Skip to main content

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...

लेखक मन यांनी शुक्रवार, 22/03/2013 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. मस्त पतंग उडवा, तीळ्गूळ वाटा. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि फटाके उडावताना काळजी घ्या. . धुळवड साजरी करा, रंग खेळा, पण पाण्यानं नको फार; ऑर्गॅनिकच बरे. आणि तुमचा केक कापून झाला की मस्त भांगेची कॉकटेल घेउन पडले रहा मस्त मी सध्या पडलोय तसा. . दिवाळीतील होळीच्या पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा . :) . बोला कॉकटेलच्या बैलालाsssss (एका sms वरुन साभार, पण समयोचित वाटलं.) --मनोबा

गपगार

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 22/03/2013 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
बामनाची ईदद्या ग्येली. म्हंजे म्येली. शेताला गेल्ती सक्काळी. हा-या धावत आला सांगाया. मोटी माणसं ग्येली पळत. म्याबी चाल्ली व्हती. आयनं पायलं, म्हन्ली, “मुकाट्याने निमीकडं जा. तिथं दिसलीस तर लाथ घालीन.” आमच्या घरातली मान्सं सूद्द बोल्तेत. म्या येकलीच खेडवळ. ईदद्या माज्याशी चांगली व्हती. बोलायची न्हाई जास्ती, पण कायबाय द्यायची मला. गजगं; फुटकी काकणं; चिचोके; गूळश्यांगदाणं; आवळं; जांभळं; – समदं फुकाट. म्याबी तिला मोराचं पीस दिल्त येकडाव. हसली व्हती. “आता ईदद्याचं भूत व्हनार,” जग्या म्हन्ला. “हाडळ”, भान्या म्हन्ला. “हाडळ कशापायी?

तेरी कौनसी है मंझील

लेखक विकास यांनी शुक्रवार, 22/03/2013 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
"बीस साल बाद" या चित्रपटातील "कही दीप जले कही दिल" या अवीट गोडीने म्हणलेल्या पण गुढ गाण्यात गायीका आणि चित्रपटातील नायीका, वीस वर्षां नंतर परदेशातून गावी आलेल्या नायकाला सावध करताना त्याला "तेरी कौनसी है मंझील" म्हणत असते. आज अचानक हे आठवायचे कारण म्हणजे यंदाच्या १२ मार्च ला मुंबईतील साखळी बाँबस्फोटांना वीस वर्षे झाली आणि वीस वर्षांनंतर आजच्या (मार्च २१) दिवशी त्या स्फोटातील आरोपींना अखेर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिली...

बुर्खा

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 21/03/2013 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
हरेक माणूस नागमोडी कुणीच नाही सुतासारखा सुरी तयाच्या बगलेमध्ये जरी दिसे हा दुतासारखा ! बुर्ख्यामध्ये दंतकथेच्या हरेक किस्सा मृतासारखा गळ्यास येता : विचारवंत बनून जातो बुतासारखा ! मृदेत किल्ला कशास बांधा विरून जातो मुतासारखा.. फिरून व्योमी तिथेच येतो जन्म असा हा भुतासारखा ! - (C) डॉ.सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_21.html

नाचणीचे सतू.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 21/03/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)दोन पेले नाचणे. २)अर्ध्या नारळाचे दूध्.(घट्ट व पातळ.) ३)किसलेला गूळ. ४)चिमूटभर मीठ. ५)काजू किंवा भाजलेले शेंगदाणे. ६)दिड चमचा साजूक तूप. कृती :-नाचणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे.सकाळी बारीक वाटून गाळून घ्यावे.चोथा येईल तो टाकून द्यावा. गाळून उरलेल्या पाण्यात अजून पाणी घालून ६-७ तास ठेवावे म्हणजे नाचणीचे सत्व खाली बसेल व पाणी वर राहिल.वरचे पाणी हळू काढून टाका.आता जे सत्व राहील त्यात नारळाचे दूध,किसलेला गूळ. काजू व मीठ घालून ढवळून घ्या.गूळ विरघळला कि हे मिश्रण मध्यम आचेवर गॅसवर ठेवा.सतत हलवत रहा. जरावेळाने मिश्रण घट्ट होत येईल्

