Skip to main content

मेथीगोळ्यांचे सांबार

लेखक रेवती यांनी बुधवार, 06/02/2013 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
घरात असलेले 'स्वयंपाक' हे सिंधूताई साठे यांचे पाककलेचे पुस्तक माझ्यासाठी महत्वाचे असले तरी त्यातले मेथीगोळ्यांचे सांबार तसे दुर्लक्षितच राहिले होते. फार खटाटोपाची पाककृती वाटल्याने तसे झाले. तीन चार वर्षांपूर्वी भरपूर वेळ हाताशी ठेवून हे सांबार केले आणि ही पाककृती आधी का केली नाही अशी चुटपुट मनाला लागली. वाटले तेवढी वेळखाऊ पाकृ नसल्याने मी येईल त्याला मेथीगोळ्यांचे सांबार करून घालण्याचा सपाटा लावला होता. मिपाकरांसाठी आज ही पाकृ घेऊन आले आहे.

नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/02/2013 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे? गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे. असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically . म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते . सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते .

मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 05/02/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा एक मॅटर ऑफ फॅक्ट वॄत्तांत. इनिगोयने धागा टाकल्यापसून ते शनिवारपर्यंत धाग्यावर बरीच चर्चा झाली, बरेच प्रतिसाद पडले. त्यातले बहुसंख्य प्रतिसाद न येणार्‍या मंडळींचे असल्याने गवताच्या गंजीतून सुया शोधत बसण्यापेक्षा इनिगोयने येणार्‍या मंडळींना तिला व्य. नि. करायला सांगून यादी बनवली. १६ जणांनी होकार कळवला. पुष्कळ जणांनी 'येत नाही' हे सांगण्यासाठीही व्यनी केल्याने तिथेही गवताची गंजी झालीच. हा कट्टा फिरता कट्टा असणार आहे हे कळल्यावर आमच्या आशा पल्लवीत झाल्या.

जावई बसले अडून

लेखक अधिराज यांनी मंगळवार, 05/02/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो.

शत्रुघ्न

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 05/02/2013 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत. नाही म्हणायला तसे महाभारतातले नकुल सहदेव देखील उपेक्षित. पण त्यांच्याबद्दल निदान काही कौतुकास्पद शब्द लिहिले गेले.

दिलखुश क्रंच (गोजिरवाण्या घरातली बाळं)

लेखक जयवी यांनी मंगळवार, 05/02/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १. तीळ – अर्धा किलो २. गूळ – अर्धा किलो पेक्षा थोडा कमी ३. डिंक बारीक तुकडे – ५ टेबल स्पून ४. जाड पोहे – अर्धी वाटी ५. वेलदोड्याची पूड - १ टीस्पून ६. तूप कृती : १. तीळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घेतले. २. मग तीळ मस्त खमंग, गुलाबीसर रंगाचे होईस्तोवर भाजून घेतले आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेतले.

मनमानी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 05/02/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
कळाहीन केसांत माळते रंग उतरली फुले बेगडी स्वत:च्याच बिंबावर भाळुन हसत रहाते कुणी बापडी बागेमधल्या नळाखालती निवांत करते मुखप्रक्षालन स्वस्थपणाने बाकावर मग चालतसे सौंदर्यप्रसाधन जुनाट, विटक्या बटव्यामधली दातमोडकी फणी काढते पारा उडल्या काचेच्या तुकड्यात पाहुनी केस बांधते निळी असावी कधी ओढणी, जरी दिसतसे कळकटलेली ओढुन घेते मुखावरुन ती, जशी परिणिता कुणि नटलेली हळूच हसते, जरा लाजते, नजर झुकविते करून तिरकी गुणगुणते तंद्रीतच आणिक स्वतःभोवती घेते गिरकी कोण, कुणाची, असेल कुठली, फिरे कशी होऊन उन्मनी? दैव, भोग की अतर्क्य नियती, असे कुणाची ही मनमानी? तिला मात्र ना ध्यान, भान वा चिंता, वार्ता, जाणहि ना

असता तुझी कृपा ।

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/02/2013 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
असता तुझी कृपा । असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला । देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।धृ।। घरटे कसे रचावे हे ज्ञान पांखरांना । माते उरी दुधाचा तू निर्मिलास पान्हा ।। शय्या कधी फुलांची काटे कधी उशाला ।।१।। प्रपंची अडचणी येती, मती मूढ होई दाटे अंधार जीवनी, मन निराश होई होतोस दीप तू ,सापडे वाट आंधळ्याला असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला । देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।२।। धिक्कारती सोयरे दाखवी पाठ सारे हिणविति मज, फुकाचे सल्ले देत सारे होऊन मित्र माझा, देतशी धीर मजला असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला । देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।३।। कृपेचा सागर तू.

आठवणीतले ग्रीस - भाग २

लेखक nishant यांनी मंगळवार, 05/02/2013 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतले ग्रीस - भाग १ दिवस पहिला: दक्षिण पुर्व युरोपमधे स्थित, आधुनिक ऑलिम्पिक्सचा जनक, Aristotel, Plato, Alexander अशा दिग्गज व्यक्तिमत्वांनी गाजवलेला देश. एकि कडे पुर्वेला “Agean “, पश्चिमेला “Ionian” तर दक्षिणेला भुमध्य समुद्र (Mediterranean sea). उत्तरेला अल्बेनिया, Republic of Macidonia आणि बल्गेरिया तर उत्तर-पुर्व दिशेला तुर्की हा देश.या देशाने जगाला अनेक गोष्टी दिल्या. लोकशाहीची पाळेमुळे इथे हजारो वर्षांपुर्वी रोवली गेली. तसेच गणित व साहित्याची सुरवातही इथुनच झाली.

बेरीज

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 04/02/2013 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी झेलण्या केले खुले काळीज मी भेटुनी जाते त्सुनामीसारखी मिरवतो आयुष्यभर ती झीज मी आज स्वप्नांनो, नको तसदी मला काल कवडीमोल विकली नीज मी पूर्णता नाही तुला माझ्याविना मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी ठरवले आहेस तू उत्तर तुझे, की चुकीची मांडतो बेरीज मी? -- उपटसुंभ
काव्यरस