Skip to main content

तीन डझन सूक्ष्मकथा : एक लक्षवेधक , रंजक लेखनप्रकार

लेखक मन यांनी रविवार, 03/03/2013 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या एका संकेतस्थळावर एका वेगळ्याच लेखनप्रकाराबद्दल वाचायला मिळालं. कमीत कमी शब्दांत एखादी गोष्ट सांगून जाण्याच्या एका लेखनप्रकाराबद्दल. त्याचं एक क्लासिकल उदाहरण दिलं जातं ते म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे ह्यानं केवळ सहा शब्दांत लिहिलेली एक कथा:- "For sale, Baby Shoes, Never Worn." . . म्हटलं आपणही असं काही लिहून पाहुयात. ह्यात थीम एकच; प्रत्येक वाक्याच्या मागं काहीतरी एक अध्याहृत घटना, कथा हवी. ती एका वाक्यावरून लागलिच डोळ्यासमोर यावी.

कुंभ कि महाकुंभ?

लेखक श्रीनिवास टिळक यांनी शनिवार, 02/03/2013 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
(१) सध्या प्रयागला चालू असलेला कुंभ मेळा व्यवस्थित आणि शांतपणे जात आहे हे वाचून बरं वाटलं. पैलतीरावर (NRI) विविध समुदायांतून कुम्भाबद्दल बरेच प्रश्न विचारले जात आहेत. त्यापैकी मुख्य म्हणजे सद्य मेळावा कुंभ कि महाकुंभ (जो बारा कुंभानंतर म्हणजे १४४ वर्षांनी येतो) मेळा आहे? सद्य (महा) कुंभाची उपस्थिती काही कोटींवर जाईल असं म्हणतात. तर सर्वसामान्य यात्रेकरुबद्दल काय म्हणता येईल? त्याचा/तिचा अनुभव काय आहे? कोणी मि.पा. सदस्य (किंवा त्यांच्या ओळखीचे कोणी) मेळ्याला गेलं होतं का? (२) आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे यात्रेकरू बहुधा हिंदूच असतात का काही जैन, बौद्ध, आणि शीखहि त्यात सामील होतात?

अर्थसंकल्प आणि शेअर बाजार

लेखक रामदास यांनी शनिवार, 02/03/2013 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वर्षाचे अंदाजपत्रक सादर होण्यापूर्वी बाजार नरमच होता. अंदाजपत्रकाच्या येण्यापूर्वीची धामधूम बाजारात दिसत नव्हतीच. अर्थमंत्र्यांच्या समोर पर्याय कमी होते आणि शेअर बाजाराच्या अपेक्षा बर्‍याच होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला व्याज दर पाव टक्क्यानी कमी करून रीजर्व्ह बँकेनी बाकी सर्व जबाबदारी अर्थखात्यावर सोपवली होती. २०१४ हे निवडणूकीचे वर्ष असल्याने अर्थमंत्र्यांनी कमीतकमी राजकीय जोखीम घेण्याचा पवित्रा आज चिदंबरम यांनी घेतलेला दिसतो आहे. अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी कसेही करून मँडीटरी ओव्हर संपवण्यासाठी खेळाडू जसे खेळतात तसे आजचे अंदाजपत्रक आहे.

आंबा - पनीर बर्फि

लेखक दिपक.कुवेत यांनी शनिवार, 02/03/2013 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळि, आता लवकरच भारतात आंब्याचा सीजन चालु होईल तेव्हा खालील बर्फि हि तमाम आंबा आणि पनीर प्रेमींसाठि. barfi साहित्यः १. आंब्याचा पल्प / ताजा रस - १.५ वाटि (ताजा असेल तर मिक्सर मधे एकदा फिरवुन घेणे जेणेकरुन गुठळ्या राहणार नाहित) २. ताजं पनीर / क्युब्स - १ वाटि (क्रश करुन/किसुन) ३. खवा - १ वाटि ४. साखर किंवा नेस्ले स्वीट कंन्डेस्ड मिल्क - आवडिप्रमाणे कमी / जास्त (आंबा कितपत गोड आहे त्या प्रमाणात) ५. तुप - १.५ पळि ६. वेलची पुड - १/२ चमचा ७.