आभार

लेखक तिमा यांनी गुरुवार, 21/03/2013 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याचशा समारंभात, शेवटी एक 'गोग्गोड' असा आभारप्रदर्शनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. आता वय झाले की जुन्या आठवणी येणारच. अशा आठवणी उगाळत असताना एक विचार चमकून गेला की, आपला शेवट जवळ आला आहे अशी कल्पना केली तर मी देवाचे आणि इतरांचे आभार कसे मानीन? आणि तेही औपचारिक नव्हे तर मनापासून. १. सर्वप्रथम, या जगांत मनुष्यप्राणी म्हणून जन्माला घातल्याबद्दल आभार. २. त्यानंतर, एका चांगल्या, मध्यमवर्गीय घरांत, साधे जीवन आणि उच्च विचार करण्याची संवय लावल्याबद्दल त्या स्वर्गस्थ मातापित्यांचे आभार. ३.

याला न्याय कसं म्हणायचं

लेखक रामबाण यांनी गुरुवार, 21/03/2013 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
१२ मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बाँब स्फोट खटल्याचा आता सर्वोच्च न्यायालयात निकाल देणं सुरु आहे. तसा हा देशावरचा पहिला आणि सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, २५७ लोकांचा जीव घेऊन गेला. दाऊद, टायगर वगैरे मुख्य आरोपी पाकिस्तानात सुखरुप आहेत. बाकींच्यांना घेऊन २० वर्ष उलटली तरी खटला सुरुच आहे. बहुतांश पब्लिकला संजुबाबाचं काय होणार याचीच उत्सुकता आहे. आता २० वषांनंतर काहीही निकाल लागला तरी, जे गेले त्यांना... ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले त्यांना... जे जखमी झाले त्यांना... ज्यांचं सगळं आयुष्यंच बदलून गेलं त्यांना..

स्टफ्ड खजुर रोल्स

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 21/03/2013 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काहि गोष्टि जशा ठरवुन होत नाहि तसाच ह्या पाकॄ बाबतीत झालं. बच्चु करिता आणलेलं दुध नासलं. नासकोणी (नासलेल्या दुधात गुळ किंवा साखर घालुन करतात तो प्रकार) मला फारसं आवडत नाहि. म्हणुन जरा माझं डोकं (?) चालवुन खालील पाकॄ केली. अनायसे सर्व साहित्यहि घरात उपलब्ध होतं. पाकॄ वाचल्यावर कदाचीत तुम्हि म्हणाल हे देवा.....याने फिरुन परत पनीर आणलच पण एक स्टफिंग विदाउट पनीर पण आहे. आशा आहे गोड मानुन घ्याल :D Khajur साहित्यः १.

भूल-भुलैया

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 21/03/2013 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
भूल-भुलैया चार वर्षापूर्वीची गोष्ट. शुक्रवारची सुट्टी असल्याने लंचनंतर वामकुक्षी काढून जरा आमच्या कॅम्पबाहेर फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. इथे दम्ममला संध्याकाळचे चार वाजले तरी अजून उष्मा जाणवत होताच ! सौदीला आल्यापासुन दोन महीने आराम असा नव्हताच ! अगदी वीकली ऑफ सुद्धा कॅन्सल केले होते ,इतक्या दिवसानी सुट्टी मिळाली म्हणून जरा एंजॉय करायचा मूड होता .म्हणून अल-खोबर वरुन विक्रांतला फोन करून बोलावलं होतं . तो गाडी घेवून पाच वाजेपर्यंत पोहोचणार होता. तोपर्यंत पायी फेरफटका मारावा म्हणून निघालो, आणि चालत चालत कॅम्प पासून दीड-दोन किलोमीटर वर आलो. सगळीकडे रखरखीत निर्मनुष्य वाळवंट पसरला होता.