Skip to main content

गावाकडचा मराठी भाषा गौरव दिन २०१३.

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 25/03/2013 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार दि. २२-०२-२०१३ रोजी संध्याकाळी पांचसाडेपांच वाजतां माझा भ्रमणध्वनी वाजला. मालवण नगरवाचनालयातून ग्रंथपाल शिंदेसाहेब. “नमस्कार! शिंदे बोलतोय, नगरवाचन मंदिरातून.” “नमस्कार! बोला साहेब, कशी काय आठवण केलीत?” पुढल्या आठवड्यात मराठी भाषा गौरव दिन आहे. २७ तारखेला. त्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे जरूर या. फोटो काढा, अहवाल बनवा.” “हो, नक्की! किती वाजता आहे? “सकाळी दहा वाजता.” “हरकत नाही, येईन. आणि काय विशेष?” “हेच विशेष. बाकी काही नाही, नंतर बोलूच, नमस्कार!” “नमस्कार.” आमचे कांदळगांवचे स्नेही श्री. शरद कदम यांना कळवले. ठरल्याप्रमाणे मी आणि श्री. शरद कदम गेलो.

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 25/03/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला

बॉईल्ड एग्ज सॅन्डवीच/रोल्स (१००% वीदाउट पनीर रेसीपी )

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 25/03/2013 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो क्रं १ (सारण/स्टफिंग): Stuffing फोटो क्रं २ (तयार सॅन्डवीजेस): Pita bread sandwitch साहित्यः १. उकडलेली अंडि - २ ते ३ २. बारिक चीरलेली हिरवी, पिवळी, लाल, केशरी सीमला मिरची - १.५ वाटि किंवा ज्या कलरच्या मिळतील त्या :D ३. बारिक चीरलेली हिरवी मिरची - आवडिप्रमाणे कमी / जास्त ४.

जेम्स बाँडच्या ललना..

लेखक नानबा यांनी सोमवार, 25/03/2013 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
जेम्स बाँड आणि त्याच्या चित्रपटांचा स्वतःचा चाहतावर्ग आहे. थंड डोक्याचे गुंड, "क्यू" ची भन्नाट उपकरणे, वेगवान गाड्या आणि मदमस्त बाँडबद्दल सगळीकडेच चर्चा होते. पण काही चाहत्यांचं बाँड बघण्याचं मुख्य कारण असणार्‍या बाँड ललनांबद्दल फारसं कोणी बोलत नाही. किंबहुना चित्रपटांमध्येसुद्धा त्या दिसतात काही ठराविक कारणांसाठीच. या धाग्यात आपल्याला आवडलेल्या बाँडललनांबद्दल काथ्या कुटूया. अगदी पहिला बाँडपट डॉ. नो मधल्या उर्सुला अ‍ॅनड्रेस पासून नुकत्याच आलेल्या स्कायफॉल मधल्या निओमी हॅरिस पर्यंत सगळ्यांबद्दल.

लेखणी !!

लेखक फिझा यांनी सोमवार, 25/03/2013 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
लेखणी !! तिला असेल आठवण आपल्या शेवटच्या भेटीची अंतर पडण्याआधी लिहिलेल्या जवळच्या शब्दांची तिही विचारत असेल तुला ... काही लिहीशील का आज माझ्यासाठी ...!! भिजलो एकदाच पावसात ...डोळेभरून ... परत भिजलास का रे कधी ... भेटलो नेहमी त्याच वाटेत ...नजर टाळून ..

काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814

लेखक मोदक यांनी रविवार, 24/03/2013 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते. श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच. अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे.

गाथा 'टायटन' ची - Heritage Collection

लेखक मोदक यांनी रविवार, 24/03/2013 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
. टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान National Institute of Design मधील एक तरूण 'प्रोजेक्ट वर्क' साठी टायटन मध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईन प्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली.

गंगामाई

लेखक यशोधरा यांनी रविवार, 24/03/2013 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ मध्ये व्हॅलीचा ट्रेक केला. व्हॅली, हेमकुंड, हिमाचलात काढलेले दहा दिवस कधी आयुष्यात विसरेन असे वाटत नाही. काही काही योग आयुष्यात असावे लागतात, आणि जेह्वा अचानक असे ते पदरात पडतात, तेह्वा ती अनुभूती शब्दांत मांडणे खरे तर अशक्य. हिमालयाचे कडे, पहाड सामोरे येण्याआधीही इथे हरिद्वारला सामोरी आली ती गंगामाई. आतापरेंत गंगामाईबद्दल बरेच काही ऐकले, वाचले होते, पण जेह्वा तिला पाहिले, तेह्वा ऐकणे, वाचणे किती फोल होते, ते अगदी जाणवले. गंगामाईने खरेच वेड लावले, आणि आता ते कधी कमी होईल असे वाटत नाही. होऊही नये, ही प्रार्थना. हे सारे मी अतिशय भारावून जाऊन लिहिले आहे, हे मलाही जाणवते.

जिकडं खोबर, तिकडं चांऽऽगभलं!!!.....२

लेखक साऊ यांनी रविवार, 24/03/2013 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
.तर अश्या पद्धतीने गावचा मारुती पुन्हा वेशीला उभा राहिला. अजुन ही उभाच आहे, त्याच्या अंगावरल्या घणांच्या घावांत आता चुना भरलाय, अन दरवेळच्या नव्या शेंदराने त्या भेगा जरी उठुन दिसत नसल्या तरी त्या भेगा आहेतच. आता याच दु:ख मानुन घ्यायला आम्ही काय मायनॉरीटीवाले, आमच्या दु:खांना काही किंमत नाही. आता हे ही असोच. भेगाही असोच अन आमच दु:खही असोच. तर पुढे तर झाल काय ? तर तो जो जुलुमान लादलेला पंजा गावात होता, तो तसाच त्या एका घरात देवघर बांधुन पडुन होता. एक जरा ऐसपैस चौथरा बांधुन त्यावर जरा कमान बिमान बांधुन तो पंजा त्या घरात पड्लेला असायचा.

फणस पुलाव

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 23/03/2013 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बासमती तांदुळ अर्धा कि., एक मध्यम फणसाची कुयरी, एक वाटी ओले खोबरे, दहा-बारा लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, एक वाटी दही, चार कांदे, एक तमालपत्र, दोन काड्या दालचिनी, ७-८ काळी मिरी, दोन चमचे जिरे, चार ओल्या मिरच्या, दोन मसाला वेलची, ओले काजूगर एक वाटी, दोन चमचे गरम मसाला, तूप, मीठ. क्रुती: तांदुळ धुवून निथळत ठेवावे. फणस चिरून वाफवून घ्यावा. कांदा उभा चिरावा. तांदुळ निथळले की तुपावर परतून दुप्पट पाणी व मीठ घालून दोन शिट्या करून घ्याव्यात. वाफ जिरली की भात ताटात पसरून गार करत ठेवावा. आले, लसूण, खोबरे थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. कढईत तूप तापत ठेवावे.