Skip to main content

आठवणीतले ग्रीस - भाग ५

लेखक nishant यांनी गुरुवार, 28/02/2013 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ दिवस चौथा: 1 * अथेन्स ते सँटोरिनी सकाळी ४.३० लाच हॉस्टेल सोडले, टॅक्सीचा संप अजुन चालुच असल्यामुळे, मेट्रो स्टेशन गाठले.

ये कहां आ गये हम

लेखक रामदास यांनी बुधवार, 27/02/2013 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषा दिनानिमीत्त आणि या प्रतिसादासाठीन्माझी काही टिपणे गविच्या चरणी अर्पण पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. अधुनमधून केले यूज इंग्लिश वर्ड्स तर काय इश्यू आहे. मराठी भाषेनेच नव्हे तर कोणत्याही लँग्वेजने नेहमी अडाप्टेबल राहिलं पाहिजे, तरच सर्व्हायवल आहे. इंग्लिश वर्ड्स रोजच्या भाषेत मिंगल झाले आहेतच तेव्हा प्रत्येकवेळी डिक्शनरी घेऊन त्याचं ट्रान्स्लेशन करावं असं मी नाही इन्सिस्ट करणार बुवा.
हे माझे रीसेंट थॉट्स आहेत.

विकसित भारत ?

लेखक जोशमनिष यांनी बुधवार, 27/02/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्याच आठवड्यात मी पद्मालय येथे गाडीवर गेलो होतो. सकाळची वेळ होती. गाडीवरून मी एका छोट्याशा गावाजवळून चाललो होतो. कुठल्याही भारतीय खेडे गावाबाहेर रस्त्याच्या बाजूलाच प्रातर्विधीसाठी बसलेले लोक दिसणे यात आपल्याला नाविन्य / आश्चर्य / खेद वाटत नाही. पण त्यादिवशी मला एक नववधू परततांना दिसली. नवीनच लग्न होऊन आलेली ती चिसौकां मोठ्या बावरलेल्या नजरेने चालली होती. कपाळावर बांधलेल्या मुंडावळ्या व अंगाची हळद नवीन लग्नाची साक्ष देत होते.

आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा हौतात्म्यदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 27/02/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २७ फेब्रुवारी. आजपासून ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी,हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताकसेनेचे सेनापती हुतात्मा चंद्रशेखर आजाद (चंद्रशेखर सीताराम तिवारी) यांना आल्फ्रेड पार्क, अलाहबाद येथे वीरमरण प्राप्त झाले होते. हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना त्यांच्या हौतात्म्यदिनी विनम्र अभिवादन.

मराठीला मानाचा मुजरा

लेखक लाल टोपी यांनी बुधवार, 27/02/2013 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज मराठी राजभाषा दिन. या दिवसाचे औचित्य साधून आपल्या मायमराठी बाबत काही चर्चा व्हावी म्हणून या धाग्याचा प्रयत्न मराठी भाषा नामशेष होते आहे काय ही चर्चा नेहमीच सुरु असते पण आज जगात सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषांमध्ये मराठी एकोणिसावी आणि भारतात चौथी आहे सुमारे साडेसात कोटी लोक मराठी बोलतात. आजवर जरी मराठीच्या वाट्याला तीनच ज्ञानपिठ पुरस्कार वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर आणि विंदा करंदीकर यांच्या रुपाने मिळाले असले तरी ही संख्या निश्चितच मोठी असायला हवी होती असे वाटते माय मराठीला मानाचा मुजरा

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

लेखक लिलि काळे यांनी बुधवार, 27/02/2013 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे.

केरळ स्टाईल व्हेजिटेबल स्ट्यू

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 27/02/2013 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
kerala style vegetable stew सामग्री: १ गाजर, फोडी १ बटाटा, फोडी १/२ वाटी हिरवे मटार १ छोटा कांदा, बारीक चिरलेला ५-६ करी पत्ता २ हिरव्या मिरच्या, मधून चिरा दिलेल्या १ चमचा आलं लसूण पेस्ट १ वेलची २ लवंगा १/२ इंच दालचिनी चा तुकडा ३-४ काळे मिरे १ चमचा तेल २०० मी लि नारळाचे दाट दूध मीठ स्वादानुसार कृती: - एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मिरची, करी पत्ता, आलं लसूण पेस्ट आणि लवंग, दालचिनी, मिरे , वेलची घालून थोडं तडतडल कि मग त्यात कांदा घाला.

3D प्रिंटींग - म्हणजे काय रे भाऊ?

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 27/02/2013 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा एका मेल मधून 3D प्रिंटींगच्या व्हिडियोची एक मेल आली होती. ती बघितल्यावर काहीतरी गीमीक असावे म्हणून तिकडे लक्ष दिले नव्हते. पण परवा ही बातमी वाचली आणि हबकलोच. त्यावेळी तो व्हिडियो बघून त्या 3D प्रिंटींगला सीरियसली न घेतल्याबद्दल मन खाऊ लागले आणि 3D प्रिंटींगबद्दल ज्ञान वाढविण्यासाठी त्याची माहिती घेणे चालू केले.