देवकुंडच्या वाटेवर.....
सकाळी-सकाळी सुर्यनारायण क्षितिजावर अवघा वीतभरही वर येण्याआधीच पिरंगुट ओलांडून पाऊस पिऊन हिरव्याकंच झालेल्या मुळशीच्या पांढरीतून, सह्याद्रीच्या पावलांना तुम्ही स्पर्श करावा. मालेच्या खिंडीतून जमिनीला भेटायला येणारे ढगांचे लोटच्या लोट वळणावर थांबून पाहावेत, मग मालेची खिंड ओलांडून, मुळशी धरणाचा जलाशय उजव्या हाताला ठेवत ताम्हिणीच्या अंतरंगात शिरावे. अग्नीच्या धगधगत्या वीर्यातुन जन्माला आलेला अतिप्रचंड, राकट, कणखर, काळा-कभिन्न सह्याद्री स्वतःचं आडदांड सामर्थ्य उधळत समोर यावा.
मिसळपाव