलाय, नवीन पीढी लग्नात कसे उखाणे घेईल ते वाचा आणि तुम्हीही त्यात नवीन भर टाका. लग्नाच्या आहेरात आई वडिलांनी दिला मला ब्लैक बेरीचा मोबाईल ------रावांच नाव घेते आता मी फेसबुकवर अपडेट करीन माझा प्रोफाईल डी व्ही डी प्लेअर मध्ये सी डी घालते वाकून -----रावांच नाव घेते सर्वांचा मान राखून पुढे तुमच्या कल्पना----------

जगत रहायच,जगत रहायच

लेखक कौस्तुभ आपटे यांनी गुरुवार, 20/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
जगत रहायच,जगत रहायच जगत रहायच,जगत रहायच झाडाने जन्म दिलेल्या फुलासाठी फुलाने जन्मदात्या झाडासाठी कधी प्रेम म्हणून, कधी कर्तव्य म्हणून कधी ओझे म्हणून, कधी नाइलाज म्हणून तेच तेच करत रहायच जगत रहायच,जगत रहायच जगत रहायच,जगत रहायच स्वप्नांच्या अपमार्जकाचे फुगे हवे मधे सोडत रहायच काही पहायचे उंच उडताना काही तेंव्हाच फुटताना अमिबाच्या विभाजनासारख एकातून दूसरी, दुसर्यातून तीसरी वासना प्रसृत करत रहायच जगत रहायच,जगत रहायच जगत रहायच,जगत रहायच गवताने पहायचे झाडाकडे झाडाने डोंगराकडे, अन डोंगराने उंच आकाशाकडे आणि मांडायच समीकरण आपल्या खुजेपणाचे. भुकंप झाला तरी बेहत्तर उंची आपली वाढवत रहायच जगत रहायच,
काव्यरस

आवडती जाहिरात

लेखक समयांत यांनी गुरुवार, 20/12/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्लॅटिनमच्या लव्ह बँड ची सध्याची जाहिरात मला खूप आवडते. त्यात नक्की काय घडतंय हे कळत नाही, पण दोघांमधला डोळ्यांतून डोळ्यांमध्ये केलेला संवाद खूप भावून जातो. त्यामध्ये ती परदेशी जात असल्याने पॅकअप चालू असते, असा माझा कयास आहे. मॉम आणि डॅड अशी लेबलं असलेली शर्टस् एकमेकांमध्ये दिली जातात, यात बहुदा चुकीचं लेबल किंवा शर्ट एक्सचेंज होऊन जातं. नंतर एक पिवळी टॅक्सी एका ओव्हरब्रीजखालून जातांना दाखवली जाते. या पाठीमागे संथ सुंदर संगीत सुरू असते. मग बॅग उचलणारा तो किती उमदा दाखवला आहे आणि फक्त त्याच्या प्रेझेन्सने तिथलं वातावरण गंभीर होऊन जाते, तिला रडू कोसळेल असंही वाटू लागतं.