साहित्यः
१ वाटी किसलेला दुधी
पाऊण वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी रवा
१/२ वाटी बेसन
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून धणे-जीरेपूड
१ टीस्पून बडीशेप पावडर
१ टेस्पून आले+लसूण+मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून लिंबाचा रस
१/४ टीस्पून साखर
२-३ चिमूट खायचा सोडा
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून पांढरे तीळ
१/४ टीस्पून हींग
५-६ कढीपत्ता
पाकृ:
एका भांड्यात दुधीचा कीस,गव्हाचे पीठ, रवा, बेसन, हळद, धणे-जीरेपूड, बडीशेप पावडर, लिंबाचा रस, मीठ, साखर, खायचा सोडा, आले+लसूण+मिरची पेस्ट व थोडीशी कोथींबीर घालून एकत्र करुन सैलसर पीठ भिजवावे.
दुधीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शक्यतो पीठ भिजवताना पाण्याचा वापर करु नका, अगदीच लागले तर किंचित पाणी घालून पीठ भिजवा.
आता तेलाच्या हाताने छोटे-छोटे उंडे करुन घ्या.
तेल लावलेल्या चाळणीवर तयार उंडे ठेवून,ती चाळणी पाणी घातलेल्या मोठ्या भांड्यात ठेवून, झाकून १५-२० मिनिटे वाफवून घ्या.
इडलीपात्रात किंवा कुकरला ही वाफवून घेऊ शकता.
वाफवलेले उंडे थोडे गार करुन घ्या.
गार झालेल्या उंड्यांचे स्लाईसेस करुन घ्या.
कढईत तेल गरम करुन मोहरी-तीळ,हींग,कढीपत्त्याची फोडणी करुन घ्या .
त्यात मुठियेचे स्लाईसेस व कोथींबीर घालून चांगले परता.
आवडत असल्यास वरुन थोडे सुके खोबरे घाला.
गरमा-गरम दुधी ना मुठिया खाण्यासाठी तयार आहे :)
नोटः
अशाच पद्धतीने तुम्ही मुळ्याचे, कोबीचे,पालक-मेथी मिक्स किंवा नुसत्या मेथीचे मुठिये बनवू शकता.
गार झालेल्या उंड्यांचे स्लाईसेस करुन घ्या.
कढईत तेल गरम करुन मोहरी-तीळ,हींग,कढीपत्त्याची फोडणी करुन घ्या .
त्यात मुठियेचे स्लाईसेस व कोथींबीर घालून चांगले परता.
आवडत असल्यास वरुन थोडे सुके खोबरे घाला.
वाचने
9855
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म. छान. उद्याच करण्याचा
मीसुद्धा (नेहमीच) असेच म्हणतो.
In reply to हम्म. छान. उद्याच करण्याचा by रेवती
प्रतिसाद टंकण्याचे माझे कष्ट वाचवल्याबद्दल आभार्स...
In reply to मीसुद्धा (नेहमीच) असेच म्हणतो. by चिंतामणी
सध्या वाचनखूण साठवून ठेवतो..
छान ..
मस्त!
मस्त
अरे वा
+१
मस्तच पाकृ गं.... करुन बघायला
अजून काही अपेक्षीत प्रतिसाद आले नाहीत.
मला फोटू का दिसत नैत ?
कोबीचे मुठीये करून बघितले.
मस्त
कधीपासून ही रेसिपी हवी होती
मस्तच..
छान !!
ने प्र छा रे छा फो.. :)
मस्त आहे रेसिपी, शेवटचा फोटो
माझी आई असेच साहित्य वापरून
उत्कॄष्ट आरोग्यदायी पाकॄ!