Skip to main content

बुद्धी आणि मन….

लेखक स्मिता चौगुले यांनी मंगळवार, 12/02/2013 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धी आणि मन…. आपल्या अंतरी नेहमीच अस घडत असत बुद्धी आणि मनाचं बरयाचदा पटत नसत एकदा असंच त्याचं पटेनास झाल या ना त्या कारणावरून सारखच भांडण होवू लागल भांडता भांडता बुद्धीने घेतला पवित्रा नि दुषणे लावत बोलू लागली मनाशी असा कसा रे तू नेहमी वागतोस .. स्वप्नांच्या दुनियेतच का तू राहतोस स्वप्न आणि सत्य यातील फरक तुला कधी कळणार जादूनगरीतून अखेर बाहेर तू कधी येणार मान्य..

आणखी एक टायटॅनिक

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 12/02/2013 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षीची गोष्ट आहे, जानेवारीचा दुसरा पंधरवडा.. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेला केविन रिबेलो समुद्रात अर्धवट बुडालेल्या अजस्त्र धुडाकडे आशेने बघत बसला होता...कोणत्याही क्षणी रेस्क्यू टीम आपल्या भावाला , रसेल ला घेऊन येईल या आशेत गेला आठवडा तसाच काढला होता.”या क्रुझ असाइनमेंट मधून चांगले पैसे मिळतील, थोड्याच वेळचा प्रश्न आहे” असे त्याच्या भावाचे क्रुझवर जाण्याच्या आधीचे शब्द त्याला आठवत असावेत...रेस्क्यू टीमला आता कोणी जिवंत असण्याची शक्यता वाटत नव्हती... दुसरीकडे सर्वत्र अपघाताच्या बातम्या टी.व्ही.

हिंदी चित्रपट सृष्टीचा "प्राण"

लेखक jaypal यांनी मंगळवार, 12/02/2013 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
prN जेष्ट अभिनेते श्री. प्राण सिकंद याचा ९२ वा वाढदिवस.(जन्म १२/०२/१९२०). या बुलंद अभिनेत्या बद्दल मी काय लिहीणार? आपली तर लेखणी बंद. त्यांना मिपा परिवारा तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा. मिपाकर मित्रांना विनंती करतो की त्यांना आवडलेल्या प्राणसाहेबांच्या भुमिका, अनुभव फोटो ई. चर्चा / शेअर करावेत. प्राण यांच्या कारकिर्दीचा आढावा

थँक्यू डॉक्टर देशमुख

लेखक रामबाण यांनी मंगळवार, 12/02/2013 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
मना कधी नव्हे ते २-३ तास खूप रडली. आत्ताच झोपी गेल्याचं अंजलीनं सांगितलं. तिचं रडणं थांबत नव्हतं. विजयसोबत अंजली मनाला एका प्रथितयश डॉक्टरकडे दाखवून आलेली. विजय त्याच्या मुलीला त्याच डॉक्टरकडे घेऊन जायचा.म्हटलं बरं झालं, लहानांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करुन उपयोग नाही. त्या डॉक्टरीनबाईनं मनाला कसलं तरी इंजेक्शनही दिलं होतं. त्या गुंगीतच ती कदाचित रात्रभर झोपली असावी. मी सकाळीच ऑफीसला निघून गेलो. त्यावेळेस मोबाईल सर्वसामान्यांच्या हातात यायचा होता. त्यामुळे घरी टचमधे राहण्याचा प्रश्नच नव्हता.

आठवणीतले ग्रीस - भाग ३

लेखक nishant यांनी मंगळवार, 12/02/2013 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ दिवस दुसरा: सकाळी लवकरच जाग आली. नाश्ता उरकुन १० च्य सुमारास बाहेर पडलो आणि Acroplois च्या पायथ्याशी पोचलो. टेकडी खाली तिकिटघरात २ तिकिटे घेतली आणि चढायला सुरवात केली. वर चढायला चांगला रस्ता आहे, त्यामुळे चढाई सोपी असली तरी ऊन प्रचंड जाणवत होते. जागोजागी दिसत होत्या उत्खननात सापडलेल्या वस्तु, कुठे मातीची भांडी, कुठे दगडावर केलेले नक्षीकाम, कुठे मार्बलच्या कमानी. या सर्वांमधील उठुन दिसणारे म्हणजे, Dionysus Eleuthereus चा रंगमंच.