अद्भुत भाग 2

लेखक मंदार कात्रे यांनी शनिवार, 02/03/2013 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
7 रोहनने मुंबई सोडल्यापासून तो एकामागोमाग एका दिव्य अनुभवातून जात होता. त्याला स्वत:लाच विश्वास बसत नव्हता ,इतका बदल त्याच्यात झालेला होता. पुंनर्जन्म होवून एखादा नवीन मी जन्माला यावा ,तसा तो आता स्वत:कडे नवीन दृष्टीकोणातून बघत होता. अॅलेक्सला त्याने तसे सांगितलेही . मात्र पूर्वजन्माच्या प्रयोगाबद्दल मात्र गुरुजींच्या सक्त सूचनेनुसार त्याने अॅलेक्सला काहीही संगितले नव्हते.

दुधी ना मुठिया

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 01/03/2013 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी किसलेला दुधी पाऊण वाटी गव्हाचे पीठ १/२ वाटी रवा १/२ वाटी बेसन १/२ टीस्पून हळद १ टीस्पून धणे-जीरेपूड १ टीस्पून बडीशेप पावडर १ टेस्पून आले+लसूण+मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून लिंबाचा रस १/४ टीस्पून साखर २-३ चिमूट खायचा सोडा मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर १/२ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून पांढरे तीळ १/४ टीस्पून हींग ५-६ कढीपत्ता . पाकृ:

'प्रेमाची गोष्ट' . . .

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 01/03/2013 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
'प्रेम' ही खरेच इतकी मोहक गोष्ट आहे का ! चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनेक तर्‍हेनी हाताळूनसुद्धा अजून शोध घेणे संपलेले नाही. -- आत्तापर्यंत असंभव, अग्निहोत्र अशा मालिका आणि गैर, मुम्बई पुणे मुम्बई, एक डाव धोबीपछाड असे चित्रपट काढल्यानंतर दिग्दर्शक सतिश राजवाडे यांचा 'प्रेमाची गोष्ट' नावाचा हा चित्रपट. त्यांचा गैर सारखा सस्पेन्स थ्रिलर हिट्ट होऊनही ते बहुधा मुम्बई पुणे मुम्बई, एका लग्नाची दुसरी गोष्ट सारख्या चित्रपटांसाठी जास्त ओळखले जाऊ लागले असावेत. हा चित्रपट जरा वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. डॉ. विवेक बेळे नावाचे एक नाटककार आहेत.

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०१ : स्वप्न, तयारी आणि ट्रुम्सोकडे प्रयाण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 01/03/2013 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

धनु राशीचा शुक्र

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 01/03/2013 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
धनु राशीच्या शुक्रास पत्र - या अप्रतिम लेखाचे स्वैर भाषांतर - बरेच दिवस तुला सांगेन सांगेन असे म्हणत आहे - मला तू फार आवडतोस. स्वच्छंद, मनास येइल तिथे मनास येईल तेव्हा विहरणारा मनमौजी तू, या वीकेंडला एखाद्या किल्ल्यावर भटकून ये तर एखाद्या आठवड्यात कुठे फिल्म फेस्टिव्हलचाच बेत आख, क्वचित गर्दीपासून दूर वसलेल्या शांत खेड्याची सहल कर तर कुठे तळ्याकाठी पुस्तक वाचत बस. तुझ्या पायाला भिंगरी ही सदाचीच.बरं ही झाली तुझी प्रत्यक्ष केलेली भटकंती, मनाने केलेल्या प्रवासांना तर मर्यादाच नाही.

होस्टेल मधील मुलीचा विनयभंग आणि मिसळपाव.कॉम

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शुक्रवार, 01/03/2013 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक बोधकथा… कोणे एके काळी एका होस्टेल मध्ये घडलेली ही गोष्ट आहे. एका आटपाट नगरात एक कॉलेज होते. कॉलेज होते म्हटल्यावर तिथे हॉस्टेल्स पण होती. एक होते मुलांचे आणि एक मुलींचे. ही दोन्ही हॉस्टेल्स बाजूबाजूला होती. मध्ये एक भिंत होती. एकदा एक मुलगी मुलींच्या होस्टेलच्या रेक्टर कडे तक्रार घेऊन आली. तक्रार होती की बाजूच्या होस्टेल मधील मुलगा आपल्या खोलीत केवळ एक चड्डी घालून वावरतो आणि तिच्या खिडकीतून हे तिला सतत दिसल्याने तिचा विनयभंग आणि मानसिक छळ होतो आहे. तक्रार गंभीर असल्याने रेक्टर तडकाफडकी शहानिशा करायला खोलीवर आली.