Skip to main content

एरन स्वार्त्झ काळाच्या पडद्या आड?? आत्महत्या??

लेखक कापूसकोन्ड्या यांनी सोमवार, 14/01/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
या जगात काय चाललेले आहे? गदिमांच्या भाषेत " पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा" हेच खरे. इंटर्नेट वर Really Simply Sindcation किंवा Rish Site Summary (RSS) सारखा एक खुप उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तयार करणारा तरूण काळाआड झाला हे वाचून खुप दु:ख झाले. वास्तविक कुणाचा कोण स्वात्झ्र (ज्याला काळा की गोरा बघितला तर नाहीच पण त्याच्या नावाचा धड उच्चार ही करता नाही), पण आत कुठे तरी कळ येउन गेली.

हेअर पीन क्रोशे स्टोल

लेखक जयवी यांनी सोमवार, 14/01/2013 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
हा आणखी एक प्रकार क्रोशेचा. आधी हेअर पीन ने शेंगा विणून घेतल्या मग त्या एकमेकांना जोडून शेवटी त्याला बॉर्डर केली.

गोड...काटा रुते कुणाला...!?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 14/01/2013 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
हम्मम्म.......... का...य?,शीर्षकावरून अंदाज आला असेलच ना..??? काय म्हणताय??? गाणं........? ''छो हो...! ते ऐकण्यापलिकडे माझा आणी त्याचा संमंधही नाहिये हो...'' मग गोड आणी काटा म्हणजे नवकाव्य किंवा पाककृती वगैरे........? मग मी म्हणेन-''राम राम राम...आपला आणी त्याचाही काहि संमंध नाहि हो....'' मग आहे तरी काय???'' ---
हांsssssssss
अत्ता खर्री मज्जा येणार सांगायला....! अवो,आज संक्रांत आहे ना...!, मंग ह्यो गोड...काटा म्हणजे,आपला साखर/तीळ हलव्याचा काटा हो......! हां,अता संक्रांतीला तस बरेच काटे न वरा आणी काय को???,,,आपलं सॉरी...ते..हे..

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 14/01/2013 08:24 या दिवशी प्रकाशित केले.

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


मी तुझा साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

सौदी संस्कृती

लेखक आशु जोग यांनी रविवार, 13/01/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल माणूस एकमेकापासून दुरावत चालला आहे. आपल्या शेजार्‍यासाठी आपण कितीसे करतो. पण शेकडो मैलवर राहणारी सौदी अरेबियातील काही महान माणसे आपल्या प्रेमाची छाया केवळ आपल्या देशापुरतीच मर्यदित न ठेवता आपल्या प्रेमाची पाखर भारतीयांवरही घालत आहेत. हे कार्य अव्याहतपणे गेली काही वर्षे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद इथे सुरू आहे. सौदी अरेबियन लोकांच्या विशाल हृदयामुळे येथल्या अनेक जणांना केवळ प्रेमच नव्हे तर पैसासुद्धा मिळाला आहे. मात्र एवढे सारे करूनही या कामाची जाहीरात होणार नाही याचीदेखील काळजी घेतली जाते.

तीळ गुळ घ्या , गोड गोड बोला

लेखक बापू मामा यांनी रविवार, 13/01/2013 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
बरे बोलता सुख वाटते ! हे तो प्रत्यक्ष कळते ! आत्मवत् परावे ते ! मानित जावे ॥ कठिण शब्दे वाईट वाटते ! हे तो प्रत्ययास येते ! तरी मग वाईट बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ आपणास चिमोटा घेतला ! तेणे कासाविस झाला ! आपणावरुन दुसर्‍याला ! राखत जावे ॥ पेरिले ते उगवते !बोलण्यासारिखे उत्तर येते ! तरी मग कर्कश बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ श्री मद् दासबोध् दशक १२,समास 10 तीळ गुळ घ्या !

मिपा दिवाळी अंक

लेखक चेतन यांनी रविवार, 13/01/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर हा धागा काढावा की नाही याचा विचार बर्‍याच दिवसांपासुन करत होतो. मिपा दिवाळी अंकावरील प्रतिक्रिया मुख्य पानांवर दिसत नसल्याने बर्‍याच अप्रतिम लेखांवर कमी प्रतिक्रिया आल्या. याबद्दल संपादक मंड्ळाने काही प्रयत्न नक्की केले असतील पण ही सोय काही उपल्ब्ध झाली नाही. मग म्हणलं एक काथ्याकुट टाकुन मला आवडलेल्या काही लेखांची शिफारस करुन बघावी म्हणुन हा प्रपंच मला आवडलेल्या काही लेखनाची ही यादी वन फिश अ‍ॅट अ टाईम.. इतकी डिटेल आणि थरारक पोलीस इन्व्हेस्टिगेशन कथा बर्‍याच दिवसांनी वाचली.

खोल खोल मनामध्ये...

लेखक वेणू यांनी रविवार, 13/01/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद आठवांची रात, जेव्हा डोळ्यात निजेल खोल खोल मनामध्ये तूच तूच दाटशील एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल चंद्र खिडकीशी पुन्हा, रेंगाळेल, खोळंबेल गळालेले रितेपण मुठी भरून घेईल तुझ्या सयी सार्‍या स्निग्ध, सभोताली फुलतील तुझ्या गालातले हसू, माझ्या ओठी उमलेल हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल तेच रूप ह्या जगाचं, पण नवीन भासेल तेच काजळ डोळ्याचं, पण नव्याने हसेल खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल - बागेश्री ब्लॉगवरही प्र