Skip to main content

नाते देवाशी...

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 15/04/2013 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रश्न परमेश्वर / देव ह्याच्याशी द्वैत भावात मानवी नाते संबंधातील अनेक (किंवा बहुतेक सर्व) नाती जोडली आहेत. पिता / माता / बंधू / सखा / पुत्र / कन्या /मालक / नोकर / राजा इत्यादी इत्यादी.. एवढेच काय पण पती सुद्धा परंतु कुणीही परमेश्वराला 'पत्नी' नात्यात मानलेले/उल्लेखिलेले नाही... काय कारण असू शकेल???

डा़ळ वडे

लेखक जागु यांनी सोमवार, 15/04/2013 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका. :हाहा: माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे.

तळ्यात मळ्यात कुल्हापुरी ,कोकणी ,मालवणी वगैरे

लेखक कंजूस यांनी रविवार, 14/04/2013 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या म्हराठी मुलुखात बऱ्याच बोली आहेत .कुल्हापुरी ,अहिराणी ,मालवणी ,कोकणी ,गोव्याची कोकणी वगैरे .त्यातून लिहिलेले चालू घडामोडी ,फोनवरचे गमतीदार संभाषण इत्यादि लेखन वाचायला आवडेल .हा धागा सुचवून राहिलोय .बिगि बिगि लिवा . अता ठिवतो ब्याट्रि डौन हुयाला लागलीया .

चंद्रकांता - १.१ - नजरकैदेतली राजकन्या

लेखक आदूबाळ यांनी रविवार, 14/04/2013 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवसांत अद्भुतरम्य असं काही वाचलं नव्हतं. अचानक "चंद्रकांता" ही देवकीनंदन खत्री यांची सुप्रसिद्ध कादंबरी आंजावर मिळाली. त्यावरची टीव्ही मालिका आठवत असेलच. मालिकेने मूळ कादंबरीला न्याय दिला नाही असं (लेखकाच्या नातवासह) अनेकांचं म्हणणं होतं. मिपाच्या वाचकांसाठी ही कादंबरी मराठीत आणण्याचा विचार आहे. ____________________________ विस्तीर्ण अशा सपाट पठारावर एक दगडी उंचवटा होता. मावळत्या संध्याकाळी त्यावर बसून दोन तरूण आपापसांत बोलत होते. बाविशीचा वीरेंद्रसिंह नौगढच्या राजा सुरेंद्रसिंह यांचा एकुलता मुलगा होता. दुसरा तरूण तेजसिंह हा सुरेंद्रसिंहांचे दिवाण जीतसिंह यांचा पुत्र होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 14/04/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्वतंत्र भारताला वेगळे वळण देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. लाखो लोक या लोकोत्तर नेत्याला दैवत मानतात. या महापुरुषाला नम्र अभिवादन. गांधीजी नंतर आपल्या इतिहासावर एवढा परिणाम करणारा नेता अजुन दुसरा कुठला नसेल. या महापुरुषाला माझी आदरांजली

मिक्स व्हेज मलई

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 14/04/2013 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच्या पारंपारीक मेथि-मटर मलई ला पर्याय :) veg malai साहित्यः १. कांदा - १ मध्यम २. मगज बी - १ चमचा (watermelon seeds white) ३. काजु - ८ ते १० ४. हिरव्या मीरच्या - २ (तिखट असतील त्या प्रमाणात आवडिप्रमाणे कमी/जास्त) ५. फ्रेश क्रिम/मलई - २ चमचे ६. कसुरी मेथी पावडर - १/२ चमचा ७. आलं/लसुण/हिरवी मिरची पेस्ट - २ चमचे ८.

बोल एनिथिंग बट अ नो बॉल ...

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 14/04/2013 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
कालच दि. १३ एप्रिल २०१३ रोजी आय पी एल मधे बंगलोर व चेन्नई संघात टी २० चा सामना झाला. The game is not finished unless the last ball is bowled.या क्रिकेट मधील कुठेही लिखित न झालेल्या नियमाचा प्रत्यय आला. शेवटच्या चेडूवर २ धावा जिकण्यासाठी चेन्नईला हव्या होत्या.आर पी सिंग ने रवींद्र जडेजाला चेडू टाकला .त्याने तो थर्ड मॅनच्या दिशेने उंचावून मारला. थर्ड मॅनला असलेल्याने तो झेलला. झाले. बंगलोरच्या खेळाडूनी हवेत उंच उड्या मारून सेलेबब्रेशन करायला सुरूवात देखील केली. छोट्या पडद्यावर नवेच द्ष्य दिसू लागले. इकडे पिवळा ड्रेस वाले चेनाईकर ही आनंदाने मैदानाकडे अर्थात विजयी मुदद्रेने धाव घेउ लागले.

॥ अज्ञान ॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 14/04/2013 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
तिर्थयात्रा सर्व करुन आली । परी देवाची भेट नाही झाली । वेळ आणि अर्थिक वाया गेली । व्यर्थ तुझी ही काया झिजवली । देव नाही हो कुठे तिर्थस्थानी । जेथे जावे तेथे धोंडा-पाणी । धंदा मांडला तेथे पुजार्‍यांनी । पावतीविना सोडिना आत कोणी । देवा नाही हो गिरी कपारीत । तो आहे आपल्याच ह्रुदयात । शोधा त्याला आपुल्याच घरात । आईवडिलांच्या शुध्द स्वरुपात । आला आजार भगताकडे गेला । लिंबू देऊन चमत्कार केला । राख ताबीत घेऊन घरी आला । काय म्हणावे ह्या अज्ञानाला । अस्वलाच्या एका केसावरी । म्हणे सामर्थ्य आहे तेथे भारी । ते अस्वल असते त्याच्या करी । मग तो का हिंडतो दारोदारी । कोणी काढती फुले हातातुन । कोणी काढती स

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग दोन

लेखक लाल टोपी यांनी रविवार, 14/04/2013 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
फोर्ट स्टिकिन १२ एप्रिलच्या पहाटेच्या सुमारास मुंबईला पोहोचली. मुंबई बंदराच्या जवळच या जहाजाने नांगर टाकला. सकाळी दहाच्या सुमारास या जहाजाला व्हिक्टोरीया बंदरापर्यंत घेऊन जाणारी बोट आली. यावेळी मुंबई बंदरावरील कोणालाही या बोटीत असणा-या धोकादायक अणि संहारक सामुग्री बाबत काहीही कल्पना नव्हती कारण विस्फोटक सामुग्री असणा-या जहाजांना लाल रंगाचा झेंडा बोटीवर फडकवणे आवश्यक असते त्यामुळे आजुबाजूच्या सर्वांनाच जहाजात धोकादायक माल आहे हे समजते मात्र युध्द काळात असा लाल बावटा फडकवत प्रवास करणे म्हणजे शत्रूला हल्ल्यासाठी आमंत्रण देण्यासारखे ठरले असते म्हणुन त्याकाळात ही अट शिथिल करण्यात आली होती.

संगीतकार आणि गायक/गायिका

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 14/04/2013 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
ओ पी नय्यर ने लताला वगळून गाणी केली हा एक चर्चेचा विषय आहे. परंतु सुधीर फडके (बाबुजींनी) सुद्धा लताला फार गाणी दिल्याचे आढळत नाही. ज्योती कलश छलके एक आहे..पण बाबुजींनी लताला दिलेली सोलो गाणी कोणती? त्यातली गाजलेली कोणती? कदाचित माझी काही चूक होत असेल...पण मला सतावतोय हा प्रश्न!!!