Skip to main content

स्कार्फ

लेखक जयवी यांनी शनिवार, 05/01/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
नेटवर शोधतांना सापडलेलं डिझाईन आणि घरात असलेल्या लोकरी वापरुन केलेला स्कार्फ. ह्यात ४१ चेन्स घालून सुरवात केली आणि नंतर पॅटर्न घातला. नेटवरचं डिझाईन आणि मी केलेला स्कार्फ ह्याचे हे फोटो !! a a a

पाऊस पाणी

लेखक kanchanbari यांनी शुक्रवार, 04/01/2013 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी मिपावरची नविन सदस्या आज माझ पहिल कलादालन सादर करत आहे. मी सध्या साऊथ अफ्रिकेत आहे माझ्या यजमानांसोबत. मी इथे काही फोटो काढली आहेत. मला फोटोग्राफीची आवड इथेच निर्माण झाली. त्यातलीच काही फोटो मी इथे टाकत आहे. १. पाणी ही जगाच्या काही भागात खुप मोठी समस्या आहे पण अशा या समस्येपासुन विलिप्त असा हा तहानलेला कबुतर एका छोटयाश्या पाण्याच्या खडग्यावर बसुन तहान भागवत आहे. kabutar २.

चुप्प!

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 04/01/2013 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
सखे मला सांग, तू कधी विचार केलायसं? जेव्हा शरीरं थकलेली असतील, डोक्यावर चांदी अन् डोळ्यात मोती असतील, पायांना भराभर चला सांगितले तरी ते ऐकतीलच असं काही होणार नाही सग्गळं बोलून-सांगून झाले असेल, रुसून-फुगून झाले असेल भांडून-बिंडून झाले असेल, कष्ट वगैरेही करुन झाले असतील, शब्दांशिवायच काय नजरेशिवायही तुला माझे अन् मला तुझे म्हणणे नीट समजायला लागले असेल, अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात हळूच कुजबुजीन 'तु मला खुप आवडतेस' तेव्हाही तु अश्शीच लाजून, डोळे मोठ्ठे करुन 'चुप्प!' म्हणशील?
काव्यरस

डार्विन च्या माकडांचा नंगानाच

लेखक जहीर सय्यद यांनी गुरुवार, 03/01/2013 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वाचकांनो, वाक्य रचनेच्या व्याकरणाच्या व इतर चुका पदरात पाडून घेणे हि नम्र विनंती.

वैज्ञानिक परिकल्पना आणि मानवतेने चुकवलेली किंमत

डार्विन चा जवळ चा मित्र Professor Adam Sedgwick त्या थोड्या लोकांपैकी होता ज्याने डार्विन च्या सिद्धांताचे भयानक स्वरूप ओळखले होते. The Origin of Species वाचल्या नंतर तो म्हणाला होता "If this book were to find general public acceptance, it would bring with it a brutalisation of the human race such as it had never seen before." A.E.

चावडीवरच्या गप्पा – रेडी रेकनर

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 03/01/2013 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “नवीन झोपडपट्ट्यांची आणि पर्यायाने व्होटबॅंकेची तजवीज आता सरकारने केली आहे. तेव्हा ह्या नवीन वर्षात झोपडपट्ट्यांचे स्वागत करायला तयार राहा.”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत. “नाहीतर काय?

ड्रॅगनच्या देशात १२ - शांग्रीलाची लामासरी आणि गुईलीनमधले निसर्गाचे चमत्कार

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 03/01/2013 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१...

शांती नवं वर्षातली

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 03/01/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
नावातकायआहे... यांनी ख.फ...सुना सुना झाल्याचे पाहुन तिथे शांति करायचे आंमंत्रण आंम्हास दिले..http://www.misalpav.com/user/7405 पण आमच्या मनातुन आज ही वेगळीच शांति बाहेर आली,,, तिचे बीजंरोपण केंव्हा झाले?-ते शोधायची हुरहुर लाऊन...
काव्यरस

माझ्या घरचा नवीन गुंड

लेखक आर्णव यांनी गुरुवार, 03/01/2013 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
कामाच्या कागदांची होते भेळ तुरु तुरु तुझ्या गत पळतेय वेळ तुझ्यासंग वेळ मुळी काळतच नाय वेळेला फुटतात सश्याचे पाय हवी असते मला जेव्हा झोपेची कुशी तू मारत असतेस या बाबाला ढुशी बाबाच्या कडेवर होते तुला ख़ुशी आवडते तुला माझ्या खांद्याची उशी कीबोर्ड चे माझ्या तोडतेस बटण बाहुल्यांचे तुझ्या करतेस मटण हे पाहून आईला फुटतो घाम काय माझी लेक; टेन्शन येत जाम आजी आजोबांची लाडकी तू नात असतात ते तुझे गुण-गान गात आजीने तुझ्यास्ठी केला मासे-भात जेव्हा दिसला तुझा पहिला दात तुझ्या जवळ, म्हणजे boxing रिंग powerful आहेत तुझ्या डोळ्यांची भिंग हातात येईल ते मारतेस फेकून बाबाच्या डोक्याला टेंगळानची शिंग

वाघ्या हौश्या (एक आठवण)

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 03/01/2013 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या सकाळी जाग आली नि मी उठून झोपेच्या तंद्रीतच गोठ्यात गेलो. हिरव्या वैरणीचा भारा सोडला नि दोन पेंड्या वाघ्या हौश्या पुढे सोडल्या. नि तिथच जोत्यावर टेकून वाघ्या हौश्याच्या देखण्या डौलदार रुपाकड पाहत बसलो. गेल्या शनिवारीच आण्णांनी चाकणच्या बाजारातून हि देखणी चौषी गोऱ्ही खरेदी केली होती. आख्खा गाव बघाया लोटला होता. आम्ही घरातली पोरं तर येडीच झालो होतो. दोन दिवस शाळला सुदिक दांडी हाणली होती. पर घरची लयच ओरडायला लागली तव्हा शाळेत जायला लागलो. पर मी मात्र सकाळी त्यांना वैरण टाकायचा नेम धरला होता.