अखेर मला यावच लागल!

लेखक सुपरमॅन यांनी सोमवार, 11/02/2013 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळपावकर! मी तसा जुनाच फक्त चोरुन चोरुन सगळयान्चे लेख वाचायचो :) पण आता दमलो क्रमश: क्रमश: वाचुन..पुढचे भाग येतच नहीत राव :( मग म्हणल खबर घेऊ आता क्रमश: करुन पुढचे भाग न टाकनार्या मिसळपावकरान्ची..

कढी आणि फुणके

लेखक त्रिवेणी यांनी सोमवार, 11/02/2013 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- हरबरा डाळ – 1 वाटी तुरीची डाळ – 1 वाटी चवलीची डाळ – 1 वाटी (माझ्याकडे नव्हती म्हणून चवळी घेतली) . कांदे – 2 मोठे आल – अंदाजे लसूण – 1 जिरे – 1 चमचा हळद – ½ चमचा लाल तिखट – आवडिनुसार . कृती- प्रथम वरील सर्व डाळी 5-6 पाण्यात भिजवून घ्याव्यात. त्यानंतर चाळणीवर उपसून घ्याव्यात. मिक्सर च्या भांड्यात थोडी-थोडी डाल, लसूण, आलं एकत्र करून भरड वाटून घ्यावे.

आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 11/02/2013 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही? प्रेत जळते स्मशानी ,लाकडे हि जळु लागली फुले कण्हेरीची ,रास गावर्‍याची हि पेटू लागली आक्रंदती सारे सगे सोयरे,मोकलली धाय ही फुटेल केव्हा कवटी ,काळजी त्यांना लागली जमले खवीस कृत्या ,नाचतो ब्रह्मसमंध उठेल माझा मुंजा, नका असे नाचू अंधाधुंद आवाज झाला मोठा ,फुटली असेल कवटी भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी avi

GoodFellas - चुकवू नये असे चित्रपट

लेखक प्रसाद१९७१ यांनी सोमवार, 11/02/2013 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वेळेला थोडक्यात GoodFellas ह्या सिनेमा बद्दल. हा सिनेमा १९९० चा, "WiseGuys" ह्या सत्यकथेवरच्या पुस्तकावरचा सिनेमा. ही गोष्ट आहे Henry Hill नावाच्या एका Gangster ची. हा काही अगदी एखाद्या फॅमिलि मधला पण नाही आणि अगदी खालच्या स्तरातला पण नाही. हेन्री हिल च्या खर्‍याखुर्‍या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. हेन्री हिल हा न्युयॉर्क मधल्या मध्यम्वर्गीय घरातला मुलगा, वडिल आयरिश आणि आई सिसिलिअन. लहानपणापासुनच ह्याला गँग्स्टर होयचे असते. सिनेमाची सुरवातच एकदम कॅची आहे.

प्रत्येक श्वास माझा

लेखक श्रिया यांनी सोमवार, 11/02/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
सखा माझा गं सावळा रूप भुलवी मनाला गाणी त्याची माझ्या गळां जीव तयाठायीच गुंतला. आभाळाचा रंग निळा भासे त्याचीच गं तनू भाळी केशरी तो टिळा हा उगवता सूर्य जणू. पाखरांची किलबिलाट मंद धुंद गं हि हवा येई जागवाया मला संगे नादमधूर तो पावा. मी माझेपण अर्पिले हृदयसख्याच्या चरणी लाभला जिवाला विसावा त्याच्या पावन शरणी. होऊ कशी मी उतराई सार्थ केले या जीवना हा प्रत्येक श्वास माझा त्याच्याकडून उसना....