Skip to main content

माय

लेखक पंचम यांनी सोमवार, 04/03/2013 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
माय.... मला सुटता सुटेना माझ्या लेकराची माडी .. जोडले घरटे कधी रे वळखीची काडी काडी.. माझ्या पंखातला चिमणा नवं घरटं बांधतो .. वेळ नाही माझ्यासाठी मला दबकत सांगतो .. नव्या घरट्यात असल नव्या चिमणीचे राज्य बघ माऊलीचे पंख कसे घायाळ रे आज .. आज माझच लेकरु दावी आश्रमाचा रस्ता कशी आली पहा येळ आज मावळतीले झुकता पिल्लाची नवी कोठी किती मोठी रं असावी? पण माझ्या अडगळीस तिथे जागा का नसावी? प्रभु एकच मागणे पिल्ला दु:ख न मिळु दे जरी मिटले डोळे माझे तरी त्याला न कळु दे .. सरणाच्या चितेवर जेव्हा बाळ माझं रे रडेल. तेव्हा चितेतल्या आगीत रे माझा देह कळवळेल .. – कवी पंचम (निशांत तेंडोलकर)
काव्यरस

अनोळखी नाते

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 04/03/2013 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे चर्चगेट वरून लोकल पकडली, पण डब्ब्यात चढताच एक चर्र होऊन गेले मनात. नेहमी सारखी आज ती डोळ्यासमोर नव्हती. असे कधी होत नाही म्हणजे मी इथे चर्चगेटला कामाला लागल्यापासून आणि विशेषता हि लोकल पकडण्याची चालू केल्यावर नेहमीचा दिसणारा चेहरा होता तिचा. काय झाले असावे? कारण एक रविवार सोडला तर ती कधी दिसली नाही असे झालेच नाही. बरे नसेल किवा काही काम असेल म्हणून आली नसेल असे मी उगाचच माझ्या मनाला सांगितले. तशी आमची तोंड ओळखच म्हणजे कधी कधी बाजूला बसून हि गप्प असायचो आम्ही. देवाण घेवाण व्हयाची ती फक्त स्मितहास्याची. काही न बोलता हि आमचे एक अबोल नाते झाले होते.

अंकुर

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 04/03/2013 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
शुष्क दिसे, पोटी पण पाणी, हृदयी एक कहाणी, बीजे अगणित दडलेली,.. पाहिली कधी का कोणी ? श्वासात उसासे जडलेले आतूर सदा आणीबाणी छाया मेघांची कुंद जशी ओठी थिजलेली वाणी ? सर सर सर शिरवा शिडकावा काहुरते एक विरह राणी हुरहुरते सुप्त, डंवरते मन अंकुरते व्याकुळ धरणी ....................अज्ञात
काव्यरस

यु आर लेट यु फुल

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 04/03/2013 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज भेटायचे ठरले होते आपले किनार्‍यावर जरा लवकरच आलो अन् दूर उभा राहिलो . मी नसतांनाचा समुद्र आणि मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू दोघांना बघायचे होते म्हणून . पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस किनार्‍यावर, समुद्राकडे तोंड करून . मनात म्हटले, यु आर लेट यु फुल! . बेभान वाहणारा खारट वारा तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून त्याला मोकळे करावे पण इतक्यात तू मानेला एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस वाटले... यु आर लेट यु फुल! . तुझ्या पायाखालची वाळू तुझ्या कोमल पाऊलांना चिटकत होती तुला ती हुळहुळ सतावत होती वाटले पुढे होऊन ती झटकून द्यावी पण इतक्यात तू येणार्‍या लाटेत आपले पा
काव्यरस

नास्तिक - भाग २ !!

लेखक फिझा यांनी सोमवार, 04/03/2013 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
नास्तिक - भाग २ !! कुठे आहेस तू, नाही दिसला मला कधी जे मानणारे आहेत खूप, त्यांना तरी भेट कधी “सगळीकडे आहे मी.. हे आकाश, ही धरती, हे विश्वच मी ….. एकदा "समुद्र" म्हणून बघ मला, या लाटाच देतील सगळी उत्तरे तुला ......" फिझा ने जब दरिया में पानी को सेह्लाया, तो जितने बल्खाके पानी किनारोंसे से टकराया, उतनी बार.......

श्रद्धांजली

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी रविवार, 03/03/2013 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
नाही विसरलो तुम्हा स्मॄती अजुन जपल्या प्रिय होतात रे तुम्ही परिवारात आपल्या परिवार म्हणजे मी आणि भावंडे तुमची घट्ट होती अशी मैत्री तेव्हा आपली सर्वांची होतो एकसाथ जेव्हा किती वाटायचे छान सारे लोक न्याहाळती रोज वळून पाहून कसे गेलात सोडून एक एक ते करुन नाही पाहिलेत तुम्ही पुन्हा मागेही वळून वा-यावरती तुमचे भुरभुरून उडणे आठवते मज आता येते मनात रडणे जाण्यामुळे तुमच्या रे झाले आहे मी टकला कंगवाही कधीचा मी अडगळीत टाकला

मध्यस्थ

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी रविवार, 03/03/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
भेट आपुली पहिली वहिली अशी ठरवली नव्हती नकोच होते मला कुणी गं आपल्या अवती भवती चार फुटांचे अंतर होते दोघांमध्ये तेव्हा सवाल माझ्या हृदयीचा तुज कैसा ऐकू यावा मनात राहून गेले सारे शब्द मनातील माझे माझ्यासम बोलणे राहिले तसेच अधुरे तुझे पुन्हा भेटशील एकांती तू वाट पाहू मी किती नको आणू पण कुणी बरोबर मध्यस्थ सोबती

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०२ : ट्रुम्सो - डॉग स्लेडींग सफारी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 03/03/2013 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १)

लेखक मोदक यांनी रविवार, 03/03/2013 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
"मोदक, तू कॉमर्स बॅकग्राऊंडचा असूनही आयटी कंपनी मध्ये कसे काय..?" या प्रश्नाचे नेमके उत्तर काय द्यावे हा क्रायसीस बरीच वर्षे मागे लागला आहे